अर्थ

Submitted by Pramodjoshi on 10 May, 2017 - 02:10

मध्यंतरी एका लग्नात पैशाची खूप मोठी
उधळपट्टी पाहिली आणि ही कविता सुचली

नसतोच जीवनाला
अर्थाशिवाय अर्थ
सौंदर्य बुद्धिमत्ता
अर्थविना तृषार्त I I
समजून अर्थ घ्या हो
या अर्थमहतीचा
उधळू नये धना रे
हा श्लोक हो मनाचा II
बहर आज आहे
जरी विशाल आम्रतरुला
जाणीव परी शिशिराची
असूदया ती सतत मनाला II
वर्धमानही अंती चाले
तो मार्ग रे क्षयाचा
उधळू नये धना रे
कण एक एक वेचा II

प्रमोद जोशी
मोबाईल 9422775554

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !