सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे

Submitted by शिवाजी उमाजी on 20 July, 2017 - 16:01

सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे (विडंबन)

सांगून टाळणे अन् टाळून ते जाणे
मी जाणून आहे पक्का तुला शहाणे

घेवुनी इथे मी फ्रँक्चर पाय माझा
अशा प्रसंगी का विचार यावा तुझा
टाळता न टळले, इस्पितळात जाणे ।

क्रोध येतो मला तुला कसे कळावे
वांछित तुज होतो तेही ना उमजावे
ठरवून सुध्दा भेट, झाले न तुझे येणे ।

स्मरता कधी तुला हे दुःख दूर होते
राहूनी मौन स्वतःला सावरले होते
धरावी न अपेक्षा, असे मनात येणे ।

©शिवाजी सांगळे, मो.+91 9545976589

Group content visibility: 
Use group defaults