पारिजात

Submitted by गवंडी ललिता on 21 July, 2017 - 01:40

पारिजात

पहाटेचे मंद वारे
अंगणी प्राजक्ताचे सडे

काया नाजूक शुभ्रपाकळी
देठ केशरी मनास भाळी

श्वेत केशरी वस्त्र लेवूनी
साधूसंत हा भासे लोचनी

स्पर्शाने हा चूर होई
ओंजळीत हा रंग उधळी

रिमझिम धारात हा न्हाऊन येई
श्रावणात हा बहरून जाई

पारिजात हा पुण्यवान होई
चरणी सिद्धेश्वर अर्पण होई.
- ललिता गवंडी, अकोले

Group content visibility: 
Use group defaults

व्वा..सुंदर..
ताई, दोन कडव्यांमध्ये मोकळी ओळ सोडावी असं वाटतं...