त्या रात्री........ ( भाग १ )

Submitted by निर्झरा on 2 June, 2017 - 06:56

स्थळ के वाय कॉलेज
ए, आपण सगळे आज हार्डरॉक कॅफेला भेटतोय. काय धम्माल केलीये न आपण कॉलेजमधे. आता शेवटच वर्ष देखील संपल. सगळे जण आप-आपल्या वाटेने निघुन जातील. जाता जाता एक छानशी पार्टी करूयात. काय सगळे येताय ना?
“ हे बघ त्रिषा मला नाही जमणार. तुम्ही सगळे जा.”
ए काये रे तुझ अस सुजय. चल ना, खुप मज्ज करूयात.
“मी सांगीतल ना मला नाही जमणार म्हणुन”
सुजय मला माहितिये तु का येत नाहीस ते; तुला राधाची आठवण येतीये ना, पण आपण त्या दोघींना नाही बोलवू शकत. हा निर्णय आपल्या सगळ्यांचा मिळून होता. तसही ती तुला काही भाव पण देत नाही. उगाच तिच्यासाठी तु आमच्या सगळ्यांचा मूड घालवू नकोस.
“बरोबर बोलतीये त्रिषा, सुजय तु नाही आला तर आम्ही कोणीच जाणार नाही. काय रे ?
‘ठिक आहे येतो मी.’
चला तर मग आज संध्याकळी ठिक ९ वाजता आपण ईथेच भेटतोय. सगळे एकत्रच जाऊयात.
--------------------------------------------------------------------------
“बघितलस राधा आपल्याकडे कोणी साध विचारयला पण आल नाही. आपली मैत्री अशी तोडुन टाकली सगळ्यांनी. काय चुकीच वागतोय ग आपण?”
हे बघ एलीशा आता आपल ठरलय ना कि आपणच एकमेकीच्या मैत्रीणी आहोत. नाही बोलावल तर काय झाल, आपण आपल एन्जॉय करुयात . जस्ट चिल यार चल आपणही जाऊयात कुठेतरी.

स्थळ हार्डरॉक कॅफे
(जोर जोरात म्युझिक चालु आहे. सर्व जण ड्रिंक्सचा आनंद घेत आहेत आणि म्युझिकवर ताल धरून नाचत आहेत. बराच वेळ होऊन गेला. सुजय एकटाच ड्रिंक्स घेत बसला आहे.)
सुजय कमॉन यार, तु ईथे पार्टीला आला आहेस. असा एकटा बसू नकोस, चल आपण डान्स करूयात.
त्रिषा माझ मूड नाहीये मी ईथे फक्त तुमच्या सगळ्यांसाठी आलोय.
अरे पण त्या राधाच्या मुळे तु तुझ नकसान करून घेतोय. तुला कळतयका? ती आता तुझी कधिच होऊ शकत नाही.
स्टॉपिट त्रिषा नेहमी तु निगेटिव्हच का बोलतेस. मी प्रयत्न केला तर नक्कीच ती मला परत मिळेल. तु आमच्यात पडू नकोस.
ठिक आहे. कर तुला काय हव ते पण एक लक्षात ठेव मी कायम तुझ्या बरोबर आहे. आत्ता तुला माझ्या प्रेमाची किंमत नाही कळणार. एक दिवस तु नक्की माझ्याकडेच परत येशील.
स्थळ कॅफे कॉफी डे
राधा तुला एक सांगायचय, मला पुढच्या ट्रेनींगसाठी यु एस ला जाव लागतय. सहा महिन्यांनसाठी. खर तर मी हे लपवून ठेवल तुझ्यापासून. मला कळत न्हवत तुला कस सांगाव. तुला एकटिला सोडुन जाताना मला जसा त्रास होतोय तसाच तुला होउ नये म्हणुन मी तुला काही सांगीतल नाही. तु समजून घेशीलना मला?
काय? अग मग मी तुझ्याशिवाय ईथे काय करू. सहा महिने कशी काढेन मी तुझ्या शिवाय. मला पण घेऊन चल ना बरोबर.
हो; कळतय ग मला. तुला आत्ता बरोबर नेण शक्य नाहिये ग, जे मला करायचय त्याची ही संधी आहे, मला मिळालेली त्यामूळे मला जाव लागेल, त्या कंपनी कडुनच माझ सिलेक्शन झालय. तु काळाजी करू नकोस. लवकरच मी ट्रेनींगवरून परत येईल.
ठिक आहे तु ठरवलच आहेस तर….. ए मग जायच्या आधी घरी जेवायला येना.
हो नक्कीच. तेवढाच थोडावेळ तुझ्या सोबत घालवता येईल.

स्थळ राधाच घर
(दारावरची बेल वाजते राधा दार ऊघडते.)
ये एलीशा. झालीना सगळी तयारी. तिकडे जाऊन मला विसरू नकोस.
“मी नाही विसरणार तुला. शेवटी तुच तर माझा आधार आहेस. जे काही माझ्या आयुष्यात घडलय त्या वेळी तुच तर मला सांभाळुन घेतलय. तु पण नको विसरू मला. अग काका-काकू कुठे आहेत; मी येणार आहे ते माहीती होत ना त्यांना?”
