परीस्थितीने गांजलेले कोडे - विवाहेच्छु व विवाहितांसाठी

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2017 - 16:41

आज आयसीसी क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी सुरू झाली. गोरय़ा साहेबांनी बांग्लादेशला सहज मात दिली.

आज मी सुद्धा दोन विकेट घेतल्या. हॅट्रीकच झाली असती. पण तिसरी संधीच मिळाली नाही.

हरकत नाही, माझी ही कामगिरी ऐकून माझी गर्लफ्रेंड मात्र खुश झाली. आणि म्हणाली...

रुनम्या, तू अगदीच निरुपयोगी नाहीयेस. तुझ्या या एका गुणवत्तेकडे पाहता आपला संसार टिकू शकतो. आणि मला एका गोष्टीचा साक्षात्कार होत टचकन माझ्या डोळ्यात पाणी आले...

बायकांना खूश करणे ईतकेही अवघड नसावे जितके माझे विवाहीत मित्र सांगतात...

फक्त तुम्हाला हे जमले पाहिजे जे मी आज केले...................

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, आधीच ईथे ईंग्लिशची बोंब आणि तुम्ही शॉर्ट हॅन्ड वापरा..

देजावू.. नाही.. चूक

हर्पेन, ओके. तसदीबद्दल धन्यवादम् चेकतो.

अवाण्तर - ते बायकांना म्हटले की काही वेगळा अर्थ जातो का? प्रत्येक नवरे लोक आपापल्या बायकांना / बायकोला असा अर्थ घ्या रे..

मी आज ४५ रन्स केल्या. तीन दा आउट झाले. सिक्सर फोर पण मारता आल्या. सच्चिन सच्चिन सिनेमा पाहिल्या पासनं फोक स इज एवरिथिंग हे मला कळून चुकले आहे.

रुनम्या, तू अगदीच निरुपयोगी नाहीयेस. तुझ्या या एका गुणवत्तेकडे पाहता आपला संसार टिकू शकतो. आणि मला एका गोष्टीचा साक्षात्कार होत टचकन माझ्या डोळ्यात पाणी आले
>> अय्या म्हणजे आता लाडू कधी अन पेढे कधी. तू निमंत्रण पत्रिका इथेच पोस्ट कर आम्ही पोहोचतो बरोब्बर. साडी इस्त्री करून ठेवली आहे.

{{{ मला या लेखाचा कॉन्सेप्टच कळला नाहिये Sad
Submitted by मेघा. on 2 June, 2017 - 13:41 }}}

मला तर या असंबद्ध मजकूरास लेख म्हणण्याचा कॉन्सेप्टही कळलेला नाहीये.

हो ना बिपिनजी खरच मला काहीही कळलं नाही Sad ....
चॅम्पियन्स ट्रॉफी काय... बायकोला खूश करणे .... काहिच कळलं नाहिये...
सॉरी ऋन्मेष पण नाही कळलं....

दोन विकेट घेतल्या म्हणून गफ्रे खूश झाली....... आणि त्यावरून बायकांना खूश करणे सोपे हा निष्कर्ष, आणि हे सांगायला हा धागा!!! _/\_

मेघा, सस्मित - काही लेख वगैरे नाही हो. माबोवर काहीतरी सतत लिहित रहाण्याची खाज आहे फक्त. मनात येईल तसं टायपत रहायचं, मग गाडी आय सी सी च्या स्पर्धेवरुन गर्लफ्रेंड वरून स्त्रीयांना खुष करण्यावर आली तरी काय बिघडतं? लोक करतील काय तो विचार.. प्रतिसाद देऊन वाचक जास्त भाव देतात आणि मग तो प्रत्येक गोष्टीत शा खा, दारुबंदी, गर्ल फ्रेंड आणि स्व जो ह्या सर्वांना घुसडून अजून अजून अतार्किक उत्तरं देत रहातो. टाईमपास (खर तर टाईम वेस्ट) करायचा असेल, तर लगे रहो.

भौतांश लोकांना कळलं नाही म्हणजे कोडं जमलं तर ..
ज्यांना काही कळल्यासारखं वाटतंय त्यांनी ट्राय तर मारा...

{{{ बाकी अतार्किक निघाले तर मी मायबोली सोडून जाईन << गोल्ड्न ऑपर्च्युनीटी फॉर सम Lol Light 1
नवीन Submitted by अदिति on 2 June, 2017 - 22:11 }}}

बाकी म्हणजे ऋन्मेष यांचे धागे सोडून मायबोलीवरील बाकी काही.. असं त्यांना म्हणायचं आहे. सबब ते कुठे जात नाहीत.

लिहीलंय की शीर्षकात कोडेय ते.. आता कोणाला सुटत नसेल तर राहू द्या.. तसेही सोपे नाहीये ते.. एमपीएससीच्या परीक्षेत विचारले गेलेले आणि 98 टक्के लोकांना हे सोडवता आलेले नव्हते आणि गंमतीची गोष्ट की तिथेही 92 टक्के लोकांना हे कोडे आहे हेच समजले नव्हते Happy

अवाण्तर - मायबोलीवरच्या धाग्यांचा दर्जा भले खालावला असेल पण मायबोलीवरच्या कोड्यांचा दर्जा नक्कीच ऊंचावला आहे Happy

काहीही हा श्री..
ऑनलाईन जेम्सच्या कौशल्यावर बायको खुश होते हे माझ्यासाठी ऐकावे ते नवलच आहे

हे कोडे आहे Uhoh Lol
ज्यात ना प्रश्न्,ना कोड्याचा काही संदर्भ ते कोडे ??
सांगा बरं उत्तर मग...नाहितर सोदवा...म्हणजे तुम्ही MPSC exam पास झाले असं आपण समजू Happy

कोडे आहे? मग माझा पास.
कुठे डोक्याला भुंगा लाउन भुगा करुन घ्या. हुशार लोक सोडवतीलच. ते वाचणार.

फक्त तुम्हाला हे जमले पाहिजे जे मी आज केले...................
>>>>

ते मी काय केले जे नवरयाने केल्यावर त्यांच्या बायका खुश होतात हे ओळखणे तर कोडे आहे.
प्रश्न नका विचारू
सरळ सोडवा ...

गोरे साहेब कोण हे ओळखायचे आहे का?
त्यांचा वर्ण गोरा असण्याचा काही संबंध आहे का?
वर्णभेदाशी संबंधीत आहे का?

ओह! खरच की प्राचीस.
प. कोडे नादात मी चुकून ते प्रश्न विचारा सरळ, सोडवा असे समजलो.

ऋन्मेषला क्रिकेट बघण्याचे व्यसन आहे.
कुठलीशी सिरिज सुरु होते, तो आपल्या रुमवर मॅच बघतो आहे तेव्हाच त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन येतो.

ती घाबरलेली / चिडलेली असते. ती तिच्या रुमवर नसते बाहेरुन बोलत असते, नंतर तिच्या मैत्रीणीकडे जाणार असते.

तिच्या विनंतीवरुन ऋन्मेष तिच्या रुमवर जातो, बंद केले्ल्या गॅसवर स्टोव्हवर ठेवलेला कुकर बाजुला ठेवतो, गॅस स्टोव्ह खाडकन उलटा करतो आणि त्या खालून पळुन जाणाऱ्या तिन झुरळांपैकी दोघांना यमसदनास धाडतो, तिसरा अगदी थोडक्यात बचावतो आणि टाइल्स मधल्या फटीत दडतो.

क्रिकेट व्यसनी ऋन्मेष त्याने केलेल्या दोन किटकवधांना विकेट असे संबोधतो. तो आपली कामगिरी फोन करुन त्याच्या गर्लफ्रेंडला कळवतो.
ती ऐकुन तिला वाटते की आपला बॉयफ्रेंड अगदीच निरुपयोगी नाही.

वाह मानव छान अंदाज मांडलात. आवडला. वर देजावू यांनी विचारलेल्या प्रश्नामागे देखील हाच अंदाज असावा...

पण एकूणच जरा अतार्किक वाटत आहे Happy

Pages