आपका स्वागत है , मेरे दोस्त !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 09:11

गेल्या ७० वर्षाम्तला भारताच्या पंतप्रधानांचा पहीला इज्राईल दौरा !!

गेल्या ७० वर्षांत ईज्रायल सारख्या सामर्थ्यवान देशाला ईग्नोर करण्याच महान काम आपल्या सरकारने आता पर्यंत
केलेल आहे. त्याच बरोबर पॅलेस्टाईन सारख्या देशाच समर्थन सुद्धा केलेल आहे.

खुपच थोड्या लोकांना, जसे की अमेरिकेच्या अध्यक्षांना व पोप ईज्रायल देशाने ग्रँड रिसेप्शन दिलेल आहे. त्या
श्रेणीत श्री नरेंद्र मोदीजी आज जाऊन बसले आहेत. श्री नरेंद्र मोदीजींना तसेच रेड कार्पेट वेलकम दिलेल आहे.
श्री नरेंद्र मोदीजींना आपका स्वागत है , मेरे दोस्त !! अस म्हणत ईज्रायल चे अध्यक्ष बेन्जामिन नेतनन्याहु स्वागत केले.

श्री नरेंद्र मोदीजींनी ह्या आपल्या भेटीत महत्वाचे संरक्षण व टेक्नॉलॉजीचे करार केलेत.

श्री नरेंद्र मोदीजींच्या ह्या दौर्या बद्दल आपल्याला काय वाटत ?
ईज्रायलचा भारतातील शेती पद्धतीवर काय प्रभाव पडणार आहे ?

Group content visibility: 
Use group defaults

मस्त धागा विषय..
पण काय हो मिलींदजी, शिर्षक कमालीचं भारी योजलंय...
आओ दोस्त लोग अभी..मिलींदजी ने बुलाया हैं। Lol

कायम इस्लामिक आतंकवाद्यानी वेढलेला व सगळ्यांना पुरुन उरलेला देश म्हणजे इस्राईल. सध्या भारतातही थोड्याफार फरकानी तो वेढा पडायला सुरुवात झाली आहे. काश्मीरची दगडफेक आपल्यासाठी जरी नवीन असली तरी इस्राईलला असले प्रकरण हँडल करण्याचा दांडगा अनुभव आहे. तो अनुभव काश्मीरात मोदी-डोवाल जोडीनी वापरण्याची पूर्ण शक्यता आहे.
काश्मीरला शांत कसे करायचे याचे धडे इस्राईलच देऊ शकतो. मोदीचा टाईमिंग परफेक्ट आहे.

मी वाचल्याप्रमाणे, कहुताचा अणुप्रकल्प भारत आणि इस्राइल नं संयुक्तपणे हल्ला करून नष्ट करण्याचं योजलं होतं परंतु नंतर आपल्या तत्कालीन सरकारनं माघार घेतली आणि पाकिस्तान पुढे जाऊन अण्वस्त्रधारी राष्ट्र बनला आणि त्यांच 'Bomb For Ummah' चं स्वप्नं साकार झालं.

काश्मीरची दगडफेक आपल्यासाठी जरी नवीन असली तरी इस्राईलला असले प्रकरण हँडल करण्याचा दांडगा अनुभव आहे. तो अनुभव काश्मीरात मोदी-डोवाल जोडीनी वापरण्याची पूर्ण शक्यता आहे.

<<

मुळात इज्रायल मध्ये, भारतात आढळणारे मानवाधिकारवाले, तथाकथित सेक्युलर, निधर्मांध, पाकिस्तान प्रेमी, अफजल गॅंग व डावे यांच्यासारखे हिंदुस्थानी सैन्याच्या प्रत्येक कृतीवर आक्षेप घेणारे व सैन्याने एकादी कारवाई केली तर त्याचे पुरावे मागणारे कोणीच अस्तित्वात नाही, इज्रायली सैन्याच्या प्रत्येक कृतीमागे तिथले सरकार, विरोधी पक्ष व इज्रायली नागरिक समर्थपणे उभे राहतात.

इज्रायली सैन्य ज्याप्रकारे कारवाई करुन दगडफेक्यांना वठवणीवर आणते, तशी कारवाई हिंदुस्थानी सैन्याने, काश्मिरी दगडफेक्यांवर केल्यावर सर्वात आधी पोटशूळ इथल्या पाकिस्तानप्रेमी/अफजल गॅंग, सोकॉल्ड ढोंगी पुरोगामी, तथाकथित निधर्मांध, डावे व मानवाधिकारवाल्यांना उठेल.

