तुझ्यासाठीच सगळं जगणं आहे

Submitted by र।हुल on 9 July, 2017 - 09:05

स्वत:त मश्गूल मी लक्षातच आलं नाही..
प्रेम तुझं मला ध्यानातच आलं नाही..
तुझ्या स्पर्षाला पारखा मी..
धुंडाळूनी सारं जग, तुला भेटताच आलं नाही..

आयुष्य होतं दु:खानं उधाणलेलं..
तुझ्या येण्यानं मग बहरलेलं..
फसलो मीच मायेत माझ्या कर्मानं..
हित कसं माझं मला गवसलंच नाही..

एकची आस आता आहे..
तुझ्यासाठीच सगळं जगणं आहे..
वेडावून माझ्या मनाला रे..
दे हाक ह्या अंतरीच्या प्रणवाला रे..
येईन विसरूनी माझ्या जगाला..
तुझ्यात सामावण्या ह्या कायेला रे..

―₹!हुल

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान राहुल....

"स्वत:त मश्गूल मी लक्षातच आलं नाही..
प्रेम तुझं मला ध्यानातच आलं नाही"

हे खुप आवडल !!