पुरीभाजी आणि प्रेम (अंतिम)

Submitted by अजय चव्हाण on 5 July, 2017 - 00:23

पुरीभाजी आणि प्रेम भाग पहिला -
http://www.maayboli.com/node/62962

"अय्योबय्या" यायची आणि आपल्या टेबलावर बसायची कदाचित तिला त्यादिवसांपासून आपल्याजवळ सेफ वाटतं असावं...पण आपणं आपला अॅटीट्यूड का सोडला नाय.. आपण स्वतःहून काहीच बोललो नाय... पण तिचा अजुनही आपल्यावर राग होता...आणि खरं सांगू का रागात असताना ती जाम सुंदर वाटायची आपल्याला.....रोज रोज तेच घडायचं आणि आपल्या प्रेमाच्या भाजीला कधी फोडणीच लागली नाय..एकदा दारू पिऊन तर्र असताना पक्क्याला सांगितलं आपण आपल्या मनातलं...

पक्या तर आपल्या पक्क्याच आहे. पक्क्याच्या पोटात काही राहत नाही आणि पक्क्या आहेच साला छेद असलेल्या मिठाच्या बरणीसारखा....अख्या ऑफिसबाहेर आणि ऑफिसमध्ये आपल्या प्रेमाच्या खिचडीची वाफ नको त्या कुकरात घालून लोकं पसरवत होती....नशिब अय्योबय्या आपल्या ऑफिसात नव्हती...पण कसं कोण जाणे पण त्या खिचडीचा वास अय्योबय्यापर्यंत पोहचला होता.....एकेदिवशी ती ताड ताड आपल्याजवळ आली आणि रागातचं "नी इंदा मंडतरण पेरीयाण अड डडड गडड गडड बबबड" असलं काहीतरी पुटपुटली...आपण बी बोललो. "मराठीत बोल की, हे अडूगडू आपल्याला काय कळत नायं.." तशी ती "काय बकवास करतोस तु" हे काय चाललयं तुझं...चपलेने मारीन.. परत असलं काही माझ्याबाबतीत केलसं आणि पसरवलंसं तर."..आपण शांत...खूप काही बोलली ती आपल्याला.. त्यादिवशी पक्क्याला आपण ब्लेंडर पाजली ..आणि पोत्यात घालून धु धु धुतला...नंतर दवाखान्यात पण घेऊन गेलो...प्लॅस्टर लावलेल्या हातावर "साॅरी" भी लिहलं...आपण ना थोडासा कांईड हर्टेड आहे...कुणाचं दुःख पाहवत नाही आपल्याला.. आपण भलेही मारला असेल त्याला पण समजावलबी.....

त्या दिवसापासून आपण कॅटीनला जाणं सोडून दिलं...ऑफिसातच पार्सल मागवून खायचो..खरंतरं आपण जाम मिस करायचो ते टेबल,तो सुंगंध आणि अर्थातच "ती"...
जेण- जाणंही आपण आडवाटेने करायचो कधी चूकुन दिसली बिसली तर...?? हल्ली आपण पंकज उदास झालो होतो..
पुरीभाजीची पुरी पहिल्यासारखी गोड वाटेना आणि ऑफिसमधली कार्टीही आपण खात असताना नेमकं.." दिल के तुकडे तुकडे करके,मुस्काराकर चल दिए.." असल्या टाईपची गाणी मोबाईलवर लावत.. साल्यांनी आपल्याला चिडवण्यासाठीच डाऊनलोड केली होती...तेव्हा सगळ्यांचे तुकडे तुकडे करावेसे वाटून "सबके तुकडे तुकडे करके ,ग॔धी नाली में फेक दिए.."
असं गावसं वाटायचं पण आपण फक्त पुरीचेच तुकडे करायचो..
आणि मनातल्या बॅकग्राऊंडवर "ऐक दिन तेरी राहों में, बाहो में पनाहो में आऊंगा,एक दिन तेरा हो जाऊंगा" असलं काहीतरी ऐकू यायचं...

ऐक दिन आपण असाचं पुरी भाजी खात होतो...हल्ली दुसर्या कोणी गाणी लावण्याअगोदर आपणच लावायचो...त्यादिवशी मोबाईलवर आपण "ये दुनिया,ये मेहफिल मेरे कुछ काम की नही है.." हे गाणं लावलं होतं...इतक्यात पक्क्या आला आपल्याजवळ..जाम इमोशनल झाला होता आपल्याला पाहून हळूच खांद्यावर हाथ ठेऊन थोपटलं त्याने आपल्याला...
आपण त्याच्या डोळ्यांत पाहील... त्याचे डोळे डबडबले होते...
पक्क्या कसाही असला तरी आपला जिगरी होता...त्याच्याशिवाय जगण म्हणजे तंबाखुविना चुणा, चकणाविना खंबा...पण आपण काय बोललो नाही...आपण शांत..आमच्यात कोणीच चुकीचं नसतं..कोणी माफी मागत नाय...माफी बिफी आम्ही फाट्यांवर मारतो...काहीही झालं तरी आपली फ्रेंडशिप म्हणजे फॅविकाॅल का जोड...तुटने से भी नही तुटेगा...

