दिंडी

Submitted by अनन्त्_यात्री on 24 July, 2017 - 04:25

अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी
लॅपटॉपी कीबोर्डाच्या चटचट अहर्निश चिपळ्या
निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग
वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण
जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या

तिथे सुदूर चंद्रभागेकाठी
काळाभोर
त्याच्या अट्टल दगडी मौनातल्या शयनी एकादशीत
कल्पांतापर्यंत अविचल

Group content visibility: 
Use group defaults