सोनेरी गवत भाग २

Submitted by निर्झरा on 27 July, 2017 - 06:25

https://www.maayboli.com/node/63245 भाग १
ह्या आधीच्या भागात.....
“अवनी…. अग एका रात्रीसाठीच तर चाललोय. तुला ईथ एकट रहाव लागेल हे मी तुला आधीच सांगीतलय. मला हे पण माहित आहे की माझी बायको भित्रट नाहिये. आठवतयना आपण मनालीला गेलो असताना तू कशी हिम्मत दाखवली होतीस”
ईथून पुढे......

‘मनालीची गोष्ट वेगळी होती, तेव्हा आजूबाजूला लोक होते. माझ्या ओरडण्यामुळे दहा – बारा लोक जमा झाले होते. तसही तू ही गोष्ट सारखी सारखी का आठवण करून देतोस. माझी झालेली फजीती आठवून तुला आनंद होतोना. त्या वेळी मी खुप घाबरले होते त्या माणासाला बघून, मला काय माहित तो त्या हॉटेलचाच एक कर्मचारी आहे ते. आपण हॉटेल मधे शिरायला आणि त्याने आपल्या नकळत मागून येऊन माझ्या हातातली बॅग घ्यायला त्याचा हात पुढे केला. त्याच्या अश्या अचानक येण्याने मला वाटल की चोरच आला आहे आणि माझी बॅग चोरायचा प्रयत्न करत आहे. म्हणून मी ओरडले होते. ईथे तस नाहीये. आजुबाजुला कोणीच नाहीये. रूपाचा पण काही ऊपयोग नाही. काही झाल तर…..’
“काही होणार नाही अवनी. तु असा का विचार करतेस. ईथे कोणीच येत नाही. तु घाबरू नकोस. हे बघ मला जाव तर लागेल, खुप महत्वाची मिटींग आहे. मी तुला अधुन मधून फोन करत राहीन.”

(रात्रीच जेवण आटोपून दोघी झोपायला जातात)
‘रूपा आज आपण दोघी हॉल मधेच झोपूयात.’
“ताईसाहेब तुम्ही घाबरू नका. काही होणार नाही.”
(रात्रीचे दोन वाजलेले आसतात, बाहेर काहीतरी हालचाल चालु आहे अस अवनीला वाटत. ती ऊठून रुपाला हाक मारते, पण रुपा तिच्या जवळ हॉल मधे कूठेच दिसत नाही.)
‘रूपा…., रुपा…… कूठे आहेस तू. लवकर ये मला भिती वाटतीये. रुपा…… कुठे गेली असेल ही.’
(अवनी ऊठून सगळ घर शोधून काढते. रूपा कूठेच दिसत नाही. मग ती बॅटरी घेऊन हॉल मधून बाहेर व्हरांड्यात येते. दारावरच्या दिव्याच्या पिवळ्या उजेडात फक्त पंख किडे ऊडताना दिसतात. समोर मात्र भयाण अंधार असतो. रातकिड्यांची किरकिर चालू असते. मधूनच हवेच्या झूळकेने झाडांची पान सळसळ करतात. बॅटरीच्या ऊजेडात अवनी रुपाला ईकडे-तिकडे शोधते, तिथेही रुपा नसते. अवनी पुन्हा हॉल मधे येते आणि दचकते. रूपा तिच्या जागेवर येऊन झोपलेली असते.)
“ताईसाहेब… ताईसाहेब ऊठा, लै वेळ झोपलाय आज. माझ कवाच आवरून झाल. नाष्टा पण तयार आहे.”
‘अं…, रूपा…. रुपा अग काल रात्री कूठे गेली होतीस? मी किती घाबरले होते.’
“ मी कुठ जाणार , ईथेच तर होते की तुमच्या जवळ.”
‘अग मला रात्री जाग आली होती, बाहेर काहीतरी आवाज येत होते. मी ऊठून बघितल. तू.. तू जागेवर न्हवतीस.’
