प्रेमाचं गणित

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 26 July, 2017 - 09:37

तुझं शंकुसारखं धारदार नाक
शुभ्रवर्णी दंतमाला
अन हसल्यावर उमटणारा
गालावरचा पॅराबोला

इंटिग्रेशनच्या चिन्हासारखे तुझे
लिमिटबद्ध लांबसडक केस
डोळ्यांमधले कूटप्रश्न अन
देहबोलीचे अॅनालॉग संदेश

तू मॉडमध्ये टाकल्यासारखी
नेहमी पॉझिटिव्ह असायची
अपुर्णांक होतो मी
वजाबाकीच फक्त जमायची

तू आयुष्यात आलीस अन मला
शुन्याचा शोध लागला
जगण्याचा भाव माझा
दसपटींनी वाढला

माझ्या खिशातल्या पाकिटाचं
व्हॉल्यूम तू कधी पाहिलं नाहीस
तुझ्या नातेवाईकांच्या स्वभावाचं
घनफळ मी मोजलं नाही

माझे प्रश्नचिन्ह तू वाचलेस
तुझे स्वल्पविराम मी वेचत गेलो
वेगवेगळी समिकरणं होतो आधी
एकत्र आलो अन सुटत गेलो

------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!!!!!!
अन हसल्यावर उमटणारा
गालावरचा पॅराबोला
इंटिग्रेशनच्या चिन्हासारखे तुझे
लिमिटबद्ध लांबसडक केस
>> Lol

मस्तच!
आधी वाचलेली तेव्हाही आवडली होती. Happy

व्वा S S .. सुरेख ...

वेगवेगळी समिकरणं होतो आधी
एकत्र आलो अन सुटत गेलो

प्रेमाचं गणित सुटलं तर...

पण उत्तर काय आलं?

मस्त