रंग होळीचे

Submitted by अतुलअस्मिता on 9 July, 2017 - 09:53

निळ्या सावळ्या आभाळावर चमचमली एक लाल रेघ
काळ्याशार शेत जमिनीत दुभंगली एक अजून भेग
खेळून पाणी पाणी शरीरी वाहिली गुलाबी देठ
अश्रूसुद्धा वाळून गेला उरली फक्त सावळी कृष्णभेट

रंग करडा डोळ्यांवरती भिरभिरली एक सटवाई बघ
पदर ओढून भाळावरती लपवली एक श्वेत धग
चंदेरी मदमस्त नशिबी कोरली कोरडी चिंता रेष
आर्त पाषाणस्वरांची हिरवी झुलत स्मरते संध्या वेष

तांबडी बहुलबाड ज्वाळा पिळवटून एक अत्तरी मेघ
बरसती कटुशिथिल प्रवाह प्रसरून एक सोनेरी वेग
काजवे चमचम अंधुक पिवळे श्वासांचे नारंगी खेळ
पेटता होळी काळी जांभळी लखलखली केशरी कातरवेळ

-कवी : अतुल चौधरी
ठाणे.

Group content visibility: 
Use group defaults