शवास आता ...!!

Submitted by prakashsalvi on 17 June, 2017 - 02:17

शवास आता ...!!
--------------
शवास आता ईतके सजवू नका
डंका त्याच्या नावाचा वाजवू नका
**
आता तरी थांबवा बोलणे उणेपुरे
जिव्हारी लागेल तयाला लाजवू नका
**
तुला पाहिले काल फिरताना त्याच्यासवे
ऊगा दगडाचे काळीज माझे भिजवू नका
**
सुटत नाही ना कोडे हे आयुष्याचे
शरण जा वर्तमाना उगा डोके खाजवू नका
**
कुठ्ल्या जाती कुठले धर्म आपण सारी माणसे
जाती धर्मा वरुन आता दंगल ऊगा माजवू नका
**
होतो आहे बलत्कार अन्याय घरोघरी
लढा विरुद्ध त्यांच्या, उगा मैदाने गाजवू नका
**
पेटऊ ज्योत क्रांतीची गाढून टाकू अंधश्रद्धा
तेवत ठेवा ज्योत; लढा क्रांतीचा विझवू नका
**
मला मारता जन्मा आधी पाप आहे भ्रूणहत्येचे
सावित्रीच्या लेकी आम्ही जन्मा आधी बुझवू नका
**
प्रकाश साळवी
१६-०६०२०१७
०९१५८२५६०५४

Group content visibility: 
Use group defaults