त्यादिवशी पक्क्याने आपल्याला जबरजस्ती ब्लेंडर पाजली..
पोत्यात घालून धु धु धुतला आपल्याला... आपण कारण नाही विचारलं पण पक्क्या मुद्दाम नाय मारणार आपल्याला.. माहीत आहे ...हाॅस्पिटलातही घेऊन आला....हाताला पायाला प्लॅस्टर लागलेलं....चेहरा व फ्युचर सोडून जमेल तिथे व्यवस्थित पक्क्याने हाथ साफ केला होता...आपल्याला चालता येईना ..म्हणून हाॅस्पिटलताच राहावं लागणारं होतं...पक्क्या खाण्यापिण्याची, बिलाची काळजी घेत होताच...

दुसर्या दिवशी सकाळी आपण उठलो तेव्हा बघतो तर काय?
"अय्योबय्या" आपल्यासमोर ...हातात गेट वेल सुनच कार्ड आणि बुके...हसत हसत दिलं तिने आपण घ्यायला हाथ पुढे केला...हातातल्या प्लॅस्टरवर " ख॔डोबा लव्ह म्हाळसाबाई & भानूबाई" असं लाल मार्करने मोठ्या अक्षरात लिहलेलं...
च्यायला हे कोणी लिहलं?? मनातल्या मनात पुटपुटत
आपण लगेच झाकून मागे घेतला...आणि दुसरा हात पुढे केला...
"इतक्यात काय लपवतोस दाखवू बघू" असं म्हणतं हलकेच तिने माझा आपल्या हातात घेतला आणि लिहलेलं वाचुन खुदकन हसली...काय हसू होतं राव तिचं...जणू काही संथ नदिचा छानसा खळखळाट...आपण पाहताच बसलो...तसं "काय पाहतोयसं माझ्याकडे असं" असं तिने म्हणल्यावर आपण "च्याक" केलं..
"माहितेय मला मी खुप छान हसते.." असं ती बोलल्यावर
"च्याक...तु हसताना छान दिसते.." आपण बोलून गेलो आणि जीभ चावली आणि ती अजुन छान हसली...
"हसी तो फसी.." हे आपल्याला ठाव आहे...मग काय आपणबी मुद्दामच "आई ग.." काहीतरी दुखल्याचं नाटक केलं...
"दुखतयं का खुप...कुठे दुखतय तुला" असं आस्थेवाईकपणे विचारल्यावर आपण डावीकडे छातीवर हात ठेवला...
तिने जोराचा गुद्दा हाणला आपल्याला ..मग मात्र खरोखरचं आपण "आई ग " केलं...

काय बोलाव॔ हे कळं ना....आपण शांत बसून राहीलो...तिने जवळचं असलेलं मार्कर घेतलं...आपला हात हातात घेऊन भानुबाई आणि म्हाळसाबाई ला काट मारून तिचं नावं"सुचित्रा" लिहलं..

"माहीत आहे मला तुझं किती प्रेम आहे माझ्यावर..वेडा माझ्यासाठी जीव द्यायला चालेलास.. पकक्याने सगळं सांगितल मला त्यादिवशी तुच उत्तप्पा पाठवला होतास ना...माहीत होतं मला...आणि त्या पोराला मारलसं ना ते ही कळलं मला...एक सांगू मलाही तु आवडतोस आय लव्ह यु" असं म्हटल्यावर आपण तिला मिठीत घेतल आणि आपण पक्क्याकडे पाहीलं..पक्क्याने आपल्याला डोळा मारला आणी थॅम्स अप करून निघून गेला..इथे आपण अय्योबय्याला साॅरी सुचित्राला अजुनच घट्ट पकडलं.....कसं आहे ना ...आपल्याला एखादी गोष्ट आवडली की, आवडते आपण नाय सोडत तिला कधी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लई भारि
अय्योबय्या चेन्नई एकसप्रेस मधल्या दिपिका सारखि वाटलि

मस्त !
आवडली, अय्योबय्योची लव्हस्टोरी.

आवडली स्टोरी...
अश्या रूटीनमध्ये दिसणारया अनोळखी मुली पटायचा चान्स फार कमी असतो. फिल्मी स्टाईल आणि फिल्मी एंडला पर्याय नाही..

फार क्युट लिहिली आहे गोष्ट. नेहमीचीच फिल्मी स्टोरी आहे खरतर पण लिहायची स्टाईल इतकी मस्त आहे. फार आवडली.

Pages