आठवणी शाळा अन् कॉलेजच्या

Submitted by कविता९८ on 14 July, 2017 - 06:57

आज मेघा ताई आणि ऋन्म्याचा धागा वाचला..
मेघाताईने लहानपणीच आपल्या वर केल्या जाणार्या संस्काराबद्दल त्यांच्या अनुभवातून लिहिले आहे तर ऋ ने कॉलेज लाईफच वर्णन केलं आहे .

तस बघायला गेल तर प्रत्येकाच्या आपल्या शाळेतील , कॉलेज मधील चांगल्या वाईट आठवणी असतात..
त्याच आठवणींना पुन्हा जगण्यासाठी हा धागा..
तर मग चला
हो जाओ सुरु

पहिली आठवण-
शाळेत असताना प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला आवडायचं.फक्त sports सोडून बाकी सर्वांत भाग घ्यायची.
मी तिसरीत असताना शाळेत गायन स्पर्धा होती.
ओंकार स्वरूपा या गाण्याची छान तयारी करून गेली होती.
स्पर्धेत नंबर सुध्दा आला.
पुढच्या वर्षात पण अशीच स्पर्धा होती.
गेल्या वेळी नंबर आल्याने डोक्यात बरीच हवा होती.
ऐन वेळेला गाणंच विसरली.
नवीन मुलगी आलेली तेव्हा शाळेत लतिका नावाची. तिलआ बक्षीस मिळालं.
रडतच शाळेच्या बाहेर आली. पप्पा आले होते न्यायला.
त्यांना मी रडतच सर्व सांगितले पण पप्पानी कायच reaction नाही दिली म्हटल्यावर राग आला.
घरी पोहचल्यावर पप्पानी समजवल तेव्हा कुठे डोक ठिकाण्यावर आलं .
नेक्स्ट डे च लतिकाला अभिनंदन केलं.तेव्हापासून आम्ही मैत्रीणी झालो..ते अजूनही आहोत..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कऊ तुने ये बहोत गलत किया बिडू Sad
मेरेको प्रत्येक किस्से का धागा काढने का था ना .... Sad

बरं चल्,तु सुरुवात कर आधी..मग लिहिते मी... Happy

छान आठवण कऊ.. Happy
ओके माझा सांगते आता, हास्याने सुरुवात करते हं...

मला डॉक्टर व्हावस वाटायच लहान असताना..अग्दी ८वी पर्यंत हेच स्वप्न उराशी बाळगून होते..भलेही मग स्वतःला इन्जेक्शन घ्यायची भीती वाटत असली तरी (अजूनही वातते ....या डॉक्टर मंडळीपासून मी १० पाऊले लांबच असते Lol )
तर मी काय कराय्चे कर्कटक असते ना ते घेऊन मैत्रीणींना इंन्जेक्शन द्यायचे..त्यांच्या नकळत..मागून टोचायची...मग त्या एवढ्या मोठ्याने ओरडायच्या ना बस्स! ,गणिताचा तास अस्ला ना कि त्या बोर्ड कडे कमी म्माझ्याकडेच जास्त लक्ष देऊन असायच्या Lol

कऊ भारी धागा...
आता हा धागा जसा पुढे जात राहील, मला रडवणार नक्की!! Happy

मला आयुष्याने हलकेफुलके किस्से तसे कमीच दिलेत. ज्या काही आहेत त्या चमत्कारीक आठवणीच आहेत. त्यामुळे एखादी आठवण उचंबळून बाहेर येते तेव्हा मी स्वतंत्र धागाच उघडतो. या कारणाने मी ईथे फारसे लिहेन न लिहेन. पण वाचेन झरूर. आपले किस्से मला माझे आठवायला मदत करतील Happy

सचिनजी..धागा छान तेव्हा होणार जेव्हा तुमचे किस्से येणार >>> हे वाचल्याबरोबर मला शाळेची एक आठवण आठवली ती सांगतो.

