लहानपणीचे संस्कार! .... (भाग -१)

Submitted by मेघा. on 12 July, 2017 - 08:31

काल एका गप्पांच्या धाग्यावर राहुल ने चोरी करण्यासंबंधी एक प्रतिसाद दिला होता..आपल्या घरातल्या,आजूबाजूच्या वातावरण नुसार आपण कसे घडलो जातो .. आपल्या स्वभावात ,वागण्यात त्याचा कितपत परिणाम होतो..याच ते उदाहरण होतं.. तेव्हा मलाही माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आठवला ....तो इथे शेयर करतेय.. असे बरेच आहेत आज एक ...

लहान मुलांवर आपण जसे संस्कार करू,किंवा त्यांच्यासमोर आपण जसे वागतो ..त्याच ते अनुकरण करत असतात..काय योग्य काय चूक याची जाणीव त्या वयात नसते .मातीला (चिखलाला) आपण जसा आकार देऊ तसा तो तयार होतो..तसच या छोट्यांचं पण असतं...आपल्याला घडवण्यात बऱ्याच लोकांचा त्यात हाथ असतो. आई-वडील ,नातेवाईक ,शिक्षक ,मित्र-मैत्रिणी,किंवा मग् अगदी एखादी व्यक्ती ५ मिनिटांसाठी जरी भेटली तरी ती काहीतरी शिकवून जाते..
माझ्या आत्याचाही यात मोलाचा वाटा आहे,जिचे उपकार/तिने केलेले संस्कार मी कधीही विसरू शकत नाही...
चला आता खूप झाल्या गप्पा.. डायरेकट मुद्द्याला हात घालते...
मी लहान असताना (अजूनही लहानच आहे म्हणा Proud ) ,६ वर्षांची असेल बहुतेक.कारण मला अजूनही सगळं काही आठवतंय....

मी दहावर्षांची होईपर्यँत माझ्या आत्याकडे होते..पाचवीपर्यंत तिच्याकडेच शाळा झाली माझी.
तर एकदा असा एक प्रसांग झाला .. ज्यातून मी एक धडा शिकले म्हणा किंवा लहान वयात चांगले संस्कार झाले म्हणा..
माझ्या आत्याचं किराणा मालाचं दुकान होतं त्यावेळी,तीच ते चालवायची .माझी चुलत बहीण (नाव नाही सांगत) आली होती एकदा ..ती मोठीये माझ्यापेक्षा ..तर मी शाळेतून आल्यावर तिने मला बोलावलं आणि बोलली कि तू ना आत जा आणि गल्ल्यातून ५ रुपये घेऊन ये,आपण दुसर्या दुकानातून काहीतरी खायला आणू गुपचूप ,मी आधी तयार नाही झाले पण तिने काय जादू केली काय माहीत पण नंतर मी तयार झाले..अक्कल नव्हती ना...ती माझ्याबरोबर आली सुद्धा नाही ..मला पुढे केलं.. Angry
मग मी थोडासा अंदाज घेतला आणि गेले ना दुकानात पैसे चोरायला..गल्ल्यातून ५ रुपये चोरले सुद्धा , पण त्याचवेळी आत्या तिथे आली आणि तिने मला पकडलं..मग काय जे रडायला सुरुवात केली विचारता सोय नाही,पण बिचारी मला ओरडली सुद्धा नाही .पण तिने घडलेला /मी केलेला प्रताप मात्र दादांच्या कानावर घातला .दादा आमचे खूप रागीट आहे(पण मनाने खूप हळवे आहेत..फणसासारखे) ,मला तर जाम भीती वाटते बाबा . दादा आले,आत्याने आधीच सांगितलं काय मारू -बिरू नको पोरीला ,फक्त समजावून सांग ..मग सभा भरली ,ज्यामध्ये माझ्या ३ आत्या,दादा,आत्याची मैत्रीण + तिच्या बरोबरचे दोघे जण यांनी अगदी मनापासून भाग घेतला...आता फक्त मला हजेरी लावायची होती ,मला बोलावण्यात आलं.मी आधीच थरथर कापत होते.. मी आत गेले .
आरोपीला जशी विचारपूस होते..अगदी तशी माझी पण विचारपूस झाली ..असं का केलं ,कोणी सांगितलं वगैरे वगैरे..पण माझ्या मुखातून एकही शब्द येत नव्हता..शेवटी दादांनी अशी एक कानाखाली ठेऊन दिली कि ,दुसऱ्या क्षणाला सगळं बकुन टाकलं ! Lol
थोड्यावेळ शांतता पसरली ..एक आत्या आली माझ्याजवळ (आई बोलते तिला मी),मला जवळ घेतलं..आणि समजावून सांगू लागली ,असं करू नये,चुकीचं आहे हे..तिने (बहिणीने) तुला काहीही सांगितलं तर तू लगेच ऐकणार का..काय बरोबर काय चूक कळायला नको.. हेच शिकवलय का तुला ?? शाळेत जातेस तु ??परत असं करायचं नाही ..
पण दादांचं समाधान एवढ्यावर नव्हतं होणार ,बोलले नाही माफ़ी माग आत्याची(मोठ्या आत्याची) सर्वासमोर..सांग तिला चुकलं माझं पुन्हा असं काही नाही करणार,माफ कर म्हणून..मी परत सायलेंन्ट मोड मध्ये,लहान असले म्हणून काय झालं..अपनी भी इज्जत है भै ..सभेसमोर माफी मागायची म्हणजे जरा अतीच नाय कै?? मी खाली मान घालून गप्प .१मिनिटांनी परत आवाज मोठ्ठा झाला..आता मात्र माफीमागण्याशिवाय पर्याय नव्हता ...गेले आत्याजवळ तिचे पाय धरले (खरंच )आणि माफी मागितली ...

आत्याने तर केव्हाच माफ केलं होतं..पण मला माझ्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून हे केलं...
आज जेव्हा ते सगळे आठवत ..तेव्हा असं वाटत कि जर त्यावेळी आत्या तिथे आली नसती तर??
माझी हिम्मत अजून वाढली असती ...आणि काय माहीत मी काय बनले असते...
त्या एका प्रसंगाने सगळं बदलून टाकलं..मी कधीही अशी घोडचूक केली नाही,विचार हि आला नाही मनात कधी..
आज कोणी घरी येऊन जरी सांगितलं ना कि,तुमच्या मुलीने असं काही केलयं..तर दादाच काय पण एकही नातेवाईक विश्वास ठेवणार नाही..एवढा विश्वास आहे माझ्यावर! Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मेघा, धाग्याची शतकाच्या दिशेने वाटचाल. आपणांस शुभेच्छा! पुढील भागाच्या प्रतीक्षेत. Happy

Pages