भंगार

Submitted by शिवाजी उमाजी on 11 July, 2017 - 15:58

भंगार
भांगारवाल्याच्या हाळी ने झोप उघडली बराच दूरवर होता तो...तरी जागं करून,जाणिव देऊन गेला,गोळा करा...जवळ असलेलं सारं भंगारकाही कपाटात असलेलं कुठे देवळीत कोंबून ठेवलेलं?स्वयंपाक घरात... कुणास ठाऊक काय काय होतं?प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या,अनेकविध रँपर्स,दिसणारं तर सारं गोळा केलं,फक्त, त्याची वाट पहात होतो! पण नाही आला तो... मी सुन्न झालो,त्याचा राग पण आला खूप...नंतर लक्षात आलं,अरे, हे सगळ दिखाऊ तर आहे...मनात जे साठलयं त्याचं काय?ते तर काढायलाच हवं,वास्तवात भंगार म्हणजे...स्वार्थ, मोह, लालच,द्वेष व अहंकार हे आहेत...त्यांना फेकायला हवं,आणि मी... भंगारवाल्याला शोधत होतो जो जागेवरच होतासारं भंगार जमा करून... 

© शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अतिशय मार्मिक आणि सगळ्यांनी बोध घ्यावा असे..
साधी राहणी उच्च विचारसरणी ह्याचे अवलंबन सगळ्यांनी केले पाहिजे.