प्रतिशोध भाग - 3

Submitted by कविता९८ on 9 July, 2017 - 09:51

प्रतिशोध
भाग-3
कविता नाईक

"सियाल तु का लपवली ही गोष्ट माझ्या पासून??कोण होती कस्तुरी??याच कॉलेज ची??आणि दादा असं का बोलला की सियालची कस्तुरी??
आणि होती म्हणजे??आता कुठे आहे ती??का कधी तिचा विषय तुमच्या पैकी कोणीच नाही काढला??सर्व प्रश्नांची उत्तर हवी मला आताच.."
काव्या सियालच्या समोर उभी राहून प्रश्नांचा भडीमार करत होती.
आणि सियाल..तो काहीच बोलत नव्हता...
"काऊ शांत हो जरा..तुला सर्व काही सांगतो आम्ही कस्तुरी बद्दल.. पण ही योग्य वेळ नाही. आता कुमार कडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे ग..आणि हा, कस्तुरी बद्दल आमच्या पैकी कोणीच कधीच नाही बोलणार अस आम्हीच ठरवलं होतं.मला भाऊ मानतेस ना तु...मग प्लीज ऐक."
सँडी तिला समजावून सांगत होता.. काव्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.. तरी ती शेवटी शांत झाली.
"आपण आता कुमार कडे लक्ष द्यायला हवं.तात्पुरतं मी त्याला झोपवलं आहे..आणि डॉ.विशाल खरचं सॉरी तुम्हाला हा असा त्रास कुमार मुळे झाला."अनु बोलली..

"हे बघ अनु मी एक डॉक्टर आहे.. अशा केस मी handle करू शकतो.don't worry..मी आता निघतो.. काही गरज लागली तर कॉल कर ..येतो मी आता..बाय.."
एवढं बोलून विशाल निघाला... श्री त्याला गेटपर्यंत सोडायला गेला...

कुमार आता झोपला होता..
बाकी सर्व जण खालच्या हॉल मध्ये बसले..
पण कोणीच काहीच बोलत नव्हत..
कदाचित कोणाला काही सुचत नव्हते..

शेवटी काऊ ने त्या शांततेला तोडून अनु ला विचारले

"दी...खुप उशीर झाला आहे.. मी निघते आता"

"काऊ थांब..मी येतो सोडायला"बबलु काऊ ला थांबवत बोलला..

काऊ थांबून बोलली "का थांबु ??कोणासाठी??मी विचारलं तुम्हाला त्या कस्तुरी बद्दल..एकाने तरी काही सांगितले का??मग मला सुध्दा आता थांबवायचा अधिकार नाही तुम्हाला आता??बाय.."

काऊ जाणारच होती तेवढ्यात सियालने तिचा हात पकडला..
"जाणून घ्यायचं आहे ना तुला.. कस्तुरी बद्दल.. ऐक मग...ती माझी कस्तुरी होती.. समजलं??
माझी कस्तुरी...
जी आता नाही या जगात..
तिच्या आठवणी पासुन पण मी लांब गेलो तर तु आज तिच्या बद्दल जाणायला बघतेयस??
ऐक मग"

काव्या तु याचवर्षी या कॉलेज मध्ये admission घेतलं..
आम्ही जेव्हा बारावीला होतो तेव्हा अकरावीला new admission घेतलेल्या मुलांची रैगिंग करायची fashion आली होती..
अनु पण आमच्याच ग्रुप मध्ये असायची..
कॉलेजमध्ये एक नवीन चेहरा दिसला आम्हाला..
अकरावीची नवीन विद्यार्थीनी...
कस्तुरी.....

कोण होती कस्तुरी..?सियालची ती कोण??कशी मेली ती??काय झालेले तिला??ती खरचं या जगात नाही मग कुमार ने कोणाला बघितलं??अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात..

Group content visibility: 
Use group defaults

कऊ भारी!मी पहिला>>>धन्यवाद Ironman

लवकर टाका पुढचा भाग.वाट पाहतोय.पुलेशु!>>धन्यवाद

मस्त लिहिलंयस. पुढील भागाच्या प्रतिक्षेत>>लवकरच पुढचा भाग येईल