मेजर नितिन गोगई यांनी स्वत:च्या व त्यांच्या तुकडीच्या संरक्षणासाठी एका काश्मिरी दगडफेक्याला फक्त जीपला बांधले या घटनेवर वरिल सर्व ढोंग्यानी आकाशपातळ एक करुन सैन्यावर यथेच्छ टिका केलेली, दगडफेक्यांवर पॅलेट गनचा वापर करण्याऐवजी, बंदुकीतून लिमलेटच्या गोळ्यांचा मारा करावा हि ह्या ढोंगी लोकांची अपेक्षा तेंव्हा इज्रायली सैन्य ज्याप्रकारे दगडफेक्यांना हँडल करते तसे भारतीय सैन्य कधीही करु शकत नाही.

मुळात इज्रायल मध्ये, भारतात आढळणारे मानवाधिकारवाले, तथाकथित सेक्युलर, निधर्मांध, पाकिस्तान प्रेमी, अफजल गॅंग व डावे यांच्यासारखे हिंदुस्थानी सैन्याच्या प्रत्येक कृतीवर आक्षेप घेणारे व सैन्याने एकादी कारवाई केली तर त्याचे पुरावे मागणारे कोणीच अस्तित्वात नाही, इज्रायली सैन्याच्या प्रत्येक कृतीमागे तिथले सरकार, विरोधी पक्ष व इज्रायली नागरिक समर्थपणे उभे राहतात.
>>>
अतिशय अत्माविश्वासाने दिलेली अत्यंत चुकीची माहिती. इस्रायलमध्ये भारतीय समाजात आहेत तश्या डाव्या-उजव्या-सनातनी-पुरोगामी आणि त्याच्या अधेमधे वावरणारे (कट्टर झायानिस्ट, माइल्ड झायानिस्ट, आशियावादी, पूर्ण लिबरल) समूह आहेत.
"वाचाल तर वाचाल" याचे सद्य युगात "सर्व बाजूंचे लेख/साहित्य वाचाल तर वाचाल" असे केले पाहिजे. फक्त 'इस्रायल छळाकडून बळाकडे" वाचून स्वतःची मते ठाम केलीत तर झापडबंद राहाल.

धाग्याचा मूळ विषय: आपण इस्रायलबरोबर मैत्री करायला उशीर केला ही गोष्ट खरी आहे. कोल्ड वॉर संपल्यावर जेव्हा इस्रायलबरोबर औपचारीक परराष्ट्र संबंध प्रस्थापित केले तेव्हाच खरेतर संबंध अजून दृढ व्हायला हवे होते. पण एक प्रधानमंत्र्यांची भेट सोडल्यास इस्त्रायल व भारताचा व्यापार गेली अनेक वर्षे 'वाढता'च आहे. बदलत्या धोरणानुसार आपण अधिक इस्रायलच्या जवळ जाणे साहजिकच आहे व आजच्या घडीला ते बरोबरही आहे.

लष्करी व शेती संदर्भातील इस्त्रायलची प्रगती सर्वांना सुपरिचित असते. मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातदेखील इस्त्रायली कंपन्या फार मूलभूत काम करतात. अनेक 'नवीन उत्पादने' (इनोवेशन) इस्त्रायली कंपन्या बाजारात आणत आहेत. या क्षेत्रात अधिक सहकार्य / को-डेवलपमेंट व्हावी अशी इच्छा. विशेषतः भारतीय कंपन्यांच्या सर्विस मॉडेलमध्ये ही उत्पादने अंगभूत(इण्टिग्रेट) करून अ‍ॅडेड सर्विसेस विकणे दोन्ही पक्षांना फायद्याचे ठरेल.

OCI cards to all Indians in Israel is Modi's biggest gift to us'
The Indian community said that the prime minister surpassed all of their expectations.
Prime Minister Narendra Modi and Israeli Prime Minister Benjamin Netanyahu.
Indians in Israel, especially Jews, have expressed “joy” with Prime Minister Narendra Modi “surpassing” their expectations in addressing some of their key concerns and making them feel proud of their roots.
“I was almost in tears. We knew that Prime Minister Modi has tried to invigorate the Indian diaspora across the world and make them feel proud of their roots. He has connected so well with them everywhere he has gone and has not forgotten to reach out to them,” Yona Maliker, who immigrated from Seoni, a place near Nagpur, 33 years ago, said.
“It was joy beyond belief to hear at the way he passionately talked about our connection with our motherland. It is a historic visit the Indian Jews will remember for a long time,” Maliker said.
Modi “touched the nerve” of all Indian communities living in Israel by bringing up stories that they could relate to.
“He had something cheerful to say about the Bene Israel, the Cochinis, the Baghdadis, the Bnei Menashe but also did not disappoint Indian students and a small group of caregivers who work in Israel,” Brajesh, a student from Bihar at the Hebrew University noted.