मूर्खांची शाळा

Submitted by इगुलपुरी on 27 July, 2017 - 13:59

मूर्खाची शाळा

येडे मास्तर नुकतेच 7 वीच्या वर्गात पहिल्या तासाला हजेरी घेण्यासाठी येतात.
येडे गुरुजीला बघून धिंगाणा घालणारी पोरे थोडी शांत होतात. (गुरुजी आपल्या तीन पायांच्या दोन खिळे निघालेल्या खुर्चीवर बसायचे म्हणून बसल्यावनी करतात)
खाकरून तंबाखूचा विडा तितेच कोपऱ्यात थुंकून टेबलावरच्या पाण्याचा गुळण्याची पिचकारी कोपऱ्यात टाकून बोलतात, तर मुलांनो आता आपण हजरी घेऊ.
गुरुजी : अबूलाल गबुलाल मुलाणी
मुलाणी: हुजूर
गुरुजी: कारे मुलाण्या दरबारात बसलाय का बैठकीत जो हुजूर म्हणतोय हजर म्हणाय काय जीभ झडते काय गाढवा.
बस खाली माकड कुठलं.
( हजरी पुढे चालू)
गुरुजी: दत्तु दमण दातीर
दातीर : हजार येडे मास्तर
गुरुजी: दत्तु दातऱ्या तुझ दात पाडून हजार दात बाहेर काढील, बापाची पगार सांगितल्या वानी हजार म्हंतोयस वय , दाताड इचक्या बस खाली.
गुरुजी : छगन मगन खरजुले.
खरजुले : खरूज गुरुजी.
गुरुजी : वाटलेच मला हे खरजुल असणार, सारखे खाजवून खाजवून अंगावर वितभर खरूज चडलिय, म्हटल्यावर आता हजर ऐवजी खरूजच म्हणणार. सारखा बगाव तवा माकडावानी खाजवत असतु, बस खाली.
( हजरी तर झाली मुलांनो आता अभ्यासाचे बघू.)
गुरुजी : तर मूर्खांनो (मुलांनो) काल आपण कुठपर्यंत अलतो.
मध्येच उठून खरजुले बोलतो भगुल्या (भूगोल)पर्यंत अलतो गुरूजी.
(तेवढयात मुलाणी मधेच)
मुलाणी : गुरुजी काल वो दातऱ्या का दत्तु हे ना वो भगुल्या मे शिळा मासे खाते टाइम देख्या में.
( तेवढयात दातऱ्या तावात उठतो व मुलांण्याची कॉलर पकडून)
दातीर : कारे मुलाण्या तू काय माझ्या घरी माशाचा वास काढत आलता काय,
बरका गुरुजी आधीच सांगून ठेवतो तो तुमच्या भगुल्याचा आणि माझा भगुल्याचा काय सुद्धा संबंध नाही, उग त्याचा संबंध जोडून मला मारायचं काम नाही. हं$$
(तेवढ्यात गुरूजी टेबलावर वेताची छडी जोरात आपटून बोलतात)
गुरुजी : अरे मूर्खांनो येथे आपण भूगोल विषया बद्दल बोलतोय आणि तुम्ही मधेच भगुल्यात कसे घुसला.
बर ते जाऊद्या आता तुम्ही इतिहासाची पुस्तके काढा, मी एक तुम्हाला मागच्या आठवड्यात झालेल्या धड्यातील एक प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्या.
गुरुजी : खरजुल्या सांगबरे अब्जालखानाचा खून कोणी केला?
खरजुले : (एका हाताने टकुर व दुसऱ्या हाताने हात खराखरा खाजवत म्हणतो)
गुरुजी माझ्यावर आरोप करायचं काम नाही, मी नाही अब्जालखानाचा खून केला, शाळत कुणाला भी इचारा मी मागच्या आठवड्यात शाळेत न्हवतो आलो त्यामुळे मला नाही माहित कुणी खून केला ते?
गुरुजी : मुलाण्या तू सांग बर अब्जालखानाचा खून कोणी केला?
मुलाणी : ओ गुरूजी मै नही किया अब्जालखानका खून बीण वो दातऱ्या किया होगा, मै देख्या उसको मागके आठवडे वो शाळा सुटनेके बाद तिकडे घुम्या रहा था. उसनेच माऱ्या होंगा अब्जल चाचाको.
दातीर : दात तोडून हातात देईल मुलाण्या माझे नाव घेतले तर, मी नाही केला अब्जालखानाचा खून. आणि काय पुरावा आहे कि मीच अब्जालखानाचा खून केला म्हणून.
होका गुरुजी त्या मुलान्यावर काय इश्वास ठिऊ नका मला वाटतेय त्यानंच मारले असेन अब्जालखानाला, तशिबी ह्याला बोकड कोंबड कापायची सवय हाय.
( मुलाणी व दातीरची तुंबळ हाणामारी चालू होते व वर्गातील बाकीची पोरे घोळका करून मजा बघत आनंदाने नाचून त्यांना अजून पेटवत असतात. त्यावड्यात मुलाणी त्याच्या कम्पासातील कर्कटक काढून दातऱ्या दिशेने जोरात फेकतो, परंतु दातऱ्या नेम चुकवतो व ते कर्कटक जोरात जाऊन गुरुजींच्या दंडात घुसते)
गुरुजी : (वेदनेने जोरात विव्हळत व केकटत) आयो आयो आयो मेलो रे... पळा आयxxxनो मूर्खांनो येतून, अब्जालखानाचा खून राहुद्या कोणी केला ते आज मात्र माझा खून झाला असता, या मूर्खाच्या शाळेत काम करण्यापेक्षा आजच बदली चा अर्ज देतो आणि नाही बदली झाली तर राजीनामा देतो.
( तेवड्यात घंटा वाजते पोरे दफ्टर घेऊन पळून जातात व गुरुजी दंड चोळत तसेच बसून राहतात).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol भारी

अवांतर : त्या शिवी ऐवजी xxxxx अस काहीतरी लिहाल का?? तुम्हाला योग्य वाटलं तर..नाहीतर राहूद्या...