एकटा

Submitted by निखिल झिंगाडे on 18 July, 2017 - 09:02

संपत आले जिवन उरलास एकटा
होतास थव्यात..आता उडणार एकटा

तुटलेलेे सारे बंध संपलेली ही गाथा
घाबरलास काय? की आता लढणार एकटा

वाटते संपवावा हा जिवना तुझा खेळ
कोणी नाही तुला..शेवटी तू पडणार एकटा

थिजलेले जीवन अन गोठलेल्या जखमा
आठव तुझे धेय्य..कर प्रतिकार एकटा

सावलीनेही सोडली आहे साथ तुझी
शोध आसरा नवा...का असाच राहणार एकटा?

गर्दी होती सोबत कायमच स्वार्थ्यांची
राहील बोच मनाला शेवटी सरणार एकटा

Group content visibility: 
Use group defaults