हया भाजी ची रेसिपी हवी आहे.

Submitted by Rupali Akole on 11 June, 2017 - 06:32

Screenshot_2017-06-11-15-28-15_1.jpgScreenshot_2017-06-11-15-28-15_1.jpg

Group content visibility: 
Use group defaults
All Partners-10usd 300x250

धाग्यात लिहियाचा मजकूर तुम्ही तर लेखाच्या शिर्षकात लिहिलाय. Happy

तर "चिवळीची भाजी" असा सर्च गुगलवर दिल्यावर, इतक्या पाककृती सापडल्या. पहा बरोबर आहेत का.

घोळू: परतून इतर पालेभाज्या करतात तशीच भाजी करता येते थोडा लसूण जास्त घालून. डाळीचं पीठ घातले तर भाजी वाढेल आणि मूळ चव कमी होईल.

"...हया भाजी ची रेसिपी हवी आहे".... असे म्हणाल्यावर सर्वानां एकच व्यक्ती आठवली असणार.... ते म्हणजे दिनेशदा!!!

आम्ही याला घोळीची भाजी म्हणतो... भिजवलेली चणाडाळ घालुन नेहमीच्या पालेभाजी सारखी करतो....हि भाजी आता पावसाळ्यात जास्त मिळते.

उषा, ही चिवळ. घोळीची भाजी वेगळी दिसते. साधारणपणे मेथीच्या भाजीसारखी पण पानं, देठी बर्‍याच जाड असतात. (जाडच जून नव्हे)
घोळीची भाजी करकरीत आंबट कैरी, फोडणीमध्ये मस्त लाल केलेला लसूण आणि बेसन लावून पातळसर अशी करतात. हे या भाजीचे फोटो: (दोनही फोटोज इंटरनेट वरून साभार)
Gholichi Bhaji 1.JPGGholichi Bhaji 2.jpg

प्रसाद, योकु बरोबर. ही चिवळ. चिवळीची भाजी आई पीठ (बेसन) पेरुन करायची आम्ही गावी असताना.
आता हैद्राबाद/ बंगलोरला चिवळ मिळत नाही, जमाना झाला ही भाजी खाउन.

अपर्णा,
तुमच्या फोटोतील भाजी घोळ/ घोळु आहे.