किस्ना - किस्ना - किस्ना -

Submitted by vijaya kelkar on 18 July, 2017 - 10:11

किस्ना -- किस्ना -- किस्ना --

किस्ना किस्ना किस्ना
जरासा थांबना
या लंगड्या विना
जाऊ नको राना

सारे गोप गडी
खोडी रे काढती
उगारता काठी
वाकुल्या दाविती

सदरा गबाळा
वेष ही बावळा
मनी भाव भोळा
गुंतला सावळा

जडवत पेंद्या
भोती गोपमेळ
येई येई रे गोंद्या
धावे घननीळ

नाचता येईना
आनंद माईना
पावा वाजीव ना
किस्ना किस्ना किस्ना...........

विजया केळकर ___

Group content visibility: 
Use group defaults

मेघा,दत्तात्रय साळुंके, मंजुताई, हर्पेनजी आणि पद्मावती --नमस्कार आणि प्रतिसादा साठी मन:पूर्वक आभार