शनायाचं पत्र

Submitted by समृदधी on 31 May, 2017 - 05:26

आईस पत्र या माझ्या पोस्ट वरून (लिखणावरून) inspiration घेऊन माझी लेक शनाया मला म्हणाली "मम्मा मी तुला आज पत्र लिहिते "मी अवाक होऊन क्षणभर तिच्याकडे बघतच राहिले ..... तो क्षण माझ्यासाठी खूपच अनमोल होता अगदि आयुष्यभर माझ्या हृदयात साठऊन ठेवावा असाच.. माझ्या ५ वर्षे ९ महिन्याच्या मुलीला तिच्या आईला म्हणजेच मला पत्र लिहावंसं वाटलं नक्कीच माझ्यातल आईपण सुखावणारी गोष्ट... मी मनोमन विचार करत होते नक्की काय लिहेल हि बया?
या वयात हि मुलं अतिशय निरागस असतात, संवेदनशील असतात, आजूबाजूला घडणारया बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण करत असतात, मी तिच्याच विचारात गुंतलेले होते आणि मला पत्र लिहीणाऱ्या त्या सुंदर निरागस चेहऱ्याच निरीक्षण करत होते तेवढ्यात त्या चिमुकल्या हातांमधलं… तिच्या एवढच इवलस पत्र तिने माझ्या हातात ठेवलं ,आणि म्हणाली ” वाच” ..मी आश्चर्याने ते पत्र आणि हसणारा तिचा तो गोंडस चेहरा आलटून पालटून बघतच राहिले कारण ते पत्र म्हणजे तिच्या लेखणीतून उमटलेल्या उभ्या आढव्या रेषा होत्या ..त्या पत्रात एकही शब्द नव्हता.....मी विचार करत होते कि हिला नीट अक्षर ओळख आहे , हस्ताक्षर पण छान आहे ..नक्कीच काहीतरी छानसं लिहिल असाव अशी माझी अपेक्षा होती. ... या सर्व प्रश्नांचा माझ्या मनात गुंता झाला असताना पुन्हा त्याच आत्मविश्वासाने मला बोल्लि "अगं मम्मा वाच ना मी तुला पत्र लिहिल आहे”....
त्यावेळी माझ्या मनात विचार आला कि खरंच किती अपेक्षा करतो आपण या मुलांकडून ...किती हट्टाहास असतो आपला कि आपल्या मुलांनी प्रत्येक गोष्ट perfection ने करावी.... या सर्व अपेक्षांच्या पलीकडे जाऊन मी तिच्या पत्राचा आशय समजून घेण्याचा प्रयत्न केला .... त्या उभ्या आडव्या रेषा म्हणजे तिच्या माझ्यात असलेले अतूट बंध होते….माझ्यासाठी लिहिलेल्या त्या पत्रातील ओळ न ओळ ...रेषा न रेषा फक्त या माझयासाठीच होत्या....शनायाला तिच्या मनातील गुज मला मनमोकळेपणाने सांगायचं होत,... माझ्यावर असलेलं प्रेम ती व्यक्त करत होती.
लहान मुलांचं भावविश्व् खूपच वेगळ.... अनोख असत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही अर्थपूर्ण दडलेले असत. ते आपण समजून उमजून घेणं खूप गरजेचं असत
माझ्यासाठी हे नुसत पत्र नाही आहे तर शनाया कडून मला मिळालेली हि अनोखी आणि अप्रतिम भेट आहे. तिला समजून घेताना मी पण कितीतरी गोष्टी नव्याने शिकते. तिच्या भावविश्वात शिरून मानाने तिच्याएवढी लहान होते, आणि तो निरागसपणा पुन्हा पुन्हा अनुभवते. खरंच मुलासारखा मुलं होऊन निरागस आयुष्य जगण्याची ..नव्याने अनुभवण्याची मजा काही औरच आहे.
Thank You Very Much Shanaya.
तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं आयुष्य खूपच सुंदर झालं.

Group content visibility: 
Use group defaults

खरंच मुलासारखा मुलं होऊन निरागस आयुष्य जगण्याची ..नव्याने अनुभवण्याची मजा काही औरच आहे. >>+१११११११११११...................

छोटूसा लेख पण खूप सुन्दर ! Happy
आईच प्रेम शब्दाशब्दांतून जाणवतं होतं....मस्तचं Happy

बापरे...शीर्षक वाचून मला शनाया म्हणजे गॅरीच्या शनायाचे पत्र वाटले>>>>> +१
मलाही Happy

छान लिहिलय पत्र.

छान लिहिलय. Happy मोजकच अन मेचकं

>>>>> बापरे...शीर्षक वाचून मला शनाया म्हणजे गॅरीच्या शनायाचे पत्र वाटले Lol <<<<< Lol मी पण ग्यारीच्या शनायाच पत्र वाचायला आलो होतो....

बापरे...शीर्षक वाचून मला शनाया म्हणजे गॅरीच्या शनायाचे पत्र वाटले >>> मी पण ग्यारीच्या शनायाच पत्र वाचायला आलो होतो >>> +१
पण तुमचि शनाया त्या शनाया पेक्षा क्युट वाटलि. मस्त लिहिलंय

सर्वांना मनापासून धन्यवाद .

बापरे...शीर्षक वाचून मला शनाया म्हणजे गॅरीच्या शनायाचे पत्र वाटले Lol >>>> हा हा हा

खरंतर दुसर समर्पक शीर्षक मला सुचलंच नाही ....

गॅरी वाली सिरीयल बघायला नो चान्स ....जिथे टि .व्ही चा विषय येतो तिथे फक्त छोटा भीम , मोटू पतलु , तारक मेहता ठाण मांडून बसलेले असतात.
नाहीतर खूप सारी पुस्तकं.

त्यामुळे गॅरी वाली शनाया कटाप.

खुपच क्युट आहे, मस्तच!

गॅरीची शनाया वाटली---- अगदी अगदी!
ता.क. ऋन्मेष ने धागा हायजॅक करायला हरकत नाही. Happy

सही लिहिलंय ! एक नंबर..

त्या मालिकेतील शनाया मलाही वाटल्यानेच उशीरा उघडला धागा... तरी बरे उघडला तरी, नाहीतर हा एक छानसा विचार देणारा लेख मिसला असता Happy

ता.क. ऋन्मेष ने धागा हायजॅक करायला हरकत नाही. 
>>>
हा हा, मी असे धागे नाही हायजॅक करत.. मुळात हा शब्द उगाच चिकटला आहे माझ्यापुढे. जिथे मला धाग्याला अनुसरून टाईमपास सुचतो तिथे ते करतो, जिथे मुद्दा पटत नाही तिथे विरोध करतो, जिथे व्यक्त व्हावेसे वाटते तिथे भरभरून व्यक्त होतो.. तरी हे गॅरी शनायाला उल्लेखून आपण म्हणाला असाल तर त्या विषयावर उगाच ईथे चर्चा होऊ नये असेच मला वाटते.

आई गं!! किती गोड ते इंटरप्रिटेशन..

आईच प्रेम शब्दाशब्दांतून जाणवतं होतं..>> +100

बापरे...शीर्षक वाचून मला शनाया म्हणजे गॅरीच्या शनायाचे पत्र वाटले >>>> मलाही

पण लेख खरच खूप छान आहे. क्यूट एकदम.

Shanaya cha patra.jpg

हे आहे पत्र .