माणसं अशी का वागतात ?

Submitted by केदार जाधव on 30 June, 2017 - 05:14

गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमधून आलेल्या उद्वेगातून हे लिहितोय तेव्हा जर थोडा चिडचिडा सूर जाणवला तर सुरूवातीलाच माफी मागतो. काही घटना इतक्या साध्या असतील की कुणालाही वाटेल हा का इतका विचार करतो ? पण मी विचार करतो अन मग सगळ्याचा एकत्र प्रचंड त्र्रस होतो , म्हणून त्याचा निचरा करून हलक होण्यासाठी हे लिखाण . यातल्या काही घटनाना दुसरी बाजूही असू शकते याची मला पूर्ण जाणीव आहे हेही तितकेच खरे आहे .

गेल्या काही दिवसापासून घडत असलेल्या छोट्या छोट्या घटना पाहिल्या की अस वाटू लागत की काही माणसांचा स्वभाव हा बेसिकली वाईट असतो . एखाद्या वेळी जीवन मरणाचा प्रश्न असेल किंवा काही मोठा लाभ /हानी होणार असेल तर वाईट गोष्टी करणे मी समजू शकतो , पण अस काही नसताना उगाच माणूस जेव्हा वाईट वागतो तेव्हा अगदी त्रास होतो.

१. तुम्ही तुमच्या मित्रांच्या आग्रहाखातर तुमचा जॉब सांभाळून मिळालेल्या वेळात विनामूल्य जर्मन भाषेचा क्लास घेत आहात . त्यासाठी २ २ तास नोट्स काढत आहात , अन महिन्याभराने घेतलेल्या अगदी सोप्या टेस्टमधे एक जण ० मार्क घेऊन येतो अन विचारल्यावर मला वेळ नाही अभ्यासाला म्हणतो , त्यावेळी काय करायच ?

२. तुम्ही लहान मुलांच्या पार्टीला गेला आहात . तुमची मुलगी अन एक मुलगा एकच फुगा घेऊन आहेत , तो मुलगा तिला मारतो आहे , (आमची पोरगी चांगली पैलवान आहे , पण कुणाला मारायच नाही ही आमची शिकवण )
त्यात त्याची आई येते अन मुलगीच्या हातातील फुगा हिसकावून त्याला देते , तुमची मुलगी रडू लागते , काय करायच ?

३. सध्या बायकोला घरी यायला वेळ होतो , म्हणून तुम्ही मुलीला सोसायटीच्या गार्डन मधे घेऊन जाता , दोनच झोपाळे . तुम्ही शांतपणे तुमच्या टर्नची वाट पाहता . टर्न आल्यावर तुमच्या मुलीला बसवता . २ च मिनिट झाली असतील , एक आजोबा नातीला घेऊन येतात , तुम्ही तुमच्या मुलीला १७ मोजून उतरवता (तिला तेवढच मोजता येत) आणि टर्न टर्न बसायच हे सांगता. आजोबा नातीला बसवतात. २ , ३, ५,१० ,२० मिनिट होतात . मुलगी बिचारी तुमच्याकडे अन तुम्ही आजोबांकडे बघता , आजोबा ढिम्म . तुम्ही मुलीला स्लाईड्स वर घेऊन जाता .

४. साधं सोसायटी मधल्या क्रिकेटच उदाहरण . आपण खेळतो ते मनोरंजनासाठी , मनाचा ताण हलका करण्यासाठी . यात माणूस का चिडत असेल ? खोटेपणा करत असेल ? काय साध्य होत त्यातून ? हाफ पिच मधे कुणीही फास्ट बॉल फेकू शकत हे माहित असताना , अन फास्ट बॉल अलाऊड नसताना फास्ट बॉल फेकून अन तो नो नाही म्हणून भांडण्यात काय मर्दुमकी आहे ? Out आहे हे सगळ्याना माहित असूनही केवळ भांडून नंतर तुम्ही शतक काय त्रिशतक जरी केल तरी ते गल्लीत टेनिस बॉलने हाफ पिच वरच ना ? Is it worth it ? कळतच नाही .

ही लगेच आठवलेली प्रातिनिधिक उदाहरणे. अन ही सगळी माणस काही रूढार्थाने वाईट नाहीत , किबहुना आपण काही वाईट करतोय हेच त्याना वाटत नसेल .
पण खरच काही कळत नाही . लोक सिग्नल का तोडतात ? वन वे मधून (अगदी खंबाटकीच्या बोगद्यातूनही) गाडी का घालतात ? यासारख्यापासून ते जिम मधली उपकरण का तोडतात ? स्विमिंग पूल मधे घाण का टाकतात ? लिफ्टच्या सेन्सरपाशी का थुंकतात ? असे अनेक प्रश्न . यातून त्याना असा काय मोठा फायदा होतो ? की ते तसेच आहेत ?

