दहीहंडीच्या निमित्ताने

Submitted by मिरिंडा on 19 June, 2017 - 04:20

लवकरच कालाष्टमीला दहीहंडी बांधली जाईल. त्या निमि त्ताने माझे विचार मांडीत आहे. आपले मतही द्यावे.

दहीहंडी हा खेळ आहे किंवा नाही हे ठरवणं कदाचित कठीण आहे , पण तो उत्सव नक्कीच आहे. हिंदुधर्मात अनेक उत्सव आहेत , त्यातलाच हा एक. काही उत्सव कलाकार निर्माण करतात तर काही उत्सवांचा त्रास वाटतो. दही हंडी रस्त्यावर खेळण्यापेक्षा
मोठ्या मैदानात खेळला गेला तर जास्त योग्य ठरेल. वाहतुकीचा खोळंबा, गर्दीमुळे होणारे अपघात आणि मनोरे रचणाऱ्यांना होणाऱ्या शारीरीक इजा‍. ज्यामुळे कदाचित कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकेल. तसेच गर्दीमुळे पादचाऱ्यांना जाण्यासाठी मार्ग राहत नाही. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. या गर्दीतून बाहेर पडणं फार कठीण आहे. अशा वेळेला रिक्षात असाल तर जास्तीत जास्त पैसे घालवण्याची तयारी ठेवावी लागते, कारण कितीक वेळेला वाहतुकीचे मार्ग बदललेले असतात. त्याची सूचनाही क्वचितच आगाऊ दिली जाते. तसेच या दहिहंड्यांवर लाखो रुपये लावले जातात, त्या मोहापायी गोविंदा धोके पत्करतात. हे लाखो रुपये लावणारे लोक प्रत्यक्षात गरजू माणसाला (तो मतदारपण असतो) पैशाची कितपत मदत करतात कोण जाणे. पण राजकारणी लोक स्वतःची प्रसिद्धी करून घेतात हे नक्की. कोर्टाचा निर्णय मला तरी बरोबर वाटतो. रस्त्यावर हा उत्सव साजरा करायला बंदीच घालावी, हे बरे. गणपती उत्सवातही तेच होते. रस्त्याच्या मध्येच मंडप घातलेले आढळतात. बोलण्याची किंवा तक्रार करण्याची सोय नसते. आपले उत्सव साजरे करायला काहीच हरकत नाही, पण लोकांची गैरसोय होणार नाही ना हे पाहणं आवश्यक आहे. मग तो उत्सव गिनीज बुकात असो वा नसो, अथवा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषीत झालेला असो वा नसो. ठाण्यातील पाचपाखाडी विभाग पाहावा. तसेच राजकारणी लोकांचं पाठबळही कमी व्हावं असं वाटतं. त्यांचा खेळ होतो पण बाकीच्यांची गैरसोय होते हे नक्की.

Group content visibility: 
Use group defaults
All Partners-10usd 300x250