माझ्याही कथुकल्या...

Submitted by अज्ञातवासी on 19 June, 2017 - 09:06

आरंभमचे तीन भाग लिहून झाले. पुढचं कथानक सुचत नाहीये. म्हटलं थोडं हाय फँटसी कथुकल्या लिहून बघावं. बघूया जमतंय का ते...

१. भारत माता की जय!

"भारत माता की जय."
"मोठयाने ओरडा..."
"भारत माता की जय!"
"अजूनही नाही...मोठयाने.."
"भारत माता की जय!!"
"पाठीत रट्टा घालेन, अजून मोठयाने..."
लोकांचा आता कंठ फुटायची वेळ आली होती, मात्र तरीही जनरलच समाधान होत नव्हतं.
शेवटी त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न होता.
शेवटी चिडून त्याने दोघांना रट्टा घातलाच...
आता मात्र लोक घाबरले, जीव काढून घोषणा देऊ लागले....
...आणि संध्याकाळ झाली, लोक थकून आडवे झाले. पण त्यांनी सगळे प्राण कानात आणले होते...
...घोषणा झाली!
"20,00,76,00,348 डेसीबल आवाजासह अर्थ 5897 वरील भारतिय लोक सर्वात जास्त देशप्रेमी ठरले आहेत."
....आणि उरलेल्या 12368 अर्थस वरील भारतीय जोरजोरात रडू लागले.

२. ब्रह्मांड....

कुठल्यातरी दूर देशात...
जिथे कुणीही नसेल.
फक्त आपण दोघे.
खरंच असं होईल?
तुला माझ्या प्रेमावर संशय आहे?
मला घेऊन चल ना मग लवकर.
प्रिये धीर धर, तिथे तुझ्यासाठी मोठा महाल तयार होतोय.
आणि?
आणि त्याबरोबर अजून खूप काही.
अरे पण सांग ना मला!
धीर धर प्रिये, ते फक्त तुझ्यासाठीच आहे...
मला काहीच नको, फक्त तू माझ्यासाठी रहा...
दोन्ही वेड्या जीवांनी एकमेकांना मिठी मारली...
...आणि मेसेज आला...
...सर महालाच्या पायरीला अजून १० ब्रास सूर्य लागतील..

३. सर्वज्ञानी

अंगावर वारुळे चढली होती!
हाडांवर मांस पूर्ण वाळले होते!
केसांच्या जठा पायापर्यंत आल्या होत्या!
डोळ्यांच्या फक्त खोबणी दिसत होत्या...
...आणि त्याला देव प्रसन्न झाला.
"देवा का इतकी वाट पाहायला लावलीस?" त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"बिझी होतो वत्सा."
"इतका कसा रे तू निष्ठुर? एकदाही तुला या पाडसाची दया आली नाही?"
"लवकर बोल, मला अजून बऱ्याच मीटिंग अटेंड करायच्या आहेत.... अँड दॅट पाडस इज टू ओल्ड फॅशनड यु नो...."
"देवा मला सर्वज्ञानी बनव. जगातल सगळं ज्ञान, खरं-खोटं सगळं ज्ञान मला मिळू दे."
"तथास्तु...!
देव अंतर्धान पावला."
आणि पुढच्याच क्षणी वॉट्सऍप आणि अनलिमिटेड इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेला फोन त्याच्या चरणांजवळ येऊन पडला...

(पहिलाच प्रयत्न.चुभुदेघे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडल्या..
दुसरी समजली नाही, उलगडाल का ईथे किंवा विपुमध्ये?

छान.
मला पण २ री तितकी समजली नाही.

३ री विशेष Happy
अजून १० ब्रास सूर्य लागतील..>>> हे मात्र झेपल नाही.ब्रास म्हण्जे काय ???

अरे व्वा!
भारीच लिहिल्यात कथुकल्या आवडल्या.. Happy

ब्रास म्हण्जे काय ??? >>>>>> वाळूच व्हॉल्युम मोजतात ब्रासमध्ये.

२ ब्रास वाळू लागेल घरासाठी... इ.इ.इ...

कदाचीत हाच ट्विस्ट असावा..

३री मलाही आवडली Happy

धन्यवाद सर्वाना.

२ री कथा एका एका अशा व्यक्तीची कथा आहे की त्यात तो खूप मोठा आहे. अनेक आकाशगंगेएवढा मोठा. आणि त्याच्या आकारमानापुढे सूर्य म्हणजे वाळूचा एक कण.

अशाच व्यक्तीनची ही कथा...

मी नव्या मेम्बर्सना (प्लॅटिनम, मेघा, सायुरी)रिक्वेस्ट करतो की त्यांनीही काहीतरी लिहावं.
वाटल्यास मी हेल्प करेन.
काहीतरी नवीन वाचायला मिळावं अशी अपेकशा.
खुशालराव तुम्हीसुद्धा

ironman ते कळलं होत पण ट्विस्ट काय आहे ते कळल नाही?
सुर्य कमी पडतोय म्हणुन महाल होणार नाही? की तो प्रेमात तिला फसवतोय(असेल तर ते कस हे कळल नाही)? की सुर्य वाळुचा कण भासावा इतके ते मोठे आहेत हे लास्ट लाईन मुळे कळणं(पण नाव आकाशगंगा आहे )? की अजुन काही?

ट्विस्ट वगैरे काही नाही अदिती.
तो महाल बांधतोय आणि त्याच्या विश्वात तारे म्हणजे वाळूचा एक कण...
त्याचं आकारमान अनेक आकाशगंगेपेक्षा मोठं आहे त्यामुळे त्याला सूर्य वाळूच्या कणाएवढा भासतो.
मग त्याच चककत्या अनेक सूर्याचा उपयोग तो वाळू म्हणून करतो...

छान आहेत तिन्ही कथुकल्या. दूसरी विशेष आवडली. High fantasy म्हणजे मज्जा. Variation म्हणून काही dark shades पण येऊ शकतील.

ब्रास म्हण्जे काय ?
ब्रास ही संज्ञा दोन कामांसाठी वापरली जाते :

i) loose building material ( रेती, गिट्टि वगैरे ) मोजण्यासाठी.
1 brass = 100 cubic feet volume. म्हणजे उदा : 8 ft X 4 ft एवढ्या एरियावर 2.5 ft उंच मेटीरियलचा थर लावला की झालं एक ब्रास.

ii) मिस्त्री, ठेकेदार surface area मोजण्यासाठी सर्रास ही concept वापरतात. 10 by 10 च्या खोलीत tiles बसवल्या की म्हणायचं एक ब्रास tiles बसवल्या.