" आई "

Submitted by दिपक ०५ on 5 June, 2017 - 19:03

एक आई तीच्या मूला बरोबर राहात होती... ते खुप गरीब होते आणि फक्त त्यांच्या गरजा पूर्ण होतील इतकेच पैसे त्यांना मिळतं...

आईला फक्त एक डोळा होता आणि तीच्या मुलाच्या वागणूकीमुळे ती खुप त्रास सहन करत होती..
एक दिवशी आई मुलाच्या शाळेत गेली, तेव्हा शाळेतील सर्व मूलं त्याच्यावरवर हसत होती आणि त्याच्या आईला फक्त एक डोळा असल्यामूळे प्रत्येकजन त्याला चिडवत होते.
त्या मुलाने आपल्या आईला द्वेष करायला सुरुवात केली आणि त्याच्या आईची उपस्थिती त्याच्यासाठी फक्त एक लाजीरवाचक गोष्ट आहे असे त्याला वाटू लागले आणि त्याला तिच्यासोबत रहायली लाज वाटत होती.
म्हणून त्याने निर्णय घेतला की तो खरोखरच कठोर अभ्यास करून आणि आपल्या आईपासून सूटका करून घेईल.. लहान मुलाने चांगले ग्रेड मिळवले शिक्षण घेतले आणि दुसर्या शहरात चांगले काम बघण्यासाठी तो निघून गेला..
त्याने आपली आई सोडली आणि शहरात स्थायिक झाला. त्याने एक मोठं घर विकत घेतलं, लग्न केले आणि मुलं झाली. तोे एक यशस्वी आयुष्य जगत होता. तिथे त्याला त्याच्या आईची आठवण करून काढण्याची काहीच गरज नव्हती.

एके दिवशी त्याची आई त्याला भेटायला आली. जेव्हा मुलाने तिला पाहिले तेव्हा त्याला भीती वाटायला लागली.
तिला पाहून तो म्हणाला, "तू कोण आहेस?" तू माझ्या घरी कशी आलीस? "
आईला हे समजले की तिचा मुलगा तिला पाहू इच्छित नाही आणि शांतपणे म्हणाली, "ओह, मला माफ करा. मी चुकीच्या पत्त्यावर आले असेन. "मग ती परत फिरली"..
मग एक दिवस मुलाला त्याच्या शाळेतल्या पुनर्मिलन बद्दल पत्र मिळाले. पुनर्मिलन झाल्यावर, तो त्याच्या जुन्या घरात गेला जेथे त्याची आई राहात होती. तेथे प्रवेश केल्यावर त्याने पाहिले की त्याची आई जमिनीवर पडलेली होती.. कागदाच्या एका तुकड्यावर तिनं तीच्या मुलाला पत्र लिहीलं होतं..
मूलानं पत्र उचललं व वाचण्यास सूरूवात केली..
" बाळा मी तूझ्याकडे पैसे मागायला आले नव्हते.. तूला फक्त एकदा शेवटचं मरण्याआधी बघायची इच्छा होती.. आता मी मेल्यावर मला अग्नी तर देशील ना रे??..."
मूलगा मोठ मोठ्याने रडू लागतो.. त्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक गोळा होतात..
त्यातील एक बाई त्याला विचारते.. "तूम्ही ओळखता कां या म्हातारीला?.. आम्हाला तर वाटतयं बेवारशी आहे.. मूनसीपार्टी वाल्यांना बोलवावं लागेलं ते बघतील, काय करायचं ते.."
"पण तूम्ही का रडताय? या तुमच्या कूणी लागत होत्या का??..."

मूलगा - ""आई ""....

समाप्त....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hi katha whtsapp var vachleli fakt tyat tya mulala shevti samjate ki aai ne tyachyasathich ticha dola dilela asto.