पाऊस

Submitted by कविता९८ on 17 July, 2017 - 12:59

उन्हाळ्यात उन्हाने त्रासले सर्वजण,
पावसाची वाट पाहे माझे मन

तोवर पावसाचे झाले आगमन,
वाटे मजला भिजूनी घ्यावे तन

मातीलाही मिळाला पावसाचा सहवास,
हर्ष व्यक्त केला तिने पसरवोनी गंधवास

वाट बघे या पावसाची पक्षी चातक,
पण कधीतरी हाच पाऊस ठरतो घातक

26 जुलै ची होती ती काळरात्र ,
दुथडी भरून वाहत होते नद्या-नाल्यांचे पात्र

पाऊस व्यक्त करीत होता त्याचा क्रोध,
जणू सांगे,मानवा आता तरी घे काही बोध

तरीही हा पाऊस माझ्या आवडीचा,
आनंदाचा, मजेचा अन् उत्साहाचा ||

Group content visibility: 
Use group defaults

व्वा कऊ!!!
छान सुंदर...
पुलेशु Happy

छान