रोख जो पराजय वारंवार येतो

Submitted by निखिल झिंगाडे on 27 July, 2017 - 11:18

एकटेपणाचा मला आज राग येतो
कधी थोडा कधी फारफार येतो

रात्र वैरी आहे जपून चाल पूढे तू
रोख जो पराजय वारंवार येतो

कुठे दूष्काळ कुठे उपासमार आहे
गरज नाही जेथे तेथे धुंवाधार येतो

सावर स्वतः राहू दे तपस्या अभंग
मदनाचा तीर का निशाणी आरपार येतो

कधी तू श्रीराम कधी रावण होतो
केव्हा उजेड केव्हा घेउन अंधार येतो

Group content visibility: 
Use group defaults