पुळण - भाग ३

Submitted by मॅगी on 10 July, 2017 - 06:42

भाग २

"Guys, let's have a huddle! I need each of you here, Right NOW!!

तन्वीने जोरात अनाऊन्स केले. समिपा, नलिन आणि नवीन आलेले दोन ट्रेनी पटापट जमा झाल्यावर ती बोलू लागली.

"मिस्टर मेहतांचा प्रोजेक्ट आपल्याला मिळाला! Yay!!" सगळ्यांनी जागच्या जागी आल्मोस्ट नाचत आरोळ्या ठोकल्या. "Okay enough! Stop! ऐका.. So now, we have to act fast. मी ऑलरेडी विस्तारा सेंटर हँडल करतेय. पण हा residential project पण तेवढाच महत्त्वाचा आहे. As you know परिमल मेहता हे मोठे इंडस्ट्रीअलिस्ट आहेत. जर हे काम त्यांना आवडलं तर त्यांच्या ग्रुपमधल्या मिनिमम दहा तरी कंपन्या आपल्याला मिळतील. तर हा करंट प्रोजेक्ट म्हणजे त्यांच्या वडिलांचं जुनं घर आहे. ते तसंच अँटिक लुक ठेऊन आपल्याला रिनोव्हेट करायचं आहे. हि एकच स्पेसिफिकेशन त्यांनी आपल्याला दिलीय, which is good! तर हे काम मी समिपाला देते आहे, चालेल ना समी? चालवच!"

"Of course darling! I am ready to rock it!" समिपा नुसती उत्साहाने निथळत होती.

"ओके, मग क्यूटी तुला असिस्ट करेल. नलिन माझ्याच प्रोजेक्टमध्ये राहील कारण यात दोघांची गरज आहे. आणि अमीन दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये गरजेनुसार हेल्प करेल. Okay? तन्वीने नेहमीप्रमाणे मॅनेजेरीअल स्किल्स दाखवत प्लॅन फिक्स केला.

च्यायला! हि क्यूटीच यायची होती नशिबात! समिपाला वैतागून हसू यायला लागलं. क्यूटी म्हणजे कुलबीर अहलुवालिया असं लौंग दा लशकारा नाव असलेली नवीन ट्रेनी. हिने जॉईन झाल्यापासून काम बिघडवण्याचे इतके प्रताप केलेले आहेत पण तिच्या गोड दिसण्या आणि वागण्यामुळे आपोआप माफ केले जातात. जाऊदे, लावते हिलाच आता कामाला असं ठरवून समिपा आपल्या वर्कस्टेशनकडे वळली.

इ-मेल उघडून त्या घराचा पत्ता पाहिला तर 'वनराजी' नाव असलेले ते जुने घर म्हणजे एक प्रचंड मोठा वाडा होता. मेहतांचे पणजोबा गिरधारीलाल जेव्हा गुजरातमधून महाराष्ट्रात आले तेव्हा ह्या गावाबाहेरच्या वाड्यात एका खोलीत भाड्याने राहिले. बऱ्याच वर्षांनी त्यांच्या सोन्या चांदीच्या व्यापारात बरकत आली म्हणून ती खोली विकत घेण्यासाठी ते मालक सरदार जेध्यांकडे गेले. तेव्हा मालकांनी त्यांच्यापुढे वाड्याची दुरुस्ती झेपत नसल्याने अक्खाच वाडा विकत घ्यायचा प्रस्ताव मांडला आणि तेव्हा चांगलाच फायदा झाल्याने त्यांनी लगेच तो विकतही घेतला. त्यामुळे वाड्याची सगळी रचना आणि आतले antic decor महाराष्ट्रीयन थाटाचे होते आणि शहर इतके पसरूनसुद्धा अजूनही तो वाडा बऱ्यापैकी जंगलातच होता.

एवढा केस स्टडी करून समिपा खुश झाली. फायनली तिच्या आवडीचा independent project करायला मिळणार होता.

"क्यूटी sss यार क्या कर रही हो.. वो चॉकलेट पहले ड्रॉरमे रखो और फटाफट यहा आ जाओ। समिपा ओरडलीच.. "हमे रेडी होकर साईट व्हिजिट करना है.."

क्यूटी नेहमीप्रमाणे फुल्ल मेकअप करून, स्ट्रेटन केलेले केस फलकारत पळत पळत आली.

"सॉरी, सॉरी सॉरीsss मॅम वो मनजीत का कॉल आ ग्या था.. पता है ना, वो फोन रखने ही नही देता. वो बहोत केअरींग हेंना इसलीये!" मस्कारा लावलेल्या लांब पापण्या फडफडत क्यूटी लाजत लाजत म्हणाली. मर्चंट नेव्हीत असणारा हा बॉयफ्रेंड क्यूटीला दिवसातून सतराशे साठ कॉल करायचा, इतका पझेसिव्ह तरी ही त्याला केअरिंग म्हणणार!