हे सगळ पाहून कधीकधी वाटत मात्र, की आपण तर कसे का होईना यात आपली तत्त्च (मोठा शब्द वाटतो ना , प्रिन्सिपल्स सोप आहे ) घेऊन तरलो . पण सगळ जगच अस असेल तर आपण आपल्या मुलीला दुबळं बनवत नाही ना ? थोड वाईट आपणही बनल पाहिजे का ? किमान तिलातरी बनवल पाहिजे का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ ऋन्मेष, वा:, मस्त प्रतिसाद दिलाय. हम तो फिदा है आप पर!

तसं पाहिलं तर मला सगळ्यांचंच म्हणणं पटतंय. छान चर्चा! Happy

२ आणि ३ मध्ये लोकांना सिविक सेन्स नाही. काहीही करू शकत नाही. लुक्स दिले तर ते एकतर कळत नाही किंवा कोडगे असतात. मूव्ह ऑन.

४ मध्ये काही फार सिरीयस वाटलं नाही. भावंडांबरोबर पत्ते खेळताना चीटिंग करायला कसली भारी मजा येते. चॅलेंज मध्ये चार चौव्या सांगून सात आठ पानं घुसडायची, जो भिडू असेल त्याला काही न बोलता आपल्याकडे काय आहे, काय खेळ हे सांगायचं, आणि केलेली चापलुसी उघडकीस आली की फटके खायचे. मजा येते असं करायला. काहीही मिळणार नसतं पण तरी आवडतं ओचकडून घ्यायला.
१ मध्ये पण फार काही वाटलं नाही. दुसऱ्याला शिकवणे सोपी गोष्ट नाही इतकंच वाटलं.

४ मध्ये काही फार सिरीयस वाटलं नाही. भावंडांबरोबर पत्ते खेळताना चीटिंग करायला कसली भारी मजा येते.
>> माझ्या मते ते आणि हे वेगळ आहे, एकतर खेळणारे सगळे तुमचे अगदी जानी दोस्त नसतात , दुसर त्यामुळे ग्रजेस / पूर्वग्रह बनत जातात अन सगळ्या खे़ळण्याचा विचका होतो .
एनीवे , तुमच्या म्हणण्याचा आदर आहेच . मेबी क्रिकेट माझ्यासाठी अगदी पवित्र वगैरे असल्यामुळे कदाचित होत असू शकेल , इतराना त्यात काही वाटणार नाही हे मान्य आहेच .
१ साठी फक्त त्याने थोडे एफर्ट घ्यावेत किंवा मला जमत नाही एवढ आधीच सांगाव एवढीच अपेक्षा होती . अगेन , प्रत्येकाच मत वेगळ असू शकेल.

क्रिकेटमधील चिटींग बाबत अमितव आणि केदार दोघांशी सहमत.
आपल्या गल्लीत खेळताना मी सर्वात मोठा चीटर म्हणून फेमस होतो. माझ्या चिडण्याचा आणि शिव्यांचा आवाज प्रत्येकाच्या घरापर्यण्त जायचा. त्यात टाईमपास होता. मजा येते ते दिवस आठवून. आजही तसाच आहे, पण जॉबला लागल्यावर क्रिकेट बरेपैकी थांबलेच आहे.
मात्र तेच बाहेरच्या टीमशी मॅच असेल, त्यातही पैश्याची असेल, तर मी कुठल्याही चिटींगच्या विरोधातच असायचो. तिथे कधीच केली नाही उलट समजूतदारपणाचे तोडगेच काढल्याने मांडवली बादशाह म्हणून फेमस होतो.

चिटिन्ग करुन खेळणारे मलाही आवडत नाही, भावण्डात पत्ते खेळताना वैगरे ठीक आहे पण गल्लि क्रिकेट किवा इतर खेळात रडिचा डाव खेळणारे दुसर्‍याचा अगदी विरस करतात हे मात्र खर,
सिव्हिक सेन्स असण हे भारतात तरी बालवाडी पासुन शिकवायला हवय.

मुळात आपण (किमान २५ वर्षापुढचे )खेळतो का ? तर माझ्या मते नेहमीच्या ताणतणावातून घटकाभर मोकळीक मिळावी म्हणून . तिथे चिटींग करून काय मिळवणार आहोत ? गल्ली क्रिकेटमध्ये टेनिस बॉलवर मारलेल शतक तो दिवसही कुणी लक्षात ठेवत नाही ? मग का ? काही महाभाग तर तिथेही सिनिअर ज्युनिअर ,मॅनेजर एम्प्लोयी फार काय ओनर टेनंटही आणतात ? का ?

