( दीड वर्षा नंतर )
स्थळः- समीरच घर
गाडीचा हॉर्न वाजवत समीरने गाडी बंगल्यात आणली. मुख्य दारासमोरच गाडी उभी करुन तो दरवाजाकडे वळाला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. पावसाचे टपोरे थेंब हळू-ह्ळू आपला वेग वाढवत होते. समीरने चावी काढायला जॅकेट मधे हात घातला आणि त्याच्या लक्षात आले की तो घराची चावी ऑफिस मधेच विसरलाय. त्याने दारावरची बेल वाजवली. एक सुंदर अशा गाण्याचा अंतरा दरवाज्यातून बाहेर ऐकयला आला. आज समीरला घरी यायला उशीरच झाला होता. रात्रीचे अकरा वाजले होते. पावसाने पण आता जोर धरला होता. गड्गडाटी आवाज करुन तो बरसत होता. अजुनही मुख्य दरवाजा उघडला गेला न्हवता.
समीरने पुन्हा एकदा बेलचे बटन दाबायला हात पुढे केला आणि तोच सगळीकडे अंधार पसरला. पावसाच्या जोरामुळे लाईटस गेले. आतामात्र समीर वैतागला आणि दारावरची नक्षिदार कडी त्याने जोर-जोरात वाजवली. अधुन मधुन पडण्या-या विजेच्या उजेडात तो खिडकीकडे बघुन न्ह्याहाळत होता. बराच वेळ होऊन गेला होता, दार अजुनही उघडले गेले न्हवते. त्याने विचार केला की राधा झोपली असेल.
समीरने जॅकेट मधुन फोन बाहेर काढला. फोन अनलॉक करुन त्याने राधाचा नंबर डायल केला, त्याच वेळी फोन मधुन एक बीप आवाज आला आणि स्क्रिनवर अंधार पसरला. समीरच्या फोनच चार्जींग संपल होत. आता मात्र समीरचा संयम सुटत चालला होता. दिवसभराच्या मिटींग्जमुळे तो आधीच दमला होता. २०-२५ मिनिटे होउन गेली होती, दार अजुनही बंदच होते. आता तर वीज देखिल त्याच्या दारात येऊन त्याच्यावर हासुन जात होती.
जॅकेट डोक्यावर घेत तो आता बंगल्याची एखादी खिडकी उघडतेयका ते पाहू लागला, पण काहीच उपयोग झाला नाही. थोड पुढ जाउन त्याने बागेतुन मागच्या दाराकडे जाणारा रस्ता घेतला. दरवाज्यात पोहोचे पर्यत समीर पुर्ण ओला झाला. त्याच्या समोरचा लोखंडी दरवाजा बाहेरुन बंद होता, तर आतील दरवाज्याला थोडी फट त्याला दिसली. त्याने दार उघडून घरात प्रवेश केला आणि सुटकेचा एक सुस्कारा सोडला. अंधारातच त्याने राधा कुठे दिसती आहे का ते पाहीले. पण ती कुठेच न्हवती. जिन्याने तो वरच्या खोलीकडे निघाला. खराब झालेला ईनव्हर्टर ताबड्तोब बदलुन टाकायचा असे त्याने ठरवले. बेडरूमचा दरवाजा त्याने हलकेच ढकलला. चमकलेल्या वीजेच्या उजेडात राधा बेडवर झोपलेली त्याला दिसली. तिची झोप मोडू नये म्हणुन समीरने अलगद कपाट उघडले. ओले कपडे बदलुन तो थोडा फ्रेश झाला आणी लगेचच बेडवर झोपण्यासाठी गेला, तेवढ्यात लाईट आले. संपुर्ण रुम मधे लख्ख उजेड पसरला आणि बेडवर झोपलेल्या राधाला बघुन समीर जोरात किंचाळला……
( राधा बेडवर निपचित पडली होती, तिच्या गळ्यावर लाल रेषा उठल्या होत्या, तिचा श्वास बंद झाला होता, शरीर थंड पडले होते. राधाचा खुन झाल्याचे समीरच्या लक्षात आले. त्याने लगेच लॅन्डलाईनवरून पोलिस स्टेशनला फोन लावला आणि पोलिसांना बोलावुन घेतले. समीरच्या डोळ्यातुन अश्रु वाहत होते. राधाचा थंड पडलेला हात हातात घेऊन तो बेडपाशीच बसुन राहीला. (थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली समीरने खाली जाऊन दरवाजा उघडला.)