मी तेव्हा इयत्ता चौथीत होतो. आणि वर्गात इतिहासाचा तास चालू होता. वर्गात वीसेक मुलं आणि वीसेक मुली असतील. सर्व चिडीचूप बसून सरांचे शिकवणे ऐकत होते. मी वर्गातल्या मधल्या भागातील बेंचवर बसलो होतो. हातातल्या पेन्सिल आणि खोडरब्बरशी माझा चाळा चालू होता.

आणि अचानक माझ्या हातातला खोडरब्बर माझ्या हातातून निसटून माझ्या बेंचखाली कुठेतरी पडला. मी बेंचखाली वाकून दोन पायावर बसलो आणि माझा खोडरब्बर शोधू लागलो. मी इकडे शोधतोय, तिकडे शोधतोय. पण तो मला काही सापडेना. मी बसल्या बसल्या सरकत पुढच्या बेंचखाली गेलो.

मी खोडरब्बर शोधण्यात इतका गुंग होऊन गेलो, की मी कुठे आहे आणि काय करतोय याचे मला भानच राहिले नाही. मी माझ्या मनातच एवढा रमलो की खोडरब्बर शोधता शोधता माझ्या तोंडून मी हळूहळू आवाज करू लागलो. कसा माहितेय!!?

"म्यांव! म्यांव!! म्यांव!!!" असा मांजरीसारखा! मला हे 'म्यांव म्यांव' फारच आवडले. हळूहळू माझं 'म्यांव म्यांव' फारच जोरात व्हायला लागले. मी बेंचखाली रांगु लागलो. सर तिकडे शिकवत होते आणि इथे माझे तोंडाने 'म्यांव म्यांव' करत खोडरब्बर शोधणे चालू होते.

आणि कोण जाणे मला अचानक सारं शांत शांत वाटायला लागलं. सरांचा शिकवण्याचा आवाज मला ऐकू येईनासा झाला. मी भानावर आलो. म्हटलं सगळे गेले कुठे? म्हणून मी बेंचखालून डोके बाहेर काढून वर बघितले तर काय!!?......

सरांसकट सर्व मुलं मुली माझ्या बेंचभोवती कोंडाळं करून मला गुपचूप पाहताहेत. माझी बोलती बंद!!! हे पाहून सर्व मुलं मुली माझ्याकडे पाहून जोरजोरात हसायला लागले. सरांनी माझ्या कानाला धरून मला उभे केले. आणि मग त्यांनी माझे काय हाल केले असतील याची तुम्ही कल्पनाच न केलेली बरी!!! Rofl

आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त आंतरवर्गीय देशभक्तिपर समूहगीताची स्पर्धा असायची. प्रत्येक वर्गाला भाग घेणं compulsory. दोन फेर्‍यांत हि स्पर्धा व्हायची. आमच्या शाळेत ५वी ते १०वी प्रत्येकी ९ तुकड्या होत्या. पहिल्या फेरीत ५वी ते १०वी मधून प्रत्येक इयत्तेतून ३ क्रमांक काढायचे. इयत्तेतून पहिला येणारा वर्ग अंतिम फेरीत दाखल होत असे. ५वी ते १०वी आणि ८वी ते १०वी असे दोन गट. अंतिम फेरीत पहिल्या येणाऱ्या वर्गांना माइकवरून गायची संधी मिळत असे.
तर आपल्याच वर्गाचा पहिला क्रमांक यावा, यासाठी आम्ही प्रचंड मेहनत करत असू. आपण निवडलेलं गाणं दुसरा कोणता वर्ग घेऊ नये म्हणून गुपित ठेवायचो. आपल्या वर्गाच गाणं युनिकच असलं पाहिजे म्हणून काय ती धडपड आमची. आत्ता आठवून हसायला येतं पण ते दिवसच मंतरलेले होते. आमच्या वर्गासारखे म्हणजे७,८,९ या तुकड्या तर शाळा सुरू होऊन १ आठवडा होतो न होतो गाण्याची शोधाशोध सुरू करायच्या. वर्गशिक्षकही आनंदाने, उत्साहाने सहभाग घेत. आमच्या ८ वी च्या वर्गशिक्षिका तर खूप supportive होत्या. प्रचंड धमाल असायची.
एकदा का गाणं ठरलं कि मग जोरदार प्रॅक्टिस. प्रत्येक तासाला प्रॅक्टिससाठी धोशा लावायचा. काही शिक्षक
द्यायचे परवानगी शेवटचे ५/१० मिनिटं प्रॕक्टिस करायला. पहिल्या तासाला तर प्रॕक्टिस ठरलेलीच(ह्याला अपवाद ९ वी च वर्ष )
ती गाणी म्हणताना पण एक प्रकारचा उत्साह संचारायचा. सर्वजण एकत्र तालासुरात गाणं म्हणताना भारी वाटायचं.
स्पर्धेची पहिली फेरी पार पडली कि मग निकालाची उत्सुकता. दुसऱ्या दिवशी पहिल्या तासापासून स्पिकरकडे लक्ष. आणि आपल्या वर्गाचा जर पहिला नंबर आला असेल तर नुसता धुमाकूळ. अंतिम फेरीसाठी अजून कसून तयारी. कारण लगेच दुसऱ्या दिवशी अंतिम फेरी असायची. ऐन स्पर्धेच्या वेळी गोंधळ नको म्हणून ज्याप्रमाणे उभे राहणार असून त्या arrangement प्रमाणेच रांगेत वर्गाबाहेर पडत असू. कारण शिस्तीला पण गुण असायचे ना Wink आमच्या वर्गाचा ९वी ला प्रथम क्रमांक आलेला ८वी ते १०वी चा गटातून.
आम्हांला तर आभाळ ठेंगणं झालेलं त्या दिवशी. ९वी चं वर्ष खूप खास होतं आमच्या वर्गासाठी. खूप मस्त होते ते दिवस. दरवर्षी १५ अॉगस्ट जवळ आला कि या आठवणींत मन रमतं. Happy

सचिनजी भारी हां... सायुरी मस्त आठवण!
मी सातवीपर्यंत माझ्या शाळेत राजासारखं जगलेलो. कायम पहील्या दोन नंबर्स मध्ये असायचो. माझ्या डिवीजन मधे तर सबकुछ मीच होतो ... आठवीपासून ग्रहण लागलं! आठवी-नववी कशीतरी रडतखडत काढल्यानंतर दहावीत गेलोच नाही.. या सगळ्याला जबाबदार आमच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती होती. त्यातच काहीही कारण नसताना एका शिक्षकाच्या जहरी बोलण्याने विमनस्क मन:स्थितीत शाळा सोडून दिली. त्यानंतरची चार वर्ष मी काम केलेलं, खुप मेहनत केलीं.. खुप वाईट वाटायचं..एकांतात खुप रडायचो, रात्ररात्र जागून काढलेल्या! आजसुद्धा अंगावर शहारा येतो.. मी पुन्हा शिक्षण घेईल असं कधीच वाटलं नव्हतं.. पुढे आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतर पाच वर्षांनी १७ नंबर फॉर्म भरून दहावीचे पेपर्स देऊन पास झालो. अकरावी बारावी सायन्स नंतर इंजिनियरिंग डिप्लोमा पुर्ण करून BE ला admission घेतलं.. सध्या घरच्या उद्योगात स्थीर आहे.
शाळेच्या आठवणी रडवतात...

आमच्या शाळेत ५वी ते १०वी प्रत्येकी ९ तुकड्या होत्या.

सायुरी अकख्या गावात एकच शाळा होती का...इतके समवयस्क मुले ...

कऊ, सायुरी असले छोटेमोठे प्रसंग जर आयुष्यात आले तर माणूस त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडत असतो.. उलट यामुळे जिवन अधिक समृद्ध बनत जातं..

Pages