शिकलेले अ"शिक्षित"

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 7 July, 2017 - 02:17

शिकलेले अ"शिक्षित"

"पाय खाली घे" मी तिला खुणेनेच सुनावलं.
ती- माझे टोज दुखतायत, सीट ला टच होत नाहीयेत माझे शूज.
मी- टच झालेले दिसले तेव्हाच सांगितलं मी.
तिला काय चेव चढला कोण जाणे..
ती- तुला काय करायचंय? तुझं काय जातंय?
आता कॉर्पोरेट जगात काम करतेय हे पेहरावावरून दाखवणाऱ्या तिला माझा जोशही दाखवणं गरजेचं होत.
मी- काही नाही करायचंय... बट आय अँम जस्ट एजुकेटिंग यु ... म्हणजे टिचिंग यू बाबी...
तिचा चेहरा खर्रकन उतरला , पण स्वतःचा हेका नाही सोडायचा हा जणू तिचा गुणधर्मच असावा.. पाय तसेच वर केलेले, फक्त सीट ला स्पर्श न होण्याची काळजी ती घेत होती..
आता मलाही माझा गुणधर्म दाखवणं भाग होतं. काढला मोबाईल ब्यागेतून ..म्हणजे स्मार्टफोन... आणि फिरवला त्याचा कॅमेरा तिच्याकडे... तिची नजर माझ्याकडे होतीच... आणि माझ्या डोक्यातली सुपीक कल्पना तिने हेरली... एक्सपोज होऊन कस चालेल...? हे फेसबुक, व्हाट्स अप... दुसऱ्या सेकंदाला पाय खाली गेले... आणि माझा फोन पुन्हा ब्यागेत गेला...

©2017: मयुरी चवाथे – शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त ! .
जाम वैताग आणतात अशी लोक . खरोखरच शिकलेले अ"शिक्षित

मयुरी
तुझे बरेच लेख मला आवडले आहेत.हा लेख काही नाही झेपला पण.

हा कुठे घडलेला किस्सा आहे? कारण लोकल ट्रेनने प्रवास करताना समोरचा बाक रिकामा असेल (अर्थात क्वचितच असे घडते) तर चपला काढुन पाय स्ट्रेच करायला हरकत नसावी असे वाटते.

तर चपला काढुन पाय स्ट्रेच करायला हरकत नसावी असे वाटते.
>>>>
हो.. चप्पला काढून.. मी सुद्धा याच मताचा आहे. मुंबई लोकल ट्रेनबाबत तर मध्यमवर्गीयांची दुखे त्यांनाच ठाऊक. त्यांच्यासाठी हे सुख असते.

पण येस्स, कोणी त्या सीटवर शूज किंवा सॉक्स ठेवले तर ते माझ्या डोक्यात जातात. तसेच पाय कोणाच्या जवळ जाऊ नये याचीही काळजी घेणे गरजेचे. तसेच काही जण पायावर काटकोनात पाय टाकून असे बसतात की तो सोंडेसारखा शेजारच्याच्या गुडघ्याजवळ जातो. अश्यांनाही मी फटकारतो.

आपलं म्हणणं बरोबर असलं तरी वागणं चुकलं Sad
त्या मुलीचा फोटो घेणे कायदेशीर दृष्ट्या चूक आहे. रोड रोमिओ हरासमेंट आणि तुमच्यात by principle काहीही फरक नाही. दुर्दैवाने मला आपण ह्या सर्व बाबींचा कळकळीने विचार करता आणि आचरणात आणता हे वेळोवेळी माहीत आहे. परंतु, त्या मुलीसाठी तुमची वर्तणूक right person at wrong place

राजसी, मयुरीताईंना कदाचित फक्त हेच अपेक्षित असावं, फक्त कैमेरा रोखल्यानं तीनं पाय खाली घेणं आणि सुदैवाने तसंच झालं. पुढची पायरी गाठण्याची गरजच पडली नाही.

राया... >>तिने शूज घातले होते... जे तिने मान्य केले पहिलेच माझे शूज टच होत नाहीयेत म्हणून.

राजसी...>> आपलं इथेच चुकतं... ती चिखलाने बरबटलेला शूज सीट वर ठेऊ शकते तेव्हा ती त्रास देत नाही का? आणि मी काही हौसेने केले नाही..तिला नीट शब्दात इतरांना कळणार नाही या भाषेत सांगितलेले.
आणि तिने माझा अंदाज बरोबर ओळखला आणि पाय खाली गेले.
तिची चूक नसती तर नक्कीच माझं वागणं कायदेशीररित्या गुन्हा ठरलं असत .. पण ते नव्हतं

चपला काढुन पाय स्ट्रेच करायला हरकत नसावी असे वाटते. >> का हरकत नसावी. चपलांच्या आतमधिल पाय हे गंगाजलाने धुतलेले असतात का?? हल्ली मुंबईत हा प्रकार फार बोकाळला आहे. मागे दोन कॉलेज कुमार असेच पाय ठेवुन बसले होते. हटकल्यावर 'तुम्हारा क्या जाता है' वगैरे! मग म्हटलं मी पण बुटातून पाय काढुन तू बसला आहेस तिथे ठेवतो मग तू बस त्याजागेवर. लागलीच पाय काढुन घेतला.

चपलांच्या आतमधिल पाय हे गंगाजलाने धुतलेले असतात का? >> नाही, पण ट्रेनमधील सीट तरी कुठे गंगाजलाने धुतलेल्या असतात. तरी आपण बसतोच ना Happy

खरच पाय दुखत असतील बिचारीचे,, थोडा वेळ ठेवू द्यायचा होता पाय सीट वर...
Shoes टेकत नाही तर काय प्रॉब्लेम आहे, सीट ला हात लागला तर चालतो, ढुं*ण लागला तरी चालतय मग पाय ठेवला तर काय प्रॉब्लेम... जर बूट लागत नसेल तर...