१. धागा ह्यासाठी आवडला की ह्यात नेहमीचे वादविवाद होणार नाहीत. ह्या धाग्याखालील चर्चा ही तरीही खूप उत्साहाने केलेली असेल.

२. धाग्यात विचारलेल्या प्रश्नांवर सर्वसाधारण उत्तरे:

- ऋन्मेष म्हणतो त्याप्रमाणे वाईटाशीही चांगले वागणे
- रोखठोक बोलता येत असेल तेथे बोलून इतरांना नियमांचे, नीट वागण्याचे पालन करावयास लावणे
- ह्यापैकी काहीच शक्य नसेल तर पुन्हा ऋन्मेष म्हणतो तसे 'आपण काय आहोत' हे ओळखून त्यानुसार अपेक्षा ठेवणे

३. धाग्यातील प्रश्न तसे पाहिले तर दैनंदिन जीवनाशी जवळून संबंधीत आहेत. पण ह्याहीपेक्षा अती भयंकर अश्या समस्यांचा उगाचच सामना करावा लागण्याचे काही अनुभव आलेले आहेत. काही वेळा आपली काहीही चूक नसताना अगदी दगड, तलवारी वगैरे घेऊन अंगावर आलेली माणसे भेटलेली आहेत. तेव्हा आपण किती किरकोळ आहोत हे जाणवते. त्यामुळे अधिकच नम्र व 'सेफली जगणारा' व्हावे लागते. पण म्हणून हेच मुलांनाही शिकवायचे का? तर त्याबाबत दोन विरुद्ध उत्तरे असू शकतील कदाचित! असेच मुलांना शिकवणे म्हणजे त्यांनाही अशक्त बनवणे असे म्हणणारेही असतील. मुलांना 'ईट का जवाब पत्थरसे' असे शिकवायचे असेल तर स्वतःमार्फत ते उदाहरण घालून द्या म्हणणारे असतील.

मला तर आजकाल निराळेच वाटू लागले आहे. 'डरानेवालेसे डरती है दुनिया'! पहिल्याच खेपेत असे घाबरवायचे आणि अशी अद्दल घडवायला जायचे की चूपचापच झाले पाहिजे सगळे!

एक आणखीन नवीन विचार माझ्या एका मित्राने मला सांगितला तोही मजेशीर वाटला. 'शांत डोक्याने आवाज वाढवून कांगावा करायचा'! भले काही साध्य होवो ना होवो! भाषेचा तोल ढळू द्यायचा नाही, स्वतः मनातून शांतच राहायचे, पण आविर्भाव प्रचंड अन्याय झाल्यासारखा ठेवून तारस्वरात तक्रार करत ओरडत राहायचे. जमाव जमला की काही प्रश्न आपोआप सुटतात. (हे झोपाळ्याला लागू आहे, फुग्याला किंवा जर्मनच्या क्लासला नसेल. पण जर्मनच्या क्लासची फी भरून कोणी शिकायला वेळ नाही म्हणत असेल तर आपले सुदैव समजून मनातच हसावे इथपर्यंत वैचारीक प्रवास व्हायल हवा). असे माझे मत!

हे सगळ पाहून कधीकधी वाटत मात्र, की आपण तर कसे का होईना यात आपली तत्त्च (मोठा शब्द वाटतो ना , प्रिन्सिपल्स सोप आहे ) घेऊन तरलो . पण सगळ जगच अस असेल तर आपण आपल्या मुलीला दुबळं बनवत नाही ना ? थोड वाईट आपणही बनल पाहिजे का ? किमान तिलातरी बनवल पाहिजे का ?>>>>
केदार , असं वाटत वाईट अनुभव आले कि. पण चांगल्या व्हॅल्युज कधीही वाया जात नाहीत. मुलांना चांगल्या आणि योग्य , तुमच्या तत्वात बसणार्‍याच गोष्टी शिकवा. पण त्याच बरोबर वरच्या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट कॉमन दिसली कि जिथे चुकतत्य समोरच्याच तिथे बोलता ही आल पाहिजे. हे जरूर मुलीला शिकवा. हे फक्त लहानपणीच नाही तर उद्या ऑफिस मध्ये, नातेवाईंकात, सोशल साईट्स वगैरे सगळीकडेच तिला उपयोगी पडेल.
प्रत्येक वेळि ते बोलायला पाहिजेच किंवा विरोध करताच आला पाहिजे अस नाही. काही गोष्टी सोडून द्यायच्या हे पण लक्षात ठेवलं पाहिजे.
उदा. फुग्याची गोष्ट. नेक्स्ट टाईम जेव्हा असा प्रसंग येईल तेव्हा मुलीला विरोध करायचा हे सांगता नक्कीच येईल.

