डोह

Submitted by दत्तात्रय साळुंके on 16 May, 2017 - 08:12

ओढ्याच्या काठावर
घेउन खांद्यावर गर्द हिरवे झाड
विसावला काळा डोह
दाट सावलीचा थंडगार स्पर्श जीवनाला
खोलवर डोहात सगळे शांत
एखादे पान ढवळते ढोह सारा
असंख्य तरंग
पुन्हा डोह शांत
पुन्हा एक पान
पुन्हा तरंग , पुन्हा शांत
मी शोधत राहतो आयुष्यभर
तरंगहीन तळ
अन काठावरचे अनासक्त झाड

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान Happy
किंवा विचारा शिवाय मन>>>हे किंवा विचारांशिवाय अस पाहिजे का???
असा अर्थ लागत नाहीये...

आदरणीय मेघाजी धन्यवाद! तळ वर वर तरंगहीन असतो फक्त कोणी तरी छेडल्यानंतर तरंग उठतात . डोहाचे हे रुप मानवी मनासम वाटते वर जरी शांत दुसऱ्यासाठी, खोलवर तरंग लपलेले असतात . बदल हवा का ?अपेक्षित बदल केला आहे .