समीर – या ईन्सपेक्टर अमित, चला मी तुम्हाला राधाचा खुन झाला ती जागा दाखवतो. लवकरात-लवकर तिच्या खुन्याला शोधुन काढा. माझ्या राधाला त्याने माझ्यापासुन दुर केल, मी त्याला सोडणार नाही.
ई.अमित - हे बघा समीर तुम्ही शांत व्हा, आम्ही नक्कीच राधाच्या खुन्याला शोधुन काढु. या बसा ईथे, ‘जाधव’ साहेबांसाठी पाणी आणा. समीर ईथे जे काही घडलय ते सगळ मला सविस्तर सांगा. जाधव, तुम्ही शिंदे बरोबर पुढची प्रोसेस सुरु करा.
समीर – आज मिटिंगमुळे मला घरी यायला उशीर झाला. याची कल्पना राधाला होती. मला जेव्हा असा उशीर होणार असतो त्या दिवशी राधा तिच जेवण करुन बेडरुम मधे गाणी ऐकत बसते. आज जेव्हा मी अकराच्या सुमारास घरी आलो, माझ्या लक्षात आले कि माझी घराची चावी मी ऑफिस मधेच विसरलो. बराच वेळ मी दार वाजवले…………..
हवलदार जाधव – ओ शिंदे, जरा तिकड बघा काही मिळतय का, आज कालचे खुनी पन लै हुश्शार झालेत. पुरावाच सोडत नाय काही.
हवलदार शिंदे – अव जाधव सगळी खोली शोधुन झालिये. जे काही मिळालय ते तपासासाठी घेतलय.
समीर - आणि……. आणि…. अमित साहेब, बेडवर राधा अशी माझ्यासमोर……
ई. अमित - हम्म्म्, ठिक आहे समीर साहेब. आम्ही खुन्याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तुमचा कोणावर संशय असेल तर सांगा, आणि हो, ही केस सुटे पर्यत तुम्हाला कुठेही शहरा बाहेर जाता येणार नाही. ‘शिंदे’ तुमच सगळ काम झाल की बॉडी पोस्टमार्टमला पाठवा. समीर मला अजुन काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, पण आता तुमची मनस्थिती ठिक नाही. मी उद्या पुन्हा येईल.
स्थळ – पोलिस स्टेशन
(ई. अमित तोंडासमोर फाईल धरुन त्यांच्या खुर्चीत बसले आहेत, जाधव आणि शिंदे - साहेब बोलण्याची वाट बघत आहेत.)
हवलदार शिंदे - साहेब मला वाटत की कुणीतरी चोरी करायला आल असल, आणी बाईन विरोध केला असल, म्हणुन तिला मारल असल.
हवलदार जाधव – ए शिंदे, आर खोलीत अस काही मिळाल नाही ज्यान चोरी करायला कोणी आल असल अस दिसतय.
ई. अमित – अगदी बरोबर बोलताय जाधव तुम्ही. खुनाच्या जागी अस काहीही आढळ नाही, म्हणजे तिथे झटापट झालीये अस , काही चोरीला पण गेल नाहीये. सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या. आपल्याला अय्यरचे रेपोर्ट येईपर्यत थांबाव लागणार आहे. परत एकदा समीरच्या घराची तपासणी करावी लागणार आहे. मला परत एकदा समीरला भेटायला जायचय. जाधव मी समीरला भेटून येतो. अय्यरनी रिपोर्ट दिले की मला ताबडतोब कळवा. शिंदे चला माझ्या बरोबर.
स्थळ – समीरचे घर.
(दारावरची बेल वाजते, समीर दार ऊघडतो.)
समीर - या ई.अमित, काही कळाले खुना संदर्भात ?
ई.अमित – शिंदे, तुम्ही परत एकदा घराची तपासणी करा. समीर मी तुम्हाला त्यासाठीच परत भेटायला आलोय. मला अजुन काही गोष्टी तुमच्या कडून माहीती करून घ्यायच्या आहेत.
समीर – हो, नक्कीच, राधाचा खुनी शोधायला तुम्हाला हवी ती मदत मी करायला तयार आहे.
ई.अमित – तुमच्या एवढया मोठया घरात मला नोकर दिसले नाहीत, कुठे असतात सगळे?
समीर – नोकर ! नाही आमच्याकडे नोकर नाहीत, म्हणजे आमच्या लग्ना आधी होते. राधा आल्यावर तिने सगळे काढुन टाकले. फक्त सकाळी अॅकना येते.
ई.अमित – आत्ता कुठे आहे ती ?
समीर – आज जास्त काही काम न्हवत, ती लवकर गेली. तसही तिला राधा बद्दल कळाल्यावर ती खुप दुखी झाली, मग मीच तिला घरी जायला सांगितल.
ई अमित – ठिक आहे, आम्हाला तिचा पत्ता आणि फोन नंबर दया. तिची पण चौकशी कारायचीये आम्हाला. समीर तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली?
समीर – नुकतेच दीड वर्ष झाली.
ई.अमित – तुमच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगा जरा, म्हणजे तुमच्यात कधी भांडण, मतभेद ……
समीर – नाही- नाही, राधा खुपच छान होती बायको म्हणुन. आमच लग्न झाल्यापासुन तिने कधीच कुठलिही तक्रार केली नाही. माझी खुप काळजी घ्यायची. माझ्यासाठी सगळं स्वताच्या हातानी बनवायला आवडायच तिला, पण मग ती खुप थकुन जायची. मीच मग अॅहनाला तिच्या मदतीसाठी ठेवल.
ई.अमित – एकंदर तुमच वैवाहिक आयुष्य सुखी होत तर. बरं गेल्या काही दिवसांत राधाच्या वागण्यात काही बदल झाला होता का? तिच वागण कस होत?
समीर – नाही, फारसा काहीच फरक जाणवला नाही. फक्त…. दोन दिवसांपुर्वी ती जरा डिस्टर्ब वाटली, मी तिला त्या बद्दल विचारल पण, तर फक्त बरं वाटत नाहीये एवढच म्हणाली. पण दुस-या दिवशी पुन्हा नेहमीसारखीच वाटली.
हवलदार शिंदे – साहेब माझ काम झालय.
ई.अमित – शिंदे, माझही ईथल काम झालय, आपण एकत्रच निघुया. मला अय्यरला भेटायचय. समीर साहेबांकडुन अॅहनाची सगळी माहीती घ्या आणि तिला चौकशीला स्टेशनवर बोलावुन घ्या.
स्थळ – लॅब
अय्यर – या अमित सर तुमचीच वाट बघत होतो. आत्ताच सगळे रिपोर्ट स्टेशनला पाठवले, पण काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या होत्या.
ई.अमित – शिंदे बाकीचे पुरावे अय्यर कडे देउन तुम्ही स्टेशनला जा. बोला अय्यर, काय माहीती मिळाली ?
अय्यर – अमित सर, तुम्ही दिलेल्या वस्तूंपैकी त्यात एकच वस्तु अशी आहे ज्यावर फक्त एकाच व्यक्तीचे ठसे आहेत. मी ते समीर आणि राधाच्या ठश्यांसोबत मॅच करुन बघितले, पण ते जुळले नाहीत अजुन एक विशेष म्हणजे, गळा आवळण्याखेरीज राधाच्या अंगावर कुठल्याच खुणा आढळल्या नाहीत. ज्या पद्धतीनी तिचा गळा आवळला गेलाय त्यावरुन अस जाणवत तिचा खुन होताना खुनी तिच्या खुप जवळ होता. तिला स्वताला वाचवायला वेळच मिळाला नाही.
ई.अमित - अय्यर म्हणजे हे काम नक्कीच जवळच्या व्यक्तीच असणार. मी अजुन काही गोष्टी तपासायला देतोय, आणि हो अजुन काही व्यक्तीचे ठसे पाठवतो. बघा जुळतातका.