“ हा ते व्हय. मी तर तवा घरातच होते. तहान लागली म्हणुन आत गेले व्हते. मी बाहेर आले तेव्हा तुमीच हातात बॅटरी घेउन बाहेर गेलेल पाह्यलं तुम्हाला. मला वाटल दार नीट लावल की न्हाई बघायला गेला असाल. मग मी परत माझ्या जागेवर झोपले.”
‘अग पण मी तुला सगळी कडे शोधल होत घरात. तेव्हा तर तू घरात कुठेच…...’
“ताईसाहेब, आधी नाष्टा करा बर. तुम्हाला भास झाला असल. चला आपल्याला आज बंगल्याच मागच अंगण आवरायच हाय. साहेब यायच्या आत सगळ काम संपवायच हाय.”
हम्म्… , तु म्हणतेस तस मला भास झाले असतील. म्हणतात ना माणसाच्या मनात जे असत तेच स्वप्नात दिसत. चल आवरून कामाला लागू.
(दोघी जणी बाहेर अंगणात झाडांची मशागत करत असतात.)
“ताईसाहेब एक ईचारू का?”
‘हो विचार की.’
“तुमच्या लग्नाला म्हने दोन वर्ष झाली. मग तुम्हाला मुलबाळ….”
‘रुपा अजुन एक वर्षभर तरी आम्ही मुलाचा विचार करणार नाही. रुपा तुझा नवरा कसा गेला ग? तू दुखावणार नसशील तर सांग.’
“ त्यो होय. अव काय सांगायच तुम्हाला. त्याला न्हाइ ते धंदे करायची सवय लागली हुती. त्या पायी त्याचा जीव गेला. ताईसाहेब माझ इथल सगळ गवत काढून झालय.”
‘रूपा जरा त्या बाजूला ते वाळलेल सोनेरी गवत आहे बघ, ते जरा काढून टाक ना. बागेची शोभा जातीये त्याच्यामुळे.’
“कायबी काय बोलताय ताईसाहेब!, अव ते गवत….ताईसाहेब एक सांगू का, ते गवत काढू नका. आता पावसाळा आलाय. छान हिरवगार होईल बघा पावसान.”
‘बर, तु म्हणतेस तर राहूदे, पण तुला एवढ दचकायला काय झाल?’
“अं, कुठ काय, ते मला….. नाही म्हनजी ते गवत आमी कधीच काढत नाय. ते पाटलांसनी आवडत नाय त्या बाजूच गवत काढलेल म्हनून..
‘अस्स् होय, राहूदे मग. रूपा हा बंगल्याचा मागचा रस्ता जंगलातुन पुढे कुठे जातो ग? तुला माहीत आहे काही ईथल.’
“नाही, मला नाही माहीत. ईकड फारस कोणी येत नाही. अन गेले बरेच दिस कोनी रहायलापन आलेल नाही.”
‘मग ईथली झाड इतकी हिरवीगार कशी. त्यांना पाणी कुठून मिळत.’
“ते पाटिल येतात न्हव अधन मधन. तेच करत्यात बंगल्याची देखभाल.”
‘रुपा चल अंधार पडायला लागलाय, स्वय्ंपाकाच पण बघायचय. साहेब येतीलच थोड्यावेळात. बाकीच नंतर आवरू.’
----------------------------------------------------------------------------------------------------
“अवनी, अवनी… “
‘मोहित, लवकर आलास की. चल फ्रेश हो जेवण तयार आहे. आणि काय रे गेल्या पासून एक सुद्धा फोन केला नाहीस. माझी तुला किती काळजी आहे ते दिसल यातन.’
“अग किती वेळा फोन लावला तुला, पण दरवेळी नॉटरिचेबल येत होता. बहूदा तुझ्या फोनला ईथे रेंज मिळत नसेल. तुझी काळजी आहे मला , तु घरी एकटी आहेस म्हणुन जरा लवकरच काम संपवल आणि तडख निघालो. आलोच फ्रेश होऊन. लगेच जेवयला वाढ. लवकर झोपायचय आज. दिवसभराच्या मिटींगने दमलोय.”
