कृष्ण लीला v/s हॅरी पॉटर

Submitted by पद्म on 23 July, 2017 - 08:15

आज हॅरी पॉटर नावाचा धागा पहिला आणि मलाही या विषयावर बोलण्याची इच्छा झाली.
आज हॅरी पॉटर चित्रपट पाहून मला ६ ते ७ वर्ष झाले, म्हणून जास्त नावं वगैरे आठवत नाहीयेत पण कथा मात्र आठवतेय.
लेखिकेने कुठून इन्स्पिरेशन घेऊन ही कथा लिहिली, माहिती नाही! पण वैयक्तिक पातळीवर मला कृष्ण लीला आणि हॅरी पॉटरमध्ये खूप साधर्म्य वाटतं.

पहिल्याच भागापासून कळते की, चित्रपटाच्या खलनायकाला हॅरी पॉटरचा खून करायचा असतो आणि त्यासाठी तो त्याच्या जन्मापासूनच प्रयत्न करतो. पण आपल्या बाळाला वाचविण्याकरिता त्याचे आईवडील स्वतःच्या प्राणाचे बलिदान करतात. कृष्णलीलेत कंसाला देवकीच्या लग्नातच कळते, की हिचा आठवा पुत्र माझा काळ असेल; म्हणून तो देवकीचे प्राण घ्यायलाही तैयार असतो. पण वसुदेव काहीतरी युक्ती करून पत्नीला वाचवतो. आणि कृष्णाला वाचवण्यासाठी ते भरपूर बलिदान करतात.

त्यानंतर आपण चित्रपटात पाहतो कि, हॅरीला मोठा होईपर्यंत जादुई नागरीपासून दूर दुसऱ्या कोणाच्यातरी घरी सुरक्षित ठेवलं जातं. तसंच कृष्णालाही मथुरेपासून दूर वृंदावनात नंद आणि यशोदेच्या संरक्षणात ठेवलं जातं.

हॅरी मोठा झाल्यावर त्याचा एक शुभचिंतक त्याला परत जादुई दुनियेत घेऊन जाण्यासाठी येतो, त्याचप्रमाणे कृष्णलीलेतही कृष्ण मोठा झाल्यावर कृष्णाला घ्यायला मथुरेहून अक्रूर काका येतात.

त्यानंतर आपण पुढे पाहतो की त्या जादुई दुनियेत परत गेल्यावर खलनायक त्याच्या वेगवेगळ्या साथीदारांना/गुलामांना हॅरीला मारण्यासाठी पाठवतो, पण प्रत्येक वळणार हॅरी नेहमी विजयी ठरतो. कृष्णलीलेतही कृष्णाला मारायला लहानपणापासूनच कंस भरपूर राक्षसांना मारायला पाठवतो, जसे पुतना, तृणावर्त, शकटासूर, अरिष्टासुर, प्रलंबासुर, बकासुर, अघासुर, ई.. पण प्रत्येक वेळी कृष्ण आणि बलराम मिळून सर्वांचा संहार करतात.

आणि चित्रपटात अश्याच भरपूर छोट्या मोठ्या घटना घडतात आणि शेवटी हॅरी खलनायकाचा अंत करतो. त्याचप्रमाणे मथुरेला गेल्यावर कृष्ण कंसाचा वध करतो.

चित्रपटाच्या शेवटी कळते की भरपूर लोकांचे मृत्यू आणि भरपूर घटना या preplanned होत्या. आणि कृष्णलीला ही लीला असल्याकारणाने योगमायेकडून आधीच preplanned होती.

मी अस म्हणत नाहीये की हॅरी पॉटरची कथा कृष्णलीलेतून घेतली, कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. फक्त मला भरपूर गोष्टी(सगळ्या नाही) सारख्या वाटल्या म्हणून मी लिहिलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही आहे.. आणि खूप शक्य आहे. एकूणातच महाभारत फार अचाट आहे. जगातली कुठलीही कथा त्यात सापडू शकते.

अत्यंत अभ्यासू व संयत लेखन. जगातील सर्व गोष्टींचे मूळ अशाप्रकारे भारतातच सापडते, हे यावरून दिसून येते.
गोकुळात कृष्णाचे हाल झाले नाहीत उलट त्याला राजपुत्र म्हणून वागवले गेले वगैरे मायनर फरक सोडुन देउ आपण.

पण महाभारतच कशाला हवंय? साधं होरक्रक्सचं बघा. लहानपणी जादूगाराच्या गोष्टी वाचताना त्याचा जीव कुठल्या तरी पोपटात ठेवलेला असायचा. हो की नाही? होरक्रक्सची आयडीया यावरूनच सुचलेली आहे.

तेव्हा इंग्रजांनी आपल्याकडूनच या कल्पना चोरून नेल्या आहेत हे स्पष्ट होते.

अशा प्रकारचे अधिकाधिक संशोधनात्मक लेखन यायला हवे.