अय्यर – अमित सर, हा धागा मला राधाच्या चेन मधे अडकलेला मिळाला. जेव्हा खुन्यानी तिचा गळा आवळला असेल त्या वेळी तो तिच्या चेन मधे अडकला असणार. आत्ता तरी या धाग्यावरुन फार काही सांगता येणार नाही, पण तुमच्य तपासात हा धागा नक्कीच महत्वाच काम करेल.
ई.अमित – धन्यवाद अय्यर, बाकीचे पुरावे बघुन लवकरात लवकर मला रिपोर्ट द्या.
अय्यर – अमित सर जरा एक मिनीट, पोस्टमार्टेम मधे अजुन एक गोष्ट समोर आली, राधा दोन महिन्यांची प्रेगनन्ट होती.
ई.अमित – धन्यवाद अय्यर.
स्थळ – समीरचे घर
(अर्धवट उघड्या दारातून सुजय आत येतो. तो समीरचा बिझनेस पार्टनर आहे )
सुजय – समीर, जे झाल ते वाईटच झाल. पण तुला अस धीर सोडुन कस चालेल.
समीर – सुजय, राधा गेली त्या सोबत माझ सगळ संपलय. राधा माझ सर्वस्व होती. आता काय ऊरलय ईथे.
सुजय – समीर अस कस चालेल, राधाच स्वप्न आता तुला पुर्ण करायचय. त्या साठी तुला पुन्हा नव्याने उभ रहाव लागणार आहे. आपली ईतक्या दिवसांची मेहनत लवकरच कामी येणार आहे. उद्या आपली एक महत्वाची मिटींग आहे. ती मिटींग मी बघतो, पण पुढच्या सगळ्या मिटीग्ज तुलाच बघायच्या आहेत. तुला कसलिही मदत लगली तर सांग. स्वताची काळजी घे.
स्थळ पोलीस स्टेशन
ई.अमित – जाधव ही राधाची केस गुंतागुंतीची होत चाललीये. अय्यरनी सांगितल तस राधाचा खुन स्ंध्याकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास झाला. समीर आणि सुजय दोघेही त्या वेळी ऑफिसमधे मिटिंग मधे होते. अॅथनाच्या चौकशीत पण फार काही मिळाल नाही. बघुया फोन रेकॉर्डस वरून काही कळतय का.
हवलदार जाधव – साहेब, राधा मॅडमच्या फोनचे रेकॉर्ड्स आणलेत.
ई.अमित – जाधव लगेच कामाला लागा, एक न एका नंबरची कसून तपासणी करा आणि लगेच मला कळवा.
हवलदार जाधव – साहेब, सगळ नीट चेक केलय. गेल्या चार दिवसांत आलेले सगळे कॉल हे समीर, सुजय साहेबांचे आणि रधाच्या आईचे आणि अॅगनाचे आहेत. फक्त एक नंबर सोडला तर त्यात वेगळ अस काहीच मिळाल नाही. मी त्या नंबरची सगळी चौकशी केली, तो एका इंटर्नॅशनल कंपनीचा नंबर आहे. त्या नंबर वरून जवळ-जवळ अर्धा तास राधा मॅडच्या फोनवर कॉल चालु होता.
ई.अमित - अरे व्वा ! जाधव तुम्ही तर बरच काम हलक केलत माझ. हळू हळु तुम्ही बरच काही शिकलात की. बर, फोन करणारी ती व्यक्ती कोण होती ते कळाल का ?
हवलदार जाधव – नाही साहेब, मी चौकशी केली, पण त्या नंबर वरुन बरेच कॉल केले जातत. कुणा एकाच नाव सांगण अवघड आहे अस त्या कंपनीच्या मॅडमनी सांगीतल.
ई.अमित – जाधव, एक काम करा, या कंपनीतून गेल्या चार दिवसांत कोणी भारतात आलय का याची चौकशी करा. मी परत एकदा समीरला भेटून येतो.
स्थळ – समीरच घर
समीर - या अमित साहेब . चार दिवस होउन गेलेत आणि अजुन राधाचा खुनी सापडला नाही.
ई.अमित - त्या साठीच परत तुम्हाला भेटायला आलोय. मला सांगा तुमच्या घरी कुणा-कुणाच येण जाण असत ? राधाचे मित्र मैत्रिणी…..?
