कोसळ तू आज धुवांधार

Submitted by दत्तात्रय साळुंके on 2 July, 2017 - 04:18

ढगांचा वाजवित ढोल
पानोपानी धरीत ताल
न्हाऊ धरेला घाल
कराया आसमंती एल्गार
कोसळ तू आज धुवांधार

वाहील नदी नाल्यात संजीवनी
नाचतील झाडे आनंद भुवनी
पाखरे गातील पाणीदार गाणी
मैफिलीत रंग भराया मल्हार
कोसळ तू आज धुवांधार

दऱ्या डोंगर उल्लघुनी
खेळ तू रानोरानी
नाच मयुरासम फेर धरोनी
चिंब, चिंब होण्या चराचर
कोसळ तू आज धुवांधार

डोलता पीक रानात
संसार टाकील कात
भल्लरी घुमुदे शेतात
कराया जगण्याचा जागर
कोसळ तू आज धुवांधार

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults