लहानपणीचे संस्कार! .... (भाग -१)

Submitted by मेघा. on 12 July, 2017 - 08:31

काल एका गप्पांच्या धाग्यावर राहुल ने चोरी करण्यासंबंधी एक प्रतिसाद दिला होता..आपल्या घरातल्या,आजूबाजूच्या वातावरण नुसार आपण कसे घडलो जातो .. आपल्या स्वभावात ,वागण्यात त्याचा कितपत परिणाम होतो..याच ते उदाहरण होतं.. तेव्हा मलाही माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आठवला ....तो इथे शेयर करतेय.. असे बरेच आहेत आज एक ...

लहान मुलांवर आपण जसे संस्कार करू,किंवा त्यांच्यासमोर आपण जसे वागतो ..त्याच ते अनुकरण करत असतात..काय योग्य काय चूक याची जाणीव त्या वयात नसते .मातीला (चिखलाला) आपण जसा आकार देऊ तसा तो तयार होतो..तसच या छोट्यांचं पण असतं...आपल्याला घडवण्यात बऱ्याच लोकांचा त्यात हाथ असतो. आई-वडील ,नातेवाईक ,शिक्षक ,मित्र-मैत्रिणी,किंवा मग् अगदी एखादी व्यक्ती ५ मिनिटांसाठी जरी भेटली तरी ती काहीतरी शिकवून जाते..
माझ्या आत्याचाही यात मोलाचा वाटा आहे,जिचे उपकार/तिने केलेले संस्कार मी कधीही विसरू शकत नाही...
चला आता खूप झाल्या गप्पा.. डायरेकट मुद्द्याला हात घालते...
मी लहान असताना (अजूनही लहानच आहे म्हणा Proud ) ,६ वर्षांची असेल बहुतेक.कारण मला अजूनही सगळं काही आठवतंय....

मी दहावर्षांची होईपर्यँत माझ्या आत्याकडे होते..पाचवीपर्यंत तिच्याकडेच शाळा झाली माझी.
तर एकदा असा एक प्रसांग झाला .. ज्यातून मी एक धडा शिकले म्हणा किंवा लहान वयात चांगले संस्कार झाले म्हणा..
माझ्या आत्याचं किराणा मालाचं दुकान होतं त्यावेळी,तीच ते चालवायची .माझी चुलत बहीण (नाव नाही सांगत) आली होती एकदा ..ती मोठीये माझ्यापेक्षा ..तर मी शाळेतून आल्यावर तिने मला बोलावलं आणि बोलली कि तू ना आत जा आणि गल्ल्यातून ५ रुपये घेऊन ये,आपण दुसर्या दुकानातून काहीतरी खायला आणू गुपचूप ,मी आधी तयार नाही झाले पण तिने काय जादू केली काय माहीत पण नंतर मी तयार झाले..अक्कल नव्हती ना...ती माझ्याबरोबर आली सुद्धा नाही ..मला पुढे केलं.. Angry
मग मी थोडासा अंदाज घेतला आणि गेले ना दुकानात पैसे चोरायला..गल्ल्यातून ५ रुपये चोरले सुद्धा , पण त्याचवेळी आत्या तिथे आली आणि तिने मला पकडलं..मग काय जे रडायला सुरुवात केली विचारता सोय नाही,पण बिचारी मला ओरडली सुद्धा नाही .पण तिने घडलेला /मी केलेला प्रताप मात्र दादांच्या कानावर घातला .दादा आमचे खूप रागीट आहे(पण मनाने खूप हळवे आहेत..फणसासारखे) ,मला तर जाम भीती वाटते बाबा . दादा आले,आत्याने आधीच सांगितलं काय मारू -बिरू नको पोरीला ,फक्त समजावून सांग ..मग सभा भरली ,ज्यामध्ये माझ्या ३ आत्या,दादा,आत्याची मैत्रीण + तिच्या बरोबरचे दोघे जण यांनी अगदी मनापासून भाग घेतला...आता फक्त मला हजेरी लावायची होती ,मला बोलावण्यात आलं.मी आधीच थरथर कापत होते.. मी आत गेले .
आरोपीला जशी विचारपूस होते..अगदी तशी माझी पण विचारपूस झाली ..असं का केलं ,कोणी सांगितलं वगैरे वगैरे..पण माझ्या मुखातून एकही शब्द येत नव्हता..शेवटी दादांनी अशी एक कानाखाली ठेऊन दिली कि ,दुसऱ्या क्षणाला सगळं बकुन टाकलं ! Lol
थोड्यावेळ शांतता पसरली ..एक आत्या आली माझ्याजवळ (आई बोलते तिला मी),मला जवळ घेतलं..आणि समजावून सांगू लागली ,असं करू नये,चुकीचं आहे हे..तिने (बहिणीने) तुला काहीही सांगितलं तर तू लगेच ऐकणार का..काय बरोबर काय चूक कळायला नको.. हेच शिकवलय का तुला ?? शाळेत जातेस तु ??परत असं करायचं नाही ..
पण दादांचं समाधान एवढ्यावर नव्हतं होणार ,बोलले नाही माफ़ी माग आत्याची(मोठ्या आत्याची) सर्वासमोर..सांग तिला चुकलं माझं पुन्हा असं काही नाही करणार,माफ कर म्हणून..मी परत सायलेंन्ट मोड मध्ये,लहान असले म्हणून काय झालं..अपनी भी इज्जत है भै ..सभेसमोर माफी मागायची म्हणजे जरा अतीच नाय कै?? मी खाली मान घालून गप्प .१मिनिटांनी परत आवाज मोठ्ठा झाला..आता मात्र माफीमागण्याशिवाय पर्याय नव्हता ...गेले आत्याजवळ तिचे पाय धरले (खरंच )आणि माफी मागितली ...

