गुज

Submitted by र।हुल on 10 June, 2017 - 07:35

खुप प्रेम करतो गं तुझ्यावर,
पण शब्द अपुरे पडतात...

कसं सांगावं तुला,
बहाणे अपुरे पडतात...

डोळ्यांत साठवलेली स्वप्नं,
तुझ्याविना अपुर्ण भासतात...

जास्त काही नको गं,
हवी फक्त तुझी साथसंगत...

तुझ्या सोबतीनं व्हावा,
हा जिवनाचा प्रवास...

तुझ्याच संगतीत जावी,
आयुष्याची संध्याकाळ...

नापरतीचा एक प्रवास असावा...
हाती माझ्या तुझा हात असावा...

डोळ्यांत असावीत आपल्या दोघांची स्वप्नं...
असं असावं नातं कि जगालाही 'हेवा' वाटावा...
―₹!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users