'सोनेरी गवत'

Submitted by निर्झरा on 26 July, 2017 - 06:31

“सोनेरी गवत” भाग १
Gavat.jpg

‘मोहित सांगनारे आपण नविन बंगल्यात कधी शिफ्ट होणारे?’
“अग ईतकी काय घाई झालीये. बस्स अजुन दोन – चार दिवस थांब. माझा बॉस आला की त्याच्याशी बोलतो आणि मग लगेच आपण शिफ्ट होऊ. तसही तिथे तुला एकटीलाच रहाव लागणार आहे हे माहीतीयेना तुला.”
‘हो मला माहीती आहे. तुझ्या मिटींग्ज् सुरु होणारेत. त्यासाठी तुला फिरतीवर रहाव लागणार आहे. बंगल्यात कोणी ना कोणी असेलच ना माझ्या मदतीला. मी सामान पॅक करायला घेते. आपण अस करूयात फक्त मोजकच सामान घेऊन जाऊयात. तसही फक्त दोन वर्षाकरताच जायचय आपल्याला. तुझ काय म्हणनय?’
“हे बघ अवनी, तुला काय योग्य वाटतय ते कर. मला सध्या हे हातातल काम संपवण महत्वाच
आहे. आपण जायच्या आधी माझ ईथल काम मला संपवायचय.”
( चार दिवसांनंतर )
“अवनी….. अवनी अग कुठ आहेस तू? लवकर ये तुला आनंदाची बातमी द्यायचीये.”
‘अरे आले थांब, काय झाल? किचन मधेच होते मी, बोल का हाक मारतोयस?’
“अग तू ज्याची ईतके दिवस वाट बघतियेस तो दिवस आलाय!”
‘म्हणजे…आपण त्या बंगल्यात !’
“हो … हो; आपण उद्याच त्या बंगल्यात शिफ्ट होतोय. चल लवकर तयारीला लाग.”
‘अरे थांब, सगळ सामान केव्हाच पॅक करून ठेवलय. फक्त हे वर-वरच सामान भरल की झाल. तु थोडी मदत केली की लगेच सगळ आवरून होईल.’
“हो नक्कीच बोल काय करू मदत.”
‘मोहित !!!, अरे कामात मदत करायचीये. उगीच भलत्या वेळेला लाडात येऊ नको, सोड मला..’
“ह्म्म्म तुझ हे नेहमीचच आहे. जरा कुठ मूड झाला की …..”
‘तुझ पण असच आहे, नको तेव्हाच मूड होतो तुझा. चल मदत कर मला.’
(मोहित आणि अवनी नविन बंगल्यात पोहोचतात.)
Bunglow.jpg

‘व्वॉव !! मोहित कित्ती छान आहेरे बंगला. हे गुलाबाच झाड बघना कित्ती छान बहरलय आणि रंग पण वेगळाच आहे. हा मोगरा पण बघ कसा मस्त दरवळतोय, आणि हे बघ मोतीया रंगाचा गुलाब. मला खुप आवडतो हा. अगदी मला आवडणारी सगळी झाड आहेत ईथे. तु नसताना या झाडांसोबत खुप छान वेळ जाईल माझा.’
“ अग अजुन आत बघ. तुला हवा तसा बंगला आहे हा. मला माहीत होत तुला हा बंगला नक्की आवडेल ते. अग ऑफिसनी ह्या गावतला बंगला दिला होता. पण मीच त्यांच्या कडुन हा गावाबाहेरचा बंगला मागीतला. हा बंगला पाटलांचा आहे. ऑफिस मधे या बंगल्याबद्दल मी खुप ऐकल होत. तेव्हा पाटिल स्वतः रहायचे ईथे. आता बरेच दिवस झाले हा बंगला बंद आहे अस कळल मला. मग मी त्याच्याकडे हाच बंगला मागीतला. आधी तयारच न्हवते द्यायला. खूप विनवणी केल्यावर मग दिला. ईथ कस सगळ शांत आहे. सगळ्या गजबटापासून दूर. फक्त एक अडचण आहे…”
‘ईतक्या छान बंगल्यात काय अडचण आहे?’
“अग ईथे कोणीच काम करायला मिळत नाहीये. गावापासुन लांब आहे, त्यामुळे कोणीच यायला तयार नाही.”
‘अरे मग पुर्णवेळ बंगल्यात राहणारा अस बघायचना.’
“हो, ते पण विचारल, पण या बंगल्यात रहायला कोणीच तयार नाही. आता हा निर्णय मी तुझ्यावर सोडतो. घरकामाच कस करायच ते तू ठरव. चल मला खुप भुक लागलीये. आधी खाऊन घेऊ, ते पार्सल फोड.”
(बघता बघता या बंगल्यात मोहित आणि अवनीला तीन महिने होतात)
‘मोहित अरे कोणीतरी मदतीला हवयरे मला. हा बंगला खुपच मोठा आहे. दिवस कमी पडतो मला सगळ आवरायला. तसही आत तुझ्या टुर्स पण सुरू होतील. मला कोणाची तरी सोबत होईल.’
“अवनी मी तुला आधीच सांगीतलय की घरकामाच तू कस करणार आहेस ते तू ठरव. आता ईथे कोणीच कामाला मिळत नाहीये, मग तुच सांग कस करायच.”
‘मी काल गावात गेले होते, काही सामान खरेदी करायच होत. तिथ मला पाटिल भेटले. मी नको म्हणाले तरी मला त्याच्या घरी चहाला घेऊन गेले. त्यांच्या घरात बरेच जण होते काम करायला. मी सहज त्यांच्याकडे बंगल्यातल्या कामासाठी कोणी माणुस काही दिवसांसाठी देता येईल का म्हणुन विषय काढला. तर हिला घेऊन जा म्हणाले. मला तिथे रूपा भेटली. पाटलांकडच कामाला होती. गरीब आहे खुप. तिच्या माग – पुढ बघणार पण कोणी नाही. मी तिला बंगल्यातल्या कामा बद्दल विचारल. ती तयार आहे आपल्या बंगल्यात काम करायला. तुझ काय म्हणन आहे.’
“तू तिची निट चौकशी केलीस का?, अस एकदम तिला आपल्या घरात घ्यायच म्हणजे…”
‘अरे मी पाटलांकडे चौकशी केलीये. आधीपासून पाटलांच्याच घरी होती कामाला. बिचारीचा नवरा गेला आणी…. तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झाल. पण आता ती ठिक झालीये. पाटलांनी तिच्यावर उपचार केले म्हणे. पण तिची अवस्था बघून तिला बाहेर कोणी काम देत नाही. मग पाटलांनी तिला त्यांच्याकडे ठेवल. तिला जमतील अशी काम देतात ते तिला. मी पाटलांशी बोलले तिच्या बद्दल. ते तिला आपल्याकडे पाठवायला तयार झालेत.’
“ठिक आहे. तुला हे सगळ बरोबर वाटतयना. कधी येतीये ती कामावर.”
‘अरे येतीये काय, ती आज सकाळीच आलीये. तु ऑफिसला गेलास, आणि पाटलांची गाडी आली. ते सोडून गेले तिला ईथ. आत्ता बंगल्याच्या मागच्या बाजूला काहीतरी काम करतीये. मोहित….. जाता जाता पाटील म्हणत होते की सांभाळून रहा बंगल्यात. मी त्यांना विचारल की अस का बोलताय, त्यावर ते काहीच बोलले नाहीत. फक्त बंगल्यात सगळीकडे नजर फिरवली आणि ते निघून गेले.’
“तु कशाला याचा विचार करतेस. बंगल्याच्या मागच्या बाजूला जंगल आहे. एखाद्या प्राण्याचा वावर असेल ईथे म्हणून म्हणाले असतील. तुला कोणीतरी मदतीला मिळाल हे फार बर झाल.”
(बघता बघता अवनी आणि मोहितला नविन बंगल्यात येऊन सहा महिने होतात)
‘रुपा नाष्टा आण लवकर, साहेबांना उशीर होईल.’
“आत्ता आणते ताईसाहेब.”
“अवनी या रुपाची तुला खरच खुप मदत होतेय.”
‘हो मोहित, लहान सहान गोष्टीत तिची खुप मदत होते मला.’
“बर ऐक, आज मी घरी येणार नाहीये रात्री.”
‘क्का? कुठ जाणारेस?’
“मला जरा मुंबईला जायचय, ऑफिसच एक काम आहे. माझा एक मित्र पण आहे बरोबर. ऑफिस मधून तसच निघू आम्ही. उद्या रात्रीपर्यन्त येऊ परत.”
‘अरे पण या एवढ्या मोठ्या बंगल्यात मी ईथे एकटी…..अजून सवय नाही झाली मला या बंगल्याची.’
“अवनी…. अग एका रात्रीसाठीच तर चाललोय. तुला ईथ एकट रहाव लागेल हे मी तुला आधीच सांगीतलय. मला हे पण माहित आहे की माझी बायको भित्रट नाहिये. आठवतयना आपण मनालीला गेलो असताना तू कशी हिम्मत दाखवली होतीस”
(तळटीप - ही कथा ईतर ठिकाणी लिहीली असून कॉपी पेस्ट केली आहे. कदाचीत काही चुका असू शकतात. तसेच यात येणारी सर्व चित्र ही आंतरजालावरून घेण्यात आलेली आहेत.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users