नकोच आता !

Submitted by मीनल कुलकर्णी on 21 May, 2017 - 01:15

नकोच आता !

नको नको ती सप्तसुरातली आर्जव तान
नको नको जाईल हरपून अवघे भान

नकोच पुन्हा वळूनी पाहू उगीच मागे
नकोच पुन्हा ताणू उरले सुरले धागे

वीण ही नाजुक उसवेल जरा छेडता
पुन्हा होत जाईल गुंता आठवणींनी वेढता

रातराणीचा सुगंध पुन्हा नको समेटू
ओंजळीतल्या कळ्यांसह मज नकोच भेटू

नकोच म्हणू परत एकदा येऊन जा
क्षण हे हळवे तुझे तुजला घेऊन जा

आता फिरुनी क्षणात त्याच गुंतणे नाही
मी सोडूनी आले तिथेच जुने संदर्भ काही

आता सा-या नव्याच वाटा जग हे नवे
मी जगेन म्हणते तसेच जसे मजला हवे

पुसोनी घेऊन आभाळावरचे जुनेे तारे
नव्या नक्षत्रांनी या नवे गगन भरा रे

पुर्वीचे मज नकोच काही विसरेन तुलाही
विसरावे लागेल सारेच आता.. अगदी मलाही !!
- मीनल

Group content visibility: 
Use group defaults

आता सा-या नव्याच वाटा जग हे नवे
मी जगेन म्हणते तसेच जसे मजला हवे

पुर्वीचे मज नकोच काही विसरेन तुलाही
विसरावे लागेल सारेच आता.. अगदी मलाही !!>>> सो इमोशनल...

आता सा-या नव्याच वाटा जग हे नवे
मी जगेन म्हणते तसेच जसे मजला हवे

पुर्वीचे मज नकोच काही विसरेन तुलाही
विसरावे लागेल सारेच आता.. अगदी मलाही !!>>> सो इमोशनल...

Thanx megha

Thank u