आत्याने तर केव्हाच माफ केलं होतं..पण मला माझ्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून हे केलं...
आज जेव्हा ते सगळे आठवत ..तेव्हा असं वाटत कि जर त्यावेळी आत्या तिथे आली नसती तर??
माझी हिम्मत अजून वाढली असती ...आणि काय माहीत मी काय बनले असते...
त्या एका प्रसंगाने सगळं बदलून टाकलं..मी कधीही अशी घोडचूक केली नाही,विचार हि आला नाही मनात कधी..
आज कोणी घरी येऊन जरी सांगितलं ना कि,तुमच्या मुलीने असं काही केलयं..तर दादाच काय पण एकही नातेवाईक विश्वास ठेवणार नाही..एवढा विश्वास आहे माझ्यावर! Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलं आहे, साधे आणि सोपे;
संस्कार करणे आणि स्वतःत रूजवून घेणे, दोन्ही महत्वाचे
बी चांगले असण्याबरोबरच मातीही कसदार लागते, तसं
भाग २ कधी? कशावर?

तुम्हाला पैसे चोरायला सांगणाऱ्या अत्तेबहिनीच काय झालं? तिला शिक्षा / संस्कार झाली / मिळाले का? आत्याने स्वतः:च्या मुलीला पण तशीच शिक्षा / उलटतपासणी केली का?

बंती थांकु हं Happy

छान लिहिलं आहे, साधे आणि सोपे;
संस्कार करणे आणि स्वतःत रूजवून घेणे, दोन्ही महत्वाचे
बी चांगले असण्याबरोबरच मातीही कसदार लागते, तसं >>>> +११११ ,धन्यवाद ताई .. Happy
भाग २ कधी? कशावर? >>>> प्रयत्न करेन लिहिण्याचा ..... Happy

राजसी धन्यवाद Happy
तुम्हाला पैसे चोरायला सांगणाऱ्या अत्तेबहिनीच काय झालं? तिला शिक्षा / संस्कार झाली / मिळाले का? आत्याने स्वतः:च्या मुलीला पण तशीच शिक्षा / उलटतपासणी केली का? >>>> आवडला प्रश्न , ती आत्याची मुलगी नाही,चुलत बहीण आहे..माझी...
पण राजसी एक सांगू का,एकाच हाताची बोटे वेगवेगळी असतात..अगदी तसच माणसा च्या बाबतीत पण असतं..
मी त्या प्रसंगातून काय शिकले हे लिहिलयं.. ती कशी आहे हे इथे लिहीण म्हणजे जरा....

ती कशी आहे हे इथे लिहीण म्हणजे जरा.... +१
आम्ही समजून घेतलं एका हाताची पाचही बोटे सारखी नसतात यावरून...

छान जमलाय लेख..
दुसरा भागाच्या प्रतिक्षेत.

दादांनी भारीच जाळ काढला हो. Lol
Jokes apart पण मीही त्याच मताची आहे. अगदी बडवूनच काढायला हवं असं अजिबात नाही. पण मुलं जेव्हा चुकतात आणि पालकांना जेव्हा ते समजतं, त्याच वेळी योग्य समज/ शिक्षा देणं गरजेचं आहे. लहान मुलं आजमावत असतात. परिस्थिती आणि आसपासच्या लोकांनाही. एकदा त्यांच्या चुकीला खतपाणी(किंवा खतपाणी घालणारं माणूस)मिळालं की मग सुधारण्याकडे त्याची पुर्ण पाठ फिरते.
घरचा अनुभव.

लहानपणी संस्कार आवश्यक आहेतच कारण आपण आपल्या परीने चांगले काय वाईट काय हे मुलांना सांगितलेच पाहिजे. पण मी हे बघितलंय कि माणूस मोठा झाला कि स्वतःचा अस्सल रंग दाखवतोच, त्यावेळी तो ते संस्कार विसरून जातो. अशी कित्येक घरे बघितलीत कि जिथे आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकूंनी मुलांना लहानपणीपासून खूप चांगले संस्कार दिले, पण मोठे झाल्यावर एक मुलगा खूप चांगला निघाला. आणि दुसरा व्यसन, जुगार आणि त्यासाठी चोरी यात पार वाया गेला. आणि काही अशी घरेही बघितलीत की जिथे आई-वडील शिव्यानशीवाय काही दुसरे बोलले नाहीत, खूपदा तुरुंगात गेलीत, पण मुले खूप चांगली निघाली.
शेवटी माणूस कसा निघेल हे सांगता येत नाही . तुम्हाला काय वाटते याबद्दल ?

अगदी लहान पणापासुन , बुवा - बाजी च्या नादात जवळच्या माणसांची वाताहत होतांना बघितली आहे, त्यांमुळे अस्ल्या बाबा , नि साधुन्चा भयन्कर तिटकारा आहे, कधीच कुठल्याच बाबा कडे जात नाही कुणी भरिस पाडल तर शाब्दिक चकमक ठरलेली.
विज्ञाननिष्ठ विचार करण्यासाठीचे सन्स्कार आ़ई नि आजी कडून मिळाले.

Pages