‘रुपा दरवाजे नीट लावूनघे. काही लागल तर हाक मार. आम्ही वर झोपायला जातोय.’
‘जी ताईसाहेब, तुम्ही झोपा आता. मी बघते मागच सगळ’
“अवनी, ही रुपा ईथे आल्यावर चांगलीच सुधारलीये की. हिच्याकडे बघून कोण म्हणेल हिच्या डोक्यावर परिणाम झाला होता म्हणून.”
‘हो मोहित, ती जेव्हा पाटलांच्या घरून ईथे आली होती तेव्हाची रुपा आणि आत्ताची रुपा खुप फरक पडलाय तिच्यात. आता तिला कामाची पण ईतकी सवय झालीये की मी सांगायच्या आत तिच काम तयार असत. बर झाल तिला आपण ईथ आणल. कदाचीत तिथ सगळ्यालोकांमधे तिची कुचंबना होत असणार. ईथे तिला मोकळ वाटत असेल.’
“अवनी, तुला एक सांगायचय. माझी आजची मिटींग खुप छान झाली. पण…. बॉसनी मला पुढ्च्या मिटींगसाठी जायला सांगीतलय.”
‘अरे मग त्यात काय, जाऊन येना आज गेला होतास तसा.’
“तेच तर, या वेळेस मी फक्त एका दिवसासाठी गेलो होतो. पुढ्च्या मिटींगला मला चार दिवसांसाठी जायचे आहे. ते पण चेन्नईला आणि परवा लगेच निघायच आहे.”
‘क्काय?, मोहित कालची रात्र मी कशीबशी काढली. पण चार दिवस मी ईथे एकटीच.’
“हंम्म्म्म, त्याला आता आपण काही करू शकत नाही. तुला आता असच एकट रहाव लागणार आहे. निदान हा महिनातरी असाच मिटींग मधे जाणार आहे.”
‘ठिक आहे. पण मग एक काम करना माझ. मला काही नवीन झाड आणून दे. ती लावण्यात मी माझा वेळ घालवेन आणि बागकामाच काही साहित्य पण आणुन दे.’
“उद्या ऑफिसवरून येताना मी घेऊन येईल सगळ.”
(मोहीत त्याच्या मिटींगसाठी निघुन जातो. घरात फक्त रुपा आणि अवनी असतात.)
‘रुपा आता चार दिवस साहेब घरात नाहियेत. आपण अस करूयात आधी ही सगळी झाड लावून घेऊयात. मग उद्याच्याला ती खालची अडगळीची खोली आहे ती आवरून घेऊयात.’
“जी ताईसाहेब”
(अवनी आणि रुपा मिळून सर्व झाड लावतात. रात्री सगळ आवरून दोघी हॉल मधे झोपतात. दमल्यामुळे दोघींना लगेच झोप लागते. मध्यरात्री अवनीला कसल्यातरी आवाजाने जाग येते. ती उठून बघते. या वेळी पण रुपा तिथ नसते. अवनी बॅटरी घेऊन पुन्हा एकदा सगळी कडे शोधते. रुपा कुठच दिसत नाही. बंगल्याच्या मागच्या बाजूला तिला कसले तरी आवाज येतात, ती त्या दिशेने चालू लागते. किचन शेजारच्या पॅसेज मधून ती मागच्या दारापर्यन्त पोहोचते. तोच एकदम आवाज बंद होतात. तेवढ्यात अवनीला मागून रुपाचा आवाज येतो.)
“ताईसाहेब…. ताईसाहेब कय करताय ईकड?”
‘अं, रुपा …. अग कुठे जातेस तू अशी मधूनच उठून. मी सगळ घर शोधल. किचन मधे पण न्हवतीस तू. मला या बाजूने काही आवाज येत होते. तेच बघायला मी चालले होते.’
“ त्याची काही गरज नाही ताईसाहेब. मी आत्ता तेच बघायला बाहेर गेले होते. काही नाहीये बाहेर. तुम्ही झोपा आता.”
