कार्यकर्ते

Submitted by संजय मेहेंदळे on 20 July, 2017 - 15:02

उचलतात सतरंज्या नेहमीच ते
फोटोत दिसत नसतात ते
हात बिनचेहऱ्याचे असतात ते
.
मिरवणूकीत नाचत असतात ते
नामोल्लेखात नसतात ते
पाय बिननावाचे असतात ते
.
दहीहंडीत खालती असतात ते
व्यासपीठावर नसतात ते
‘भक्कम पाया’ नावाखाली……
गाडलेले असतात ते
.
- संजय

Group content visibility: 
Use group defaults