तसच कुठल्या गोष्टीचा किती त्रास करून घ्यायचा , कुठल्या गोश्टीला किती महत्व द्यायच तेही आतापासून तिला छोट्या छोट्ञा गोष्टीतुन सांगता येत.
यशस्वी होण्यासाठी मीन वागता आल पाहिजे अस कुठ आहे. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायच, कुठली माण्स आप्ल्या आयुष्यत मह्त्वाची आहेत, योग्य ठिकाणि तक्रार करण , नेमक्या श्ब्दात आपला विरोध नोंदविणे, चटकन ड्रामा मधून बाहेर पडण,मुव्ह ऑन होणे हे ही तितकच महत्वाच आहे.
मला हे तुमच्या सारखे प्रश्न पडलेले आणि मी हे सगळ खुप उशीरा , अलिकडेच शिकले म्हणुन लिहिल.

या जगात भरपूर वाईट/इग्नोरंट माण्स आहेत.
आणि कर्मा विल गेट देम/ देव चांगल्याच चांगलच करतो अशा भ्रामक क्ल्पना मुलांना शिकविण्यात काहीच अर्थ नाही. मनाचा त्रास कमी होण्यासाठी केलेली लेम एक्स्क्युजेस आहेत ती.
पण जितकी वाईट माण्स या जगात आहेत तितकीच चांगली /सजग माणसं आहेत हे मात्र सत्य. ते मात्र जरूर आपल्या मुलांना सांगावे.

या जगात भरपूर वाईट/इग्नोरंट माण्स आहेत.
आणि कर्मा विल गेट देम/ देव चांगल्याच चांगलच करतो अशा भ्रामक क्ल्पना मुलांना शिकविण्यात काहीच अर्थ नाही. मनाचा त्रास कमी होण्यासाठी केलेली लेम एक्स्क्युजेस आहेत ती.
>> याला +११११

हम्म!
१. तुम्ही विनामुल्य मित्रांना शिकवत आहात हा तुमचा चांगुलपणा. पण बरेचदा फुकट मिळाले की किंमत नसते. तुमचे मित्रही तुमच्यासारखे सुस्थितीत आहेत असे धरुन चालते. तेव्हा तुम्हाला आर्थिक गरज नसली तरी लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणारी मैत्रीसारखी एखादी चॅरीटी ठरवा. शिक्षणाचा मोबदला म्हणून त्या चॅरीटीला ठराविक रक्कम देणगी म्हणून द्यावी अशी कल्पना ग्रूपमधे मांडा. वेळ नसलेल्या मित्राला शांतपणे सांगा की तुला सवड नाहीतर सध्या तर राहू दे. तुला सवय होईल तेव्हा मला वेळ असेल तर शिक्षण पुन्हा सुरु करु.
२. मुलीला अग्रेसिव बनवायचे नाही हे योग्यच पण अ‍ॅसर्टिव बनवा. त्यावेळी रडणार्‍या मुलीला दुसरे काही खेळणे देवून तिचे रडणे थांबवणे, तिने मारामारी केली नाही म्हणून कौतुक करणे, मावशी नाईस वागली नाही याबद्दल सॉरी म्हणणे इतपत करता आले असते. पुढल्या वेळी मोठे माणूस तिच्याशी अ‍ॅग्रेसिव / चुकीचे वागेल तेव्हा आपले म्हणणे योग्य प्रकारे मांडून विरोध कसा करायचा ते शिकवा. अगदी 'मावशी, असा फुगा /टॉय्/पुस्तक ओढून घ्यायचं नाही, शेयर करायचे' ' इतपत बोलता आले तरी समोरची व्यक्ती ओशाळते.
३. टर्न टर्न बसायचे हे तेव्हाच जमते जेव्हा दुसरी पार्टी तो नियम पाळणार आहे. समोर अनोळखी पार्टी असेल तर ती नियम पाळेल ही अपेक्षा नसावी. अशावेळी आम्ही १० मिनीटे बसु मग तुम्ही असे सांगुन अ‍ॅक्टिविटी पूर्ण करावी हे उत्तम.
४. लोकं अशी वागतात तेव्हा त्यांच्या बालीशपणामुळे आपले बिपी वाढवायचे नाही. सोअर लुझर म्हणून सोडून द्यायचे.
>>कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायच, कुठली माण्स आप्ल्या आयुष्यत मह्त्वाची आहेत, योग्य ठिकाणि तक्रार करण , नेमक्या श्ब्दात आपला विरोध नोंदविणे, चटकन ड्रामा मधून बाहेर पडण,मुव्ह ऑन होणे हे ही तितकच महत्वाच आहे.>> +१

जगात खूप चांगली माणसे आहेत पण काही वेळा माणसं चांगलं वागणं विसरतात आणि वाईट वागतात असे लेकीला समजावून सांगायचे.

Pages