-------------------------------------------------------------------------------------------------------------
‘रुपा चल आज आपल्याला ती अडगळीची खोली आवरायची आहे.’
“ताईसाहेब, तुमच तिथ काहीच सामान न्हाई, मग कशापई उगा त्या धुरळ्यात जाताय. लै दिस बंद हाये बंगला, मला तिथ जायची भिती वाटते. काही जनावर असल म्हंजी”
‘असून असून काय असेल झुरळ नाहीतर पाली किंवा फार फार तर उंदीर. त्यांना काय घाबरायचय. आणि ना मला जुन्या वस्तू फार आवडतात. नक्कीच काहीतरी छान अँटीक पीस मिळेल तिथे मला. जितके दिवस बंगल्यात आहोत ते ठेवीन मी ईथ शो पीस म्हणुन. खुप दिवसांपसून मला अस तळघर बघायची ईच्छा होती. म्हणुन मला जायचय तिथ.”
(दोघीजणी तळघराच्या दरवाजा जवळ जातात. तळघराचा दरवाजा कूलूप लावून बंद केलेला असतो.)
‘रुपा या कुलुपाची चावी कुठे असेल माहीतीये का तुला?’
“ती त्या शेजारच्या खिळ्यालाच असते. …..थांबा मी बघते. …..इथ तर चावी न्हाई.”
‘मग आता ग, आपण अस करूयात हे कुलूप तोडूयात. मी नवीन आणुन लावेल ईथे परत. जा कुलूप तोडायला काहीतरी घेऊन ये.’
(दोघी मिळून त्या दाराच कुलूप तोडतात. ते भल मोठ कुलूप तोडायला त्यांना खुप कष्ट पडतात. अवनी दरवाजा ढकलायचा प्रयत्न करते. पण तो उघडत नाही. मग दोघी मिळून त्या दाराला जोरात धक्का देतात त्याच क्षणी दारात एक फट तयार होते. अवनी दाराला ढकलते तस करकर आवाज करत दार उघडते. समोर नुसता अंधार असतो. अवनी शेजारच्या भींतीवरच एक बटन दाबते. त्याच वेळी बल्ब् चालू होतो अन् फट आवाज करत बंद होतो. अवनी बॅटरीचा उजेड आत मारते. समोर खाली जाणारा एक जिना तिला दिसतो. दोघी मिळून खाली जातात. नानातर्हेच्या वस्तू तिथ कापडात झाकून ठेवलेल्या असतात. एक एक करत अवनी त्या वस्तुंवरच कापड काढते, तस तिथ धुरळा उठतो आणि अवनीला ठसका लागतो. अचानक रुपा ओरडते. तिच्या पाया जवळुन एक उंदिर पळून जातो. काही वेळ दोघी जरा घाबरतात. वेग वेगळ्या प्रकारच्या नक्षिदार वस्तू बघून अवनी खुष होते. वस्तुंवरच्या जाळ्या जळमट दूर करत ती त्या उघडत असते. बरच सामान बघून झाल्यावर त्या खोलीच्या एका कोपर्‍यात जातात. अवनी एकदम हातने नाकाला झाकून घेते. एक प्रकारचा कुबट वास तिथ पसरलेला असतो. त्या जागी जास्त वेळ उभ राहणही शक्य नसत. अवनी थोडफार तिथल सामान हलवते आणि समोररच दृष्य बघून दचकते. समोर वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि माणसांचे सांगाडे तिला दिसतात. असंख्य उंदीर तिथ वळवळत असतात. नुकतीच जन्माला आलेली पिल्ले कवट्यांच्या डोळ्यांच्या खोबणीतून बाहेर डोकावत असतात. छातीच्या पिंजर्यावरून झुरळ फिरत असतात. हे सर्व बघून त्या दोघी तिथून लगेच बाहेर येते.)
“बघा म्हणल होत ना ताई तुम्हाला. उगाच गेलो आपण तिथ.”
‘रुपा अग हे सगळ ईथ कोणी ठेवल असेल आणि कधी पासून हे सगळ असच पडल आहे . श्शी….., कसला घाण वास होता तिथ. मला तर तिथ आवरण शक्यच नाही. हे सांगाडे, हा काय प्रकार आहे.’
“ताईसाहेब तुम्ही त्यात न पडलेल बर. पाटलांनाबी ते आवडणार नाही. चला बाकीची काम करूयात. अन् परत ईथ नको यायला.”
(दोघींचा दिवस असाच काहीन काही काम करण्यात जातो. रात्री पुन्हा अवनीला काही आवाज येतात. दरवेळीप्रमाणे रुपा खोलीत कुठेच नसते. या वेळी मात्र ती मागच्या दरवाजाकडे बघायला जाते. अवनी दरवाजा जवळ पोहोचते. दरवाज्याच्या जवळची खिडकी ती हळूच उघडते आणि त्या फटितून बाहेर बघते. तिला समोर रुपा दिसते. ती त्या गवता जवळ बसून काहीतरी बड्बड करत असते. नक्की काय चालू आहे ते अवनीला कळत नाही. तिला वाटत बहूदा रुपाला अधून मधून झटके येत असावेत. अजुन ती पुर्ण बरी झाली नाही. ती रुपाला हाक मारणार तोच रुपा तिची बडबड संपवते आणी माघ वळते. बंगल्याच्या पुढच्या दारातून ती आत येते आणि तिच्या जागेवर झोपते. अवनी कसबस तिच्या जवळ झोपायचा प्रयत्न करते. रात्रभर अवनीचा डोळ्याला डोळा लागत नाही. बाहेर जरा उजाडायला लागत तस अवनी उठून बाहेर त्या गवताच्या जवळ जाते. पण तिला तिथ काहिच दिसत नाही. जणू ईथ कोणीच आल नाही आणी काहीच घडल नाही. ती पुन्हा आत येते. रुपा एव्हाना उठलेली असते.)
‘रुपा आज जरा मला गावात जाऊन यायच आहे. तु ईथेच थांबशील का माझ्याबरोबर यायच आहे तुला. मला जरा जास्त वेळ लागणार आहे. कदाचीत संध्याकाळ होईल.’
“नाही ताईसाहेब . तुम्ही जाऊन या म्या ईथच थांबते. मला सवय हाय एकट रहायची.”
(अवनी गावात पोहोचते. थोडफर सामान खरेदी करून ती पाटलांच्या घरी जाते. पाटिल घरात नसतात. तिची भेट पाटलीनबाईंशी होते. चहा घेता घेता अवनी रुपाच्या नवर्याचा विषय त्यांच्या जवळ काढते. पाटलीनबाई काही वेळ एकदम शांत होतात. अवनी पुन्हा त्यांना त्याच्या मृत्युबद्दल विचारते. तस ईकड तिकड जवळपास कोणी नाही हे बघून त्या दबक्या आवाजात अवनीशी बोलू लागतात.)
“तुम्हाला म्हणुन सांगते, रुपाचा नवरा मांत्रिक झाला होता. त्याचीच विद्या त्याच्यावर उलटली म्हणे. कसलीतरी अघोरी पूजा करताना. त्याच्याच बाबाने त्याला मारल. तस नक्की कोनालाच माहित नाही त्यो कसा मेला. लोक तोंडाला येईल ते बडबड करतात. कही जण म्हणतात जंगलातल्या प्राण्यान खाल्ल त्याला. पन तुम्ही हे का विचारता.”
‘नाही असच. ते रुपा…’
(तेवढ्यात पाटिल येतात.)
क्रमशः

(तळटीप - ही कथा कॉपी पेस्ट केली आहे. त्यामुळे कदाचीत काही चुका असू शकतात. तसेच यात येणारी सर्व चित्र ही आंतरजालावरून घेण्यात आलेली आहेत.)

Group content visibility: 
Use group defaults