तुझे येणे

Submitted by दत्तात्रय साळुंके on 21 July, 2017 - 03:15

तुझे येणे

तुझे येणे कधी असते

अलवारपणे अलगूज वाजवत
मनावर थंड शिडकावा करणारे
अंग अंग मोहरुन टाकणारे
उत्साह ओसंडून वहावणारे
अन चैतन्य खुलावणारे

तेव्हा तू एक आश्वासक सखा असतोस

पण मला खटकते तुझे उनाडपण
जेव्हा तू तुझ्याच कैफात राक्षस होतोस

होत्याचे नव्हते करत
कळ्या कुस्करतोस

अक्राळविक्राळ हसतोस
चमचमते मोठे मोठे दात काढत

मुलचं काय मोठेही घाबरतात रे

कधी कधी तू येतच नाहीस
तिने कितीही आर्जवे केली तरी

अन करपते तिची काया
सरते सगळी रया

तू मात्र आखडतोस
सारे बंध तोडतोस

कस रे जमतं असं
नातं जोडून तोडायला

माझा विश्वासच बसत नाही
खरे रुप तुझे कळत नाही
माणसा सारखे

दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults