पाऊस

Submitted by prakashsalvi on 18 June, 2017 - 10:44

पाऊस
------
आला आला गं पाऊस
संगे चल गं भिजायाला
पहिल्या पावसाची मौज
चल ये गं चाखायाला
**
आला आला गं पाऊस
धरणी माय सुखावली
वळवाच्या पावसानं
कशी जमीन थंडावली
**
आला आला गं पाऊस
बळी राजा सुखावला
पाण्याच्या गं थेंबासाठी
चातक गं झेपावला
**
आला आला गं पाऊस
चला जाऊ पारावर
वटसवित्रीला नाचू
सवे धरूनिया फेर
**
आला आला गं पाऊस
सण आले गं वरसाचे
नव वधूला गं येतील
बोलावणे माहेराचे
**
आला आला गं पाऊस
मौज पहिल्या पावसाची
नाही विसरता येणे
खरी गंम्मत आयुष्याची
**
प्रकाश साळवी
१२-०६-२०१७
०९१५८२५६०५४
**

Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250