पाऊल वाट

Submitted by गवंडी ललिता on 20 July, 2017 - 07:03

पाऊल वाट

नागमोडी वळणांनी नटली पाऊलवाट
कधी नेई डोंगरमाथी कधी जंगल वाट
कधी जाई माळरानी कधी झोपडीची वाट
पहा कशी वळणदार असे पाऊलवाट
काळ्या तांबड्या मातीने सजली पाऊलवाट
आल्या गेल्या पांथस्याची सांगे खूण गाठ
शेताकडे माय माझी सांगे पाऊलवाट
पहा कशी वळणदार असे पाऊलवाट
भिरभिरत्या सरीत भिजते पाऊलवाट
मखमली गवतांनी शृंगारते पाऊलवाट
थबकत थबकत वळणांनी नेई पाऊलवाट
पहा कशी वळणदार असे पाऊलवाट
परतुनी आल्या गायी सांगते पाऊलवाट
सांज वेळी दाखवी झोपडीची वाट
जाता येता चूकवी ना कुणाचीच वाट
पहा कशी वळणदार असे पाऊलवाट
बालपणीच्या आठवणींना जोडते पाऊलवाट
दूरदूर डोळ्यांना ना दिसे पाऊलवाट
काळ्या चकाकी रस्त्यात हरवली पाऊलवाट
शोधू कशी तिला अशी पाऊलवाट
ललिता गवंडी,अकोले,७७४१०८५५६६

Group content visibility: 
Use group defaults

किती छान लिहिलयं... Happy
साध आणि सरळ लिहिता ताई तुम्ही...
मी किती मिस केलं तुम्हाला.. एकदम गायबच झालात Sad