समीर – कुणीच नाही. राधाला कुणी घरी आलेल आवडत न्हवत. तिचे आई-वडिल सुध्दा कधी तिला विचारल्या शिवाय यायचे नाहीत आणि मित्र- मैत्रिणी म्हणाल तर आमच लग्न झाल्या पासुन मी तिच्या कुठल्याच मित्र-मैत्रीणीला भेटलो नाहीये किंवा तिच्याकडुन कधी त्यांच्याबद्दल ऐकलपण नाहीये. फक्त सुजय सोडला तर. त्यामुळे फक्त अॅणना आणी सुजय; यांच्या शिवाय घरी कुणीच येत न्हवत.
ई.अमित – तुम्ही आत्ता सुजयच नाव घेतलत. हा सुजय कोण?
समीर – तो माझा बिझनेस पार्ट्नर आहे. राधा त्याला आमच्य लग्नाच्या आधीपासुन ओळखते. ते दोघेही एकाच कॉलेज मधे होते.
ई.अमित - ओह, पण मग सुजय कडे तुम्ही कधी राधाच्या मित्र मैत्रीणींची चौकशी नाही केली?
समीर - मला तशी गरज वाटली नाही . राधा माझी ईतकी काळजी घ्यायची की तिच्या पुर्व-आयुष्या बद्दल विचारुन मला तिला दुखवायच न्हवत. तसही काहींचा स्वभाव असु शकतो असा. त्यांना मित्र- मैत्रीणी नसतातही. एकट रहाण आवडत. मी त्या बद्दल फार काही विचार केला नाही. त्यामुळे सुजयला पण मी कधीच काही विचारल नाही, त्यानेही कधी काही सांगीतल नाही.
ई.अमित – अस्स आहे तर, समीर, राधा दोन महिन्याची प्रेगनन्ट होती या बद्दल तुम्हाला काही माहीती होती का?
समीर – काय? मला राधान या बद्दल काहीच सांगीतल नाही.
ई.अमित - शांत व्हा समीर साहेब. मी तुमच दुख्ख समजू शकतो, मला अजुन काही माहीती हवी आहे, काही दिवसांपुर्वी राधाला एका इंटरनॅशल कंपनी मधुन फोन आला होता त्या बद्दल तुम्हाला काही माहीती आहे का ?
समीर - नाही, त्या कॉल बद्दल राधा काही बोलली नाही. कदाचित राँग नंबर असेल.
ई.अमित – राँग नंबरवरून कोणी अर्धा तास बोलत नाही समीर, ठिक आहे आम्ही चौकशी करतोच आहे, तुम्हाला या बद्दल काही कळाल तर लगेच आम्हाला कळवा.
(राधाचे आई-वडिल येतात)
राधाची आई – समीर काय म्हणाले ईनस्पेक्टर?
समीर – अजुन ते खुन्याला शोधु शकले नाहीत. तपास चालु आहे.
राधाची आई – हे बघ समीर, जे झाल ते वाईटच झाल, राधा आता आपल्यात नाही, तिची कमी कुणीही भरून काढू शकत नाही. पण तुला अस निराश होऊन चालणार नाही. खर तर राधाला तुमच्या आयुष्यात आम्ही काही लक्ष घातलेल आवडायच नाही. पण आता तीच नाही म्हणल्यावर तुझी काळजी घेणारे आम्हीच आहोत.
राधाचे वडील – समीर तुला कुठलीही मदत लागली तर निसंकोच आम्हाला सांग. स्वताची काळजी घे.
समीर – तुम्ही म्हणताय ते खरय, पण सध्या मला राधाचा खुनी शोधण महत्वाच आहे. काही मदत लागली तर नक्कीच तुम्हाला सांगेन.
स्थळ पोलीस स्टेशन
ई.अमित – ‘जाधव’, त्या इंटरनॅशनल क्ंपनीच्या चौकशीच काय झाल ?
