" रवंथ "

Submitted by अज्ञात on 28 June, 2017 - 23:31

मध्यावर गलबत ना थांग अठाव विकल काहुर जळधी
मेघ पोरका लाट अनाथ उठाव उभार पुनव व्याधी
हिंदकळे गाभारा; पाउल ठसे पुसे; अंदाधुंधी
संथ रवंथ लगड लहरींची क्षितिज पारच्या ह्या नोंदी

दूर किनारा विरणारे क्षण विहग विचारांच्या झुंडी
नभातले संमोह निळे घनघाव उरापाशी कोंडी
जरी भुरळ मोहाचे मोहळ उंच बांधलेली हंडी
जन्म खुजा हाताशी पण सय भारित अमृत कासंडी

....अज्ञात 27/06/2017 नाशिक

Group content visibility: 
Use group defaults