कधी सांगशील का रे मला

Submitted by नटुकाकी on 13 July, 2017 - 08:38

पहिलाच प्रयत्न आहे,जशी सुचली तशी लिहिली..
चुका आहेतच..सूचनेप्रमाणे बदल करून सुधारणा करेन

कधी सांगशील का रे मला
होते का मी कधी तुझ्या जगात
का मलाच हा आभास रे
चोरून मला पाहण्याचा

कधी सांगशील का रे मला
अर्थ तुझ्या नजरेचा,
तुझ्या सूचक हास्याचा,
तुझ्या प्रेमळ भांडणांचा,

कधी सांगशील का रे मला
होती का रे काळजी माझी तुला
का यायचास तू धावत
पाहून आसवे डोळ्यातली माझ्या

कधी सांगशील का रे मला
का तूही रडलास माझ्यासोबती
जेव्हा तूच वार केलास रे
नकाराचा माझ्या हृद्यावरती

कधी सांगशील का रे मला
होत का रे थोडंतरी प्रेम तुझं माझ्यावरती
मी मात्र वेडी रे , राजा
जगतीये अजून तुझ्याच स्वप्नांवरती

कधी भेटशील का रे मला
एकदा शेवटचा,मरण्याआधी
तेव्हा तरी सांगशील ना रे मला
होते मी कुठेतरी,तुझ्याच हृदयाच्या तळाशी..

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद ...बरं वाटलं मनाला प्रतिसाद वाचून....
आणि इथे मुलीनेच पुढाकार घेतलाय...
'नकाराचा माझ्या हृद्यावरती' या वाक्यातच दडलंय की हो की मुलीने विचारलय मुलाला पण तोच नकार देतो तिला...

आणि इथे मुलीनेच पुढाकार घेतलाय...
'नकाराचा माझ्या हृद्यावरती' या वाक्यातच दडलंय की हो की मुलीने विचारलय मुलाला पण तोच नकार देतो तिला...>>>> सॉरी, मीच वाचण्यात चुकी केली...बाकी कविता छान आहे.
पण जनरली मुली तशीच अपेक्षा करतात म्हणून मी चुकीचं वाचून गेलो.