हो माहीती होत. त्यांना जरा अर्जंट बाहेर जाव लागल. येतीलच थोड्या वेळात. आपल्याला जेवुन घ्यायला सांगीतलय. त्यांना उशीर होणारे.
“थांबू की त्यांचा साठी” येतीलच ना थोड्यावेळात?
नको त्यांनी सांगीतलय तस, त्यांना उशीर होईल थांबू नका म्हणुन, तसही तुला उद्याची फ्लाईट आहे. छोटी छोटी तयारी राहलीये, आपण जेवण करू आणि पुढची तयारी करू, नाहितर तुला उशीर व्हायचा आणि ईथेच थांबाव लागेल माझ्या जवळ.
चल तर मग काय आहे जेवणात…. व्वा! सगळ माझ्या आवडिचच आहे की. तु बनवलस की काकू…, नक्कीच काकू असणार. मला नाही वाटत तुला ईतका छान स्वयंपाक येत असेल.
ए…. ऑफकोर्स मी बनवलय. स्पेशल तुझ्यासाठी. हम्म आईनी थोडी-थोडी मदत केली मला.
व्वा! खुप छान झाल जेवण. मला तर या गोडानी झोपच यायला लागलिये.
अग मग चल थोडावेळ बेडरूम मधे झोप. आई – बाबा पण येतीलच तोपर्यन्त.
(जेवण संपवून राधा आणि एलीशा बेडरूम मधे जातात. थोड्या वेळाने राधाचे आई-वडिल लॅच उघडुन आत येतात )
बर झाल बाई लगेच जाऊन आलो ते, नाहीतर आपली ट्रिप चुकली असती.
ते सगळ माझ्या मित्रा मुळे झाल त्यान लगेच फोन केला म्हणुन. नाहीतर सगळे सीट फुल झाले असते. जेष्ठ नागरिकाच कन्सेशन पण मिळाल नसत.
हो, बर झाल त्यांनी वेळेत फोन केला ते, अहो…या पोरी कुठे दिसत नाहीत. बाहेर गेल्या की काय? जेवण तरी केल की नाही, का बसल्यात नुसत्याच गप्पा मारत. काही सुचत नाही त्यांना गप्पांच्या नादात. मी किचन मधे बघते.
अग मला राधाच्या बेडरूम मधून आवाज येतोय. बघ तिथेच असतील.
आपण आलोय म्हणुन सांगून येते
( राधाची आई बेडरूमचा दरवाजा नॉक करते आणि उघडते )
आई तू…..
राधा काय चालयय हे…..
आई अग मी….. सगळ सांगणारच होते तुला.
आई…. आई ग….. अहो लवकर या मला चक्कर येतीये.
“काय झाल, अग अस काय करतेस. राधा लवकर डॉक्टरला बोलाव.”
काका मी… मी मदत करते तुम्हाला , काकूंना ऊचलून आपण बेडवर ठेवुयात.
एलीशा… ईथून निघून जा लवकर, आणि परत राधाला कधीच भेटू नको.
काकू प्लीज माझ ऐकून तर घ्या. तुम्ही पहिले ब-या व्हा. मग बोलू आपण.
तुला जा म्हणुन सांगीतल ना. काय बोलणार आणि या विषयावर.
( एलीशा तडख निघुन जाते. राधा फोन वर डॉक्टरांशी बोलत असते. )
बाबा मी अॅहम्बुलन्स बोलवलीये येईलच. डॉक्टरांशीपण बोलण झालय. आपल्या पाठोपाठ ते पण हॉस्पिटल मधे पोहोचतील. आई… नक्की काय होतय तुला? बाबा, आईला उचलून बेडवर ठेवूयात. एलीशाला पण मदतीला घेऊयात. हे काय एलीशा कुठे गेली?
“ती निघून गेली”
अशी अचानक मला काही न सांगता अशी कशी गेली. डॉक्टरला फोन कारायच्या गडबडीत मला ती कधी गेली ते कळालच नाही. काय झाल अचानक तिला?
राधा आपण या विषयावर आई हॉस्पिटल मधून घरी आली की मग बोलू. बघ बाहेर अॅधमब्युलन्सचा आवाज येतोय.
स्थळ – हॉस्पिटल
नर्स लवकर स्ट्रेचर आणा आणि लगेच ओटी मधे घ्या ह्यांना.
डॉक्टर ईसीजी काढलाय. पुढची ट्रिटमेंट सुरू केलीये. हे बाकिचे रेपोर्टस
ईट्स् अ मॅसिव्ह हार्ट अटॅक. लवकरात लवकर आपल्याल ह्यांच ऑपरेशन कराव लागेल. खुप ठिकाणी ब्लॉकेज आहे. मी पेशंटच्या नाते वाईकांशी बोलतो. तुम्ही ऑपरेशनची तयारी करा.
( डॉक्टर ओटी मधून बाहेर येतात )
राधाचे वडिल – काय झाल डॉक्टर, कशी आहे ती..
राधा - डॉक्टर काही सिरियस तर नाही ना?