बीएम्केजे

विनोदी तुलना Lol

तुम्ही , व्यासोच्छिटम जगदसर्वम फारच मनावर घेतलेलं दिसतेय

वैयक्तिक पातळीवर मला कृष्ण लीला आणि हॅरी पॉटरमध्ये खूप साधर्म्य वाटतं.
>> तुमच्या मताचा आदर आहे , पण एवढ्या ढोबळ मानाने साधर्म्य काढल तर कुठल्याही दोन गोष्टीत आढळेल Happy

बकासुराला भिमाने मारले ना?

आणि चित्रपटात अश्याच भरपूर छोट्या मोठ्या घटना घडतात
हे साम्य सगळ्यात जास्त आवडलं

बकासुराला भिमाने मारले ना?>>> एका नावाचे २ असुर होते.

डिटेल्स जरी थोड्या वेगळ्या असल्या, तरी थीम मला भरपूर प्रमाणात समांतर वाटते.

पद्म तुम्ही दाखवलेले साम्य पटण्यासारखी आहेत, ईटरेस्टीण्ग आहेत. आता याला प्रतिवाद म्हणून कोणी फरक दाखवायला सुरुवात केली तर ते चिक्कार निघतील. जुळ्या भावण्डांमध्येही फरक असतो तर दोन कथांमध्ये का नाही निघणार. पण दहा साम्यांना प्रतिवाद म्हणून वीस फरक दाखवले तरी दहा साम्यांमधील सत्यता बदलणार नाही हे देखील तितकेच खरे आहे.

पण एवढ्या ढोबळ मानाने साधर्म्य काढल तर कुठल्याही दोन गोष्टीत आढळेल 
>>>>

येऊद्या मग डीडीएलजे आणि महाभारतातील साम्य Happy

मी हॅरी पॉटरचे सारे भाग पाहिले नाहीत. सर्वात पहिला भाग पाहिला आहे आणि एक मधला कुठला तरी मित्रांच्या आग्रहाने थिएटरमध्ये पाहिलेला. पण जेवढे पाहिलेय त्यावरून समजते की त्यात काहीही फेकाफेकी दाखवलीय, आणि काहीही बंडल थापा मारल्यात. माझा तरी कश्यावरच विश्वास बसला नाही. आणि तसाच तो महाभारतातील कित्येक घटनांवरही नाहीये.

प्रश्नाचा उद्देश सरळ आहे. तुम्ही कुठल्या बाबा/पंथाचे भक्त आहात जेथे तुम्हाला अश्या आयडिया मिळतात. साधारण तुमच्या वयाच्या (म्हणजे तुम्ही लावलेल्या फोटोत जे वय दिसते आहे त्यानुसार) माणसाला कुठल्यातरी पंथाचे सभासद असल्याशिवाय अश्या कल्पना सुचत नाहीत.

च्रप्स म्हणजे craps होय Happy हे कधी ध्यानात आले नव्हते.

>>
अशा कल्पना सुचायला सभासद असणे जरूरी आहे का टवणे..
पदम ला खरच अशी कल्पना आली असेल डोक्यात हे असू शकत नाही का
>>>

मी शक्यता नाकारत नाहिये पण प्रोबेबिलिटी फारच कमी

च्रप्स म्हणजे craps होय Happy हे कधी ध्यानात आले नव्हते.>>>>>

हा हा... फायर बेट हिट केली होती त्यादिवशी जेंव्हा माबो सभासदत्व घेतले...

च्रप्स म्हणजे craps होय Happy हे कधी ध्यानात आले नव्हते.
<<

मुद्दाम केलेल्या crappy मराठी शुद्धलेखनानंतर तरी यायला हवे होते Wink

त्या घराला सर्व बाजूंनी आगीने वेढलं होतं, आणि आत नवरा बायको एकटेच होते...
बायको म्हणाली, "माझ्या मते आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असेल.."
"वेडी झालीस का? शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असती तर लाईट्स केंव्हाचे बंद झाले असते. माझ्या मते किचनमध्ये गॅस लीक झाला असावा आणि त्यामुळे आग लागलीये", नवरा.
"अहो पण गॅस तर आजच संपला म्हणून गॅसमुळे आग लागणं शक्यच नाही.."
आता त्यांना काहीही करून अगीचं कारण शोधून काढायचं होतं....

दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात पहिलीच बातमी होती, आगीत होरपळून एका दाम्पत्याचा मृत्यू!

दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात पहिलीच बातमी होती, आगीत होरपळून एका दाम्पत्याचा मृत्यू!
>>>
भाऊ पळून जा ना लवकर आग भडकायचा आत. थांबून का राहिला

हे तर आहेच ...
परंतु मी असे ऐकले आहे कि त्या JKR बाईच्या लहानपणी तिच्या शेजारी एक स्थलांतरित पंजाबी कुटुंब रहात असे.
ते पंजाबी आपल्या हरी नावाच्या मुलाला " हरी पुत्तर" अशी हाक मारत असत ते ऐकूनच JKR बाईना "हॅरी पॉटर" असे नाव सुचले, असे म्हणतात म्हणे !!