जाधव – साहेब मी सगळी चौकशी केली. राधा मॅडमचा खुन झाला त्याच्या दोन दिवस आधी त्या कंपनीतून पाच जणांची टीम ईथे आली. त्यात तीन पुरुष अन दोन महिला होत्या. सगळे जण हॉटेल रुबी मधे उतरले होते. ज्या दिवशी राधा मॅडमचा खुन झाला त्याच रात्री हे सगळे परत गेले. मी हॉटेल मधे पण चौकशी केली, पण तिथून फार माहीती मिळाली नाही. सगळे जण सकाळी बाहेर पडायचे अन रातच्याला परत यायचे.
ई.अमित - जाधव, त्या सगळ्यांची जन्मकुंडली काढा लवकर, आणी हे सर्व ईथे कुठल्या क्लायंटला भेटायला आले होते ते पण विचारा.
जाधव – ओके साहेब, आत्ताच कामाला लागतो.
ई.अमित – आणी हो, मि. सुजयला चौकशी साठी बोलवल होत काय झाल त्याच?
जाधव – आत्ताच त्यांच्या फोन येउन गेला जवळच आहेत. पोहोचतीलच
शिंदे – साहेब, मि. सुजय आलेत.
ई.अमित – ह्ं, पाठवा त्यांना आत. शिंदे त्याच्या काही गोष्टी नोट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ईथेच थांबा. जाधव तुम्ही निघा. या मि. सुजय, तुमच्या कडुन काही माहीती हवी आहे. जे काही माहीत असेल ते न लपवता सांगा. सगळ काही खर सांगा.
सुजय – विचारा सर, राधाच्या खुन्याला पकडण्यात नक्कीच मदत करेन मी.
ई.अमित – तुम्ही आणी राधा एकमेकांना कधी पासुन ओळखताय?
सुजय – खर तर तिच्या लग्ना आधीपासुन आम्ही एकमेकांना ओळखतोय. आम्ही एकाच कॉलेज मधे होतो.
ई.अमित – म्हणजे तुम्हाला त्यांच्या मित्र-मैत्रीणीची चांगलीच माहीती असेल.
सुजय – नाही सर, तिला कुणी मित्र- मैत्रिण न्हवते. ती एकटीच रहायची. फक्त काही नोटस हव्या असतील तर तेवढच बोलायची.
ई.अमित – तुम्ही सांगताय त्यावर माझा विश्वास बसत नाहिये मि. सुजय. राधाला खरच एक पण मैत्रीण न्हवती. हे बघा आमच्या पासुन काही लपवू नका. जे माहीती आहे ते सांगा, कदाचित खुन्याला पकडण्यात तुमच्या माहीतीची मदत होईल. नाहीतर संशयित म्हणुन आम्ही तुम्हालाच आत टाकु.
सुजय – पण मी खुन केला नाही.
इ.अमित – हो, पण संशयित म्हणुन आम्ही तुम्हाला अटक करू शकतो. आता तुम्ही ठरवा जेलची हवा खयची की आम्हाला मदत करायची.
सुजय – कस सांगाव ते कळत नाहीये सर, राधाला खुप मित्र-मैत्रीणी होते सर, ती खुप हुशार, गप्पिष्ट आणि सगळ्यांमधे मिळून मिसळून राहणारी होती. आम्ही खुप मजा करायचो. मला तर ती आवडायला लागली होती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी तिला प्रपोज करायच ठरवल होत. माझ खुप प्रेम होत तिच्यावर, पण…..त्या आधीच…. तिला एकट पाडायला आम्हीच कारणीभूत होतो; अस वाटत की मी खुप मोठी चूक केली तिच्या बरोबर अस करुन. निदान मी तरी तिला समजुन घ्यायला हव होत. तिच्या बरोबर राहायला हव होत. पण मी तिच्यावर खुप रागावलो होतो, चिडलो होतो.
ई.अमित – काय घडल होत अस तेव्हा?
सुजय – हे बघा मी आत्ता त्या जुन्या आठवणीने खुप दुखी झालोय, आत्ता मी अजुन काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही. मला तुम्ही उद्या पर्यन्त वेळ द्या, मी स्वताहून येइल तुमच्या कडे.
ई.अमित – ठिक आहे मि. सुजय, मला फक्त तुमच्या ग्रुप मधे कोण-कोण होते त्या सर्वांची नाव सांगा. शिंदे लिहून घ्या ती नाव.
