मी कुणाला भीत नाही

Submitted by द्वैत on 15 June, 2017 - 11:21

मी कुणाला भीत नाही

विसरण्यासाठी दुखाना मी आताशा पीत नाही
सोसले इतके की आता मी कुणाला भीत नाही

मयूरपन्खी वेदना ती दाखवावी ह्या जगाला
वेदना बोले रे वेड्या ही जगाची रीत नाही

त्या गुलाबी रम्य प्रहरी गुन्फली खोटीच गाणी
शब्द जे सुचतात आता ते मनाचे गीत नाही

भावना अनमोल कुठल्या सहज मिळती मोजूनी ज्या
भाग्यशाली ते की ज्याना लाभली ही प्रीत नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users
All Partners-10usd 300x250