"ठीक है, चलो अभी" म्हणत स्कार्फ बांधून वर हेल्मेट घालून तयार समिपाने डोळे फिरवले आणि ऍक्टिवा दौडवायला सुरुवात केली. हायवेवर डांबर वितळवणाऱ्या उन्हातून क्युटिची बडबड सुरू होती. गाडीवर बसून वेगवेगळ्या अँगलने सेल्फी घेणंही सुरू होतं.

अचानक समोर क्षितिजावर आकाश काळवंडू लागले. सोसाट्याचा वारा सुरू होऊन धुळीचे लोट पाचोळ्यासकट गोल गोल फिरत उडू लागले. रस्त्याच्या कडेला असलेल्या फ्लेक्सच्या गर्दीतला एक कापडी फ्लेक्स फाटला आणि सटकन समिपाच्या चेहऱ्यावर येऊन आदळला. अचानक डोळ्यावर लागल्यामुळे समिपा गडबडली आणि कच्चकन ब्रेक लावूनही गाडी घसरून रस्त्याकडेला पडली.

घाईघाईत तिने तो फ्लेक्स तोंडावरून उचलला तर त्यावर 'Sea Wind Resort & Spa' take a U turn and meet the shoreline at 190 km! एवढंच लाल रंगाच्या मार्करने लिहिलं होतं. मनातल्या मनात असा फुटकळ फ्लेक्स बनवणाऱ्याला दोन शिव्या घालून क्यूटीकडे पाहिलं तर पोरगी धूळबीळ झटकून ब्लॅक ग्लिटरी पंप्सची तुटलेली हील हातात घेऊन तोंड वाकडं करत होती.

"क्यूटी! तुम ठीक हो? कही लगी तो नही? सॉरी इस फ्लेक्सकी वजहसे मुझे कुछ दिखा ही नही" समिपाने काळजीने विचारलं. तिच्या स्वतःच्या ओठावर दात लागून थोडं रक्त येत होतं.

" नो नो मॅम, मै ठीक हू. लेकिन ये हील टूट गई, लास्ट वीक ही लिया था इन्क 5 का! मेरे १५०० बक्स ये फ्लेक्स खा गया.." रागाने तो फ्लेक्स खाली फेकत क्यूटी म्हणाली.

फेकल्याबरोबर वाऱ्यावर उडत फ्लेक्स दिसेनासा झाला.
आता नक्की काय करायचं म्हणून समिपा विचारात पडली. तेव्हाच विजांचा कडकडाट होऊन वर डोंगरात विजेचा लोळ चमकला. गडगडाट होऊन आता कुठल्याही क्षणी जोरदार पाऊस सुरू होणार होता म्हणून समिपाने ऑफिसला परत जाण्याऐवजी जवळ असलेल्या 'वनराजी'कडेच जाण्याचा निर्णय घेतला..

बराच वेळ झटापट करून ऍक्टिवा सुरू झाली आणि जोराचा पाऊस आलाच. हेल्मेटच्या काचेवर पाण्याचे ओघळ आणि समोर धुक्यातून रस्ता अंधुक दिसत होता. हातापायांवर टपोरे थेंब सुईसारखे टोचत होते.

अश्यातच कडेचा सर्व्हिस रोड सुरू झाल्याने पाण्याची डबकी आणि चिखल चुकवत रपारप गाडी रेमटत कशीबशी समिपा जरा मोकळ्या ठिकाणी पोहोचली आणि समोरच्या गेटवर लोखंडी वळणा-वळणांची अक्षरे दिसली - 'वनराजी'.

भाग ४

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mothe bhaag lihina maggy ji >>>> + १०००००
एका भागात फार काही घडत नाही असं वाटतं .
म्हणजे , २५ मिन. चा एपिसोड , २ मिन. शिर्षक गीत , ३ मि. २-३ प्रीव्ह्यूत , ५ मि. जाहिराती , फक्त १५ मिन. काहीतरी घडतं , असं झालयं .

लवकर नविन भाग येऊ दे गं..

सॉरी ये फ्लेक्सकी बजयसे मुझे कुछ दिखा ही नही>> वजह..एवढा टायपो नीट करशील हं..

सगळ्यांना धन्यवाद.. हो, भाग लहानच होत आहेत. नवीन काही पटापट सुचत नाहीये. मोठे लिहायचा प्रयत्न करते.
थँक्स टीना, केलं दुरुस्त.