( सुजय बाहेर जातो आणि जाधव आत येतात)
हवलदार शिंदे – साहेब मला तर आता या सुजय साहेबांचा संशय येतोय. ते म्हणाले ना की त्यानच म्हणे प्रेम होत राधा मॅडमवर. एकतर्फी प्रेमातून ह्यानीच तर खुन केला नसल नव्ह?
ई.अमित – ते आपण शोधुन काढुच, ती लिहीलेली माहीती द्या इकडे आणि या सुजयची सगळी माहीती काढा आणि त्याच्यावर नजर ठेवा.
(http://www.maayboli.com/node/62731 त्या रात्री भाग १)
उत्कंठा वाढलीय. पुढील
उत्कंठा वाढलीय. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.>>
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.>> +१
ज्या दिवशी राधा मॅडमचा खुन
ज्या दिवशी राधा मॅडमचा खुन झाला त्याच रात्री हे सगळे परत गेले. मी हॉटेल मधे पण चौकशी केली, पण तिथून फार माहीती मिळाली नाही. सगळे जण सकाळी बाहेर पडायचे अन रातच्याला परत यायचे.
बहुतेक थोडीशी गडबड झालीये लक्षात आली तर रिप्लाय करा बाकी कथा मस्त जमालिये मला तरी अजून तिची मैत्रीणच खुनी वाटतेय
मस्त
मस्त
छान. पात्रं अजुन वाढवु नका
छान. पात्रं अजुन वाढवु नका प्लीज. माझ्यासारख्यांचा गोंधळ होतो मग
एकदाच नक्कि ठरवा - अॅकना, अ
एकदाच नक्कि ठरवा - अॅकना, अॅगना, अॅणना .. नक्कि काय नाव आहे त्या मोलकरणीचं?
आणि राधा समलिंगी होती हे सांगायला सुजयला एक दिवस का मागुन घ्यायला लागला? खुनाच्या वेळी सुजय ऑफिसमधे समीर बरोबर होता असा पक्का पुरावा असताना "तुम्हालाच संशयाखाली अटक करू" असं पोलीस का म्हणतील आणि सुजय सारखा सुशिक्षित माणूस (निर्दोष असला तर) त्या दबावाखाली का येईल?
मस्त चाललिये कथा...!! शेवट
मस्त चाललिये कथा...!! शेवट झक्कास व्हायला पाहीजे...!!
अरेरे ह्या भागात क्रमक्श
अरेरे ह्या भागात क्रमक्श नाहीये म्हणुन आज दोन्ही भाग वाचुन काढलेत. प्लिज आता पुढचा भाग लाव्कर टाका.
आता पर्यत ची कथा आवडली.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद. एवढी
प्रतिसादांबद्दल धन्यवाद. एवढी मोठी कथा लिहण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे काही ठिकाणी काही चुका झाल्या असतील. तुमच्या प्रतिसादांमधून मला नक्कीच त्या गोष्टी कळतील.
एकदाच नक्कि ठरवा - अॅकना, अॅगना, अॅणना .. नक्कि काय नाव आहे त्या मोलकरणीचं?
हे लिखाण मी दुसरीकडे टाईप केले आहे आणि माबो वर कॉपी पेस्ट केले आहे. त्या मुळे काही ठिकाणी शाब्दिक चुका झाल्या आहेत. प्रथम त्या लक्षात आल्या नाहीत. पुढ्च्या भागात या सुधारल्या आहेत.
खुनाच्या वेळी सुजय ऑफिसमधे समीर बरोबर होता असा पक्का पुरावा असताना "तुम्हालाच संशयाखाली अटक करू" असं पोलीस का म्हणतील आणि सुजय सारखा सुशिक्षित माणूस (निर्दोष असला तर) त्या दबावाखाली का येईल?
कितीही सुशिक्षित माणुस असला तरी पोलिस हे नाव ऐकल्यावर तो घाबरतोच. निर्दोष असला तरी पोलीस कधी काय करतील याचा नेम नसतो. त्या मुळे निर्दोष माणूस सुध्दा घाबरू शकतो.
ज्या दिवशी राधा मॅडमचा खुन
मस्त