अपडेट होणं

Submitted by र।हुल on 9 June, 2017 - 15:57

त्या दिवशी माझी एक मैत्रिण सहज बोलली, "₹!हुल स्वत:ला update कर." 
स्वत:ला update करणं म्हणजे....मी विचारांत हरवलो. एखादं electronic application किंवा software delete करून पुन्हा reinstall करण्याइतकं सोप्पं नसतं स्वत:ला बदलवणं. हि एक मन आणि बुद्धि यांचं स्थित्यंतर घडवून आणणारी दिर्घकालिन प्रक्रिया असते आणि तितकीच ती त्रासदायकही असू शकते. येथे Generation Gap हा एक factor लक्षात घ्यावा लागतो. खरं म्हणजे हा सविस्तर अशा लिखाणाचा एक स्वतंत्र विषय आहे.जेवढा जास्त generation gap तेवढं अवघड update होणं. येणारी प्रत्येक नविन पिढी ही खुप fast आणि smart असते. त्यांच्याबरोबरीनं update होताना त्रास होतो. याच्या अगदी उलट म्हणजे new generation हि विचारांनी एकदमच उथळही असू शकते..शक्यतो बरेचदा ती तशी असतेच. त्यामानाने जुन्या लोकांचा अनुभव हा मोठा असतो. मग इथं सुरू होतो  जुन्या नव्या विचारांचा संघर्ष! यातून जो मध्यममार्ग काढतो तोच जिवनात  सतत यशस्वी होत असतो.
-₹!

Group content visibility: 
Use group defaults