ऐकतोयस ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 June, 2017 - 06:04

ऐकतोयस ?

तुझ्या आयुष्याच्या विस्तिर्ण तारांगणातील
दैदिप्यमान आकाशगंगेत
काजव्यागत चमकून
अंतरधान पावणारा
एक अल्पायुषी तारा ...!!

निदान
अशी ओळख मिरवण्यासाठी तरी
माझ्या आयुष्यातील
काळरात्र संपून
उजाडूच नये वाटत बघ

बाकी उजाडण अटळच ...!!

नाही का ?

सुप्रिया

Group content visibility: 
Use group defaults
All Partners-10usd 300x250