माझ्याही कथुकल्या- भाग २!

Submitted by अज्ञातवासी on 24 June, 2017 - 11:31

आरंभमचा पुढचा भाग लिहिण्याआधी थोडं फिक्शन...

१. फॅमिली.

"ही जागा खूप छोटी पडतेय आता."
"अगं सगळं तर आहे इथे."
"काही नाहीये इथे."
"जास्तीचा हव्यास धरू नकोस. बघ हा आपला मोठा वाडा. तुझे आणि माझे आईबाबा. आपले कल्याण चिंतणारे नातेवाईक. नारळाची आणि पोफळीची झाडे. पंधरा गाड्या. पन्नास नोकर. तुला हवी असणारी सगळी चीजवस्तू इथे आहे."
"मला नकोय काही असलं..."
"मग निघून जा इथून...तो रागावला."
...आणि ती त्या मोठ्या फॅमिली फोटोमधून बाहेर पडली!"

२. ड्रायव्हर

"डायरेक्ट झाडीत घुसव लेका..."
किर्याने गाडी झाडीत घुसवली.
"शाबास लेका डायवर पाहिजे असा. आता बुंगाट पळव. राम्याला ठाव लागला नाय पाहिजे."
किर्याही जीव धोक्यात येईल अशी गाडी चालवत होता. मात्र पाटलाला त्याचं सोयरसुतक नव्हतं
मागून राम्याचा डायवर पाठलाग करत होता
"फोकणीचा डागल्या किर्याला दम देतोय व्हय? बग आमचा किर्या कशी टर्न घेतो आता!"
..आणि घाट ओलांडताना किर्याने घेतलेला टर्न बघून डागल्याचाही श्वास अडकला...
किर्या सुसाट निघाला...
...संध्याकाळी किर्या मालकाला म्हणाला.
"मालक तुम्हाला ना, आमच्यासारख्याची कायबी कदर नाय. आज बैलगाडी मोडली तरी शर्यत नाय हारलो आपण. बघा ना चंद्रभान पाटलाकड गंगीसाठी खडा टाकून."
पाटील उठला आणि म्हणाला.
"...दुभती हाय ती अजून. पान्हा आटू दे. कमी किमतीत मिळलं लेका! तुबी बैलबुद्धीच हाय.."

३. वापर.

ही काय भानगड आहे कळेना देवा...
बोल नंदी.
कुणालासुद्धा ठाव लागत नाहीये. कुणी आत गेला नाही. कुणी बाहेर आला नाही आणि त्रिशूल गायब...
हाताचे ठसे?
नाही देवा.
पायाचे ठसे?
तेही नाही देवा.
कुणी दोरी आत नेऊन तर त्रिशूल बाहेर ओढला नाही ना.
मग देवा तो जमीनीवर पडून जमिनीवरच्या सेन्सरने तो कॅपचर केला असता आणि अलार्म वाजला असता.
कुणी पक्षी उडत जाऊन तर त्रिशूळ चोरला नाही ना.
नाही देवा. काहीही झालं तरी त्याचे पंख जाळीला टच झाले असते. मग जाळीचाही सेन्सर वाजला असता.
अरे सीसीटीव्ही मद्धे काही कॅपचर नाही झालं?
मेंटेनन्ससाठी बंद होता.
अरे मग तिथे कुणाची ये जा झालीे, काही खबर?
हो देवा..
सांग.
लॉगबुक मध्ये इंद्र, कार्तिकेय, वरूण देव, गणपती, ब्रह्मदेव आणि पार्वती मातेची नोंद आहे.
आणि हे कुणाला आधी कळलं?
माता पार्वतीला. करण मोहनअस्त्र वापरून तयार केलेला त्रिशूल तिनेच ओळखला.
भगवान शिव हसले आणि म्हणाले.
...तू सोंडेचा वापर विसरलास नंदी!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच..
तिसरी आवडली.. Happy

तुमच्या कथुकल्या मला झेपतात अगदी... लिहित रहा.... Happy

थँक्स मेघा मयुरी समाधानी दक्षिणा अदिती.
राहुल बरोबर!
दक्षिणा वाटतायेत ना कथा अमानवीय Wink
मयुरी नवीन कथेच्या प्रतीक्षेत आहे. राहुल तुही लिही.
आणि मेघा विपु केली आहे.