अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया

Submitted by कानडा on 2 June, 2017 - 00:03

४ जून ला MHT-CET-2017 चा निकाल जाहिर होणार आहे. त्यानंतर लगेचच ५ जून पासुन प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे. रजिस्ट्रेशन १७ जून पर्यंत सुरु राहणार आहे.
ही प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी गेल्या वर्षापासुन महाराष्ट्र शासनाने नवीन नियमावली लागु केली आहे जी या वर्षी सुद्धा लागु असेल.

ही प्रक्रिया थोडक्यात खालिल प्रमाणे असेलः
१. रजिस्ट्रेशन - ५ ते १७ जून. हे Facilitation Centre (FC) ला जावून करावयाचे आहे.
२. गुणवत्ता यादी - १९ जून
३. गुणवत्ता यादी बद्दलचे आक्षेप नोंदवणे - २० ते २१ जून
४. अंतिम गुणवत्ता यादी - २२ जून
५. विद्यार्थ्याने CAP-1 राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या login मधुन भरुन confirm करणे - २३ ते २६ जून
६. विद्यार्थ्यांना CAP-१ मधे मिळालेल्या जागा प्रकाशीत - २८ जून
७. मिळालेली जागा स्वीकारायची असल्यास Admission Reporting Centre (ARC) ला विद्यार्थ्याने स्वतः जाऊन report करणे व जागा स्वीकारणे.
८. CAP-2 साठीच्या रिक्त जागा प्रकाशीत - ५ जुलै
९. विद्यार्थ्याने CAP-२ राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या login मधुन भरुन confirm करणे - ५ ते ८ जुलै
१०. विद्यार्थ्यांना CAP-2 मधे मिळालेल्या जागा प्रकाशीत - १० जुलै
११. जर विद्यार्थ्याला पहिल्यांदाच जागा मिळाली असेल, तर Admission Reporting Centre (ARC) ला विद्यार्थ्याने स्वतः जाऊन report करणे व मिळालेली जागा स्वीकारायची असल्यास जागा स्वीकारणे.
१२. CAP-३ साठीच्या रिक्त जागा प्रकाशीत - १६ जुलै
१३. आधी मिळालेली आणि ARC ला जाऊन स्वीकारलेली जागा बदलणे तसेच CAP-३ राऊंड साठी आपापले पसंतिक्रम स्वतःच्या login मधुन भरुन confirm करणे - १६ ते १९ जुलै
१४. विद्यार्थ्यांना CAP-3 मिळालेल्या जागा प्रकाशीत - २१ जुलै
१५. जर विद्यार्थ्याला पहिल्यांदाच जागा मिळाली असेल, तर Admission Reporting Centre (ARC) ला विद्यार्थ्याने स्वतः जाऊन report करणे व जागा स्वीकारणे.
१६. ज्या कॉलेजला जागा मिळालेली असेल त्या कॉलेजला जाणे, documents आणि बाकी शिक्षण शुल्क जमा करून आपला प्रवेश निश्चित करणे.

जे विद्यार्थी ५ ते १७ जून या कालावधीत रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीत ते १० ऑगस्ट पर्यंत FC ला जऊन रजिस्टर करू शकतात. मात्र असे विद्यार्थी CAP राऊंड साठी पात्र ठरणार नाहीत. त्यांना केवळ संस्था-स्तरावरील (management quota) जागांसाठीच प्रवेश मिळू शकतो.

तरी आपल्या घरातील, सोसायटीतील, मित्र-परीवारातील, ओळखीतील कोणी १२ पास झाले असतील आणि अभियांत्रिकी प्रवेश घेऊ ईच्छीत असतील तर ही माहिती त्यांपर्यंत जरूर पोचवा.

अधिक माहिती साठी प्रत्यक्ष भेटू शकता:
Dr. Sanjay Kanade
Associate Professor,
Department of Electrical Engineering,
JSPM Group's,
TSSM's Bhivarabai Savant College of Engineering and Research,
Narhe, Pune-411041
http://tssm.edu.in

संदर्भ (ईंग्रजी) - https://www.dtemaharashtra.gov.in/FE2017/OasisModules_Files/Files/138.pd...

Group content visibility: 
Public - accessible to all site users