डॉक्टर – हे पहा तेच सांगायला मी बाहेर आलोय. त्यांच लवकरात लवकर ऑपरेशन कराव लागणार आहे. आपल्याकडे खुप कमी वेळ आहे. आम्ही ऑपरेशनची तयारी सुरु केली आहे. तुमचा निर्णय कळवा. म्हणजे लगेच आम्हाला ऑपरेशन कराता येईल.
राधाचे वडिल – तुम्हाला जे योग्य वाटत ते करा डॉक्टर. ती वाचली पाहिजे.
राधा – डॉक्टर तुम्ही ऑपरेशन करा.
डॉक्टर – तुम्ही बाकीच्या फॉरमॅलिटिज पुर्ण करा. आम्ही ऑपरेशनला सुरुवात करतो. काळजी करू नका. त्या नक्कीच लवकर ब-या होतील.
डॉक्टर – वेळेत आणलत तुम्ही यांना. आम्ही सर्व ट्रिटमेंट केलीये. त्यांना बर व्हायला थोडा वेळ लागणार आहे. अस समजा कि त्या थोडक्यात वाचल्यात. खुप मोठा धक्का बसलाय त्यांना. यापुढे त्यांना काही धक्का बसेल अस घडणार नाही याची काळजी घ्या.
राधाचे वडिल – धन्यावद डॉक्टर. आम्ही हिला घरी कधी घेऊन जाऊ शकतो.
डॉक्टर – अजुन चार आठ दिवस त्यांना ऑबझरवेशन मधे ठेवाव लगेल. त्या नंतर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता.
(काही दिवसांत राधाची आई हॉस्पिटल मधून घरी आली)
अहो, हॉस्पिटलमधे असताना आपल्याला राधाबद्दल काहीच बोलता नाही आल. त्या दिवशीच्या प्रकारानंतर मला अस वाटतय की राधाच लवकरात लवकर लग्न करायला हव. तुमचा तो मित्राचा मुलगा होता ना, बघाना त्याच्याकडे परत विषय काढून.
ह्म्म तु म्हणतेस ते खरय. मी अस करतो आजच समीरशी बोलतो. तसही राधा त्याला आवडली होतीच. त्या वेळीच तो लग्नाला तयार होता. आपणच तिच शिक्षण होईपर्यत त्याला थांबायला सांगीतल होत आणि आपल्या शब्दासाठी तो अजुन थांबलाय. आता माझा मित्र नाही राहिला, पण बघु तो नाही म्हणनार नाही राधाशी लग्न् करायला.
पण राधाला ईतक्यात यातल काही सांगू नका. समीरला पण राधाबद्दल काही बोलू नका.
अग अस अंधारात ठेवून कस चालेल त्याला? आपण त्याला सगळ सांगूयात. तो खुप समजुतदार आहे. नक्कीच राधाला समजुन घेईल तो.
नको काही गरज नाही. मी सांगते तस करा. जास्त वेळ घालवू नका. समीरला भेटा. जर तो या लग्नाला तयार असेल तर सरळ कोर्ट मॅरेज करू म्हणुन सांगा. तुमचा तो अजुन एक मित्र आहे बघा नोंदणी कार्यालयात, त्याच्याकडून पुढच्या आठ दिवसांतील एखादी तारीख घ्या. राधाला आपण दोन दिवस आधी सांगायच. मी तयार करते तिला लग्नाला.
जशी तुझी मर्जी. मी जातो समीरला भेटायला.
-----------------------------------------------------------------------------------------------------
राधा तुझ्याशी जरा बोलायचय, उद्या तुझ समीर बरोबर लग्न आहे. सगळी तयारी झालीये. तुला त्याच्या सोबतच लग्न कारव लागेल.
क्काय ? पण मला त्याच्याशी लग्न करायच नाही बाबा. हा निर्णय मला मान्य नाही.
राधा डॉक्टरनी सांगीतल तस आपल्याला आईची काळजी घ्यावी लागणार आहे. तिला पुन्हा धक्का बसेल अस काही घडता कामा नये. जे आम्ही ठरवलय ते होणारच आहे. जर तुझ्या काही वागण्यानी आईला त्रास झाला तर बघ……… तिला त्रास होईल अस काही करू नकोस. तुला तिची शपथ आहे.
बाबा…….. प्लिज अस करू नका हो. माझ्या लग्नाचा निर्णय मला घेऊद्या. आईला काही होणार नाही. मी त्याची काळजी घेईन बाबा. मला लग्नासंदर्भात तुमच्याशी थोड बोलायच होत बाबा?
मला माहीती आहे तुला काय बोलायच. आमची दोघांची याला परवानगी नाही. तुला समीर बरोबरच लग्न करव लागेल. मला आत्तातरी या विषयावर बोलायच नाही. जे ठरलय ते ठरलय. तु आता समीरची बायको होणार आहेस. या पुढे मला काही ऐकायच नाहिये.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे कथा...!!! पण, राधाच्या आईने, राधाच्या रुम मध्ये असे काय पाहिले की, त्याना एवढा 'मॅसिव्ह अ‍ॅटॅक' आला...???