अगम्य

Submitted by खुशालराव on 2 May, 2017 - 15:13

निता ती गावातल्या दुकानात (त्यांच्या स्वत:च्या) भावाला मदत करायची. तिचा भाऊ रवी ही कामानिमित्त शहरा बाहेर गेल्याने आज तिला घरी जाण्यासाठी वाटेत सहप्रवासी कोणीही नव्हते. ती त्या घनदाट जंगलातील वाटेने नेहमीच जात असे, पण रवी तिच्या सोबत असायचा आज मात्र तीच्या सोबतीला कोणीही नव्हते.... जगलातल्या काळ्याकुट्ट अंधारात ती नेहमीच्या रस्त्याने चालली होती. रस्ता खडकाळ होता पण प्रवाश्यांच्या सोईसाठी रस्त्यावर ठराविक अंतरावर असणाऱ्या खांबावरच्या पिवळ्या बल्ब चा अंधुकसा पिवळसर प्रकाशात वातावरणात अणखिनच भेसूरता आणत होता.
हळुहळु वातावरणात काहितरी विचित्र बदल होतायत हे निता च्या लक्षात आल्यावर ती अणखिनच झप झप पावले टाकत जवळ जवळ पळतच चालली होती. पण आपण खुप वेळा पासून एकाच जागी येत असल्याची नोंद तिच्या मनाने घेतली आणि तिच्या मनात भीतीचे सावट दाटून आलं. तिला चकवा लागल्याने अगदीच घाबरून गेली होती भीतीने तिला दरदरून घाम फुटला होता.
ढगांच्या अचानकपणे सुरू झालेल्या गडगडाटाने भर उन्हाळ्याचे दिवस असूनही पावसाचे चिन्ह दिसत होते. एक थंड वाऱ्याची लहर निता च्या शरीरावर रोमांच उभे करून गेली त्या बरोबरच रस्त्यावरच्या लाईट्स गेल्या आणि भितीने निता बेशुद्ध होऊन पडली.
*
ज्या वेळेस तीला जाग आली तेव्हा एका अनोळखी ठिकाणी होती. तिथल्या लोकांमधे तिला काहीतरी वेगळेपणा जाणवत होता.
रंगा रूपाला अफ्रिकेतील लोकांसारखे आणी थोडेसे कमी उंची असणारे लोक होते. जणूकाही त्यांची प्रजाती वेगळी आणी प्राथमिक अवस्थेत असल्यासारख वाटत होतं.
अगदी निसर्गरम्य ठिकाण उंच उंच डोंगर टेकड्या स्वच्छ पाण्याचे झरे असलेल वेगवेगळ्या पक्षी प्राणी असणार ठिकाण होतं.
निताला घरच्यांची आठवण येऊन काही दिवस अगदि अस्वस्थ व्हायच पण काही दिवसातच ती त्या लोकांमध्ये रमु लागली. त्या लोकांना वाटायचं की ईश्वरानेच तीला त्यांच्या मदतीला पाठवले आहे.
त्या आदिवासी लोकांना नुकताच काही पिढ्यांपुर्वि शेतीचा शोध लागला होता आणि त्यामुळे त्यांच्या वस्त्या वसु लागल्या होत्या. संस्कृति अगदी प्राथमिक स्तरात पण बऱ्यापैकी स्थिर झाली होती. लोकांच्या मुला मुलींना निता अनेक प्रकारचे खेळ, तोडके मोडकी बालगीते शिकवायची. आईला स्वयंपाकात मदत करण्याची सवय असल्याने ती तिथल्या बायकांना वेगवेगळे पदार्थ करून दाखवायची. तिच्या गुणांनी तिने सगळ्याची मने जिंकली होती.
हल्ली काही दिवसांपासून निताची तब्येत हळुहळु ढासळत चालली होती पण त्या लोकांना पुरेस वैद्यकीय ज्ञान नसल्यामुळे ते तिचा उपचार करू शकत नव्हते. सततचा ताप खोकला याने तिचा जिव कासावीस होई, रोजची काम करता करता एक दिवशी अशक्तपणाने अचानक भोवळ येऊन पडली.
**
ईकडे रात्रीचा १ वाजून गेला तरी पोरगी घरी कशी आली नाही याची काळजी सुमनबाई म्हणजेच निताची आईला वाटत होती एकतर काळोखी रात्र त्यात दुकान आणि वस्तिचा रस्ता पार जंगलातून. आज तिच्यासोबत रवीहि नव्हता एकट्या पोरीला बघुन कोणी काही बाही तर केलं नसलना या विचारांनी त्या माऊलीच्या काळजात धस्स झालं.
तडक उठून वस्तीतल्या काही माणसांना घेउन सुमनबाई पोरीला शोधायला जंगलाच्या वाटेने गेली.
अर्ध्यावरच निता रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसली. भितीने चेहरों पिळवटून गेल्यासारखा दिसत होता. लोकांनी तिला उचलले आणि गावातल्या एका डॉक्टरकड घेऊन गेले. पोरीचि अवस्था बघुन सुमनबाई भेदरून गेल्या होत्या. त्यांना सोबतच्या लोकांनी कसाबसा धीर दिला.
डॉक्टरांनी निता कोमात गेल्याच सांगून लवकरात लवकर शहरात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी रवी घरी गेल्यावर निता आणि आईची विचारपूस केल्यावर त्याला वस्तीवर परत आलेल्या लोकांनी दोघे गावातल्या डॉक्टरच्या दवाखान्यात असल्याच सांगितले.
रवी आल्याबरोबर डॉक्टरांनी त्याच्याकडे शहरातील एका हास्पिटल च्या नावाने चिठ्ठी देऊन रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.
आज जवळ जवळ ७ महिन्याने निताला कोमातुन शुध्द आली होती बाजुला आपली आई आणि भावाला बघुन जितका आनंद झाला होता तितकीच ती संभ्रमात पडली होती. तिला कळत नव्हते की आपल्याला आलेला अनुभव काय होता.
तिचा अनुभव खरा होता आणि अत्ताची परिस्थिती देखिल. पण कस शक्य होत हे..?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एकदम इंटरेस्टींग आहे कथा....!!! पण येवढ्या लवकर संपवु नका...!! अजुन फुलवता येते...!!! प्रयत्न करा, होइल पुर्ण.....!!!

पहिल्यांदा च एखादी कथा लिहिली आहे त्यामुळे भरपुर त्रुटी आहेत हे मान्य करतो. आणि मार्गदर्शन करावे ही विनंती करतो..!
हो क्रमशः लिहण्याची कल्पना आहे पण अनुभव नसल्याने शब्द रूप देण्यात असमर्थतेची जाणिव होते आहे..! त्यामुळे थोडे मार्गदर्शन करावे.

हो मी प्रयत्न करतोच आहे पण कल्पनेला शब्दरूप देण थोड अवघड जात आहे...!
पुढचा भाग लिहिण्यात उशीर होतोय त्या